एकीकडे वस्तूंची टंचाई आणि दुसरी कडे परंपरा, चालीरीती या मुळे आपण वस्तूंचा योग्य वापर करण्या ऐवजी वस्तूंची नासाडीच जास्त करत असतो. पुरातन काळात वीज नसल्या मुळे रात्री प्रकाशा साठी तेला तुपाचे दिवे लावले जात असत. मोठ्यांच्या घरी यात उंची अत्तर मिसळून प्रकाशा बरोबर वातावरण सुगंधमय केले जात असे. पण सन १८८९ मध्ये विजेच्या दिव्याचा शोध एडिसन ने लावला आणि मानवी जीवनाच्या जगाच्या प्रकाशाचा इतिहासच बदलून गेला.
जगात मानवी जीवनाला कलाटणी देणारे अग्नी , शेती, गोल चाक, शस्त्र या प्राचीन शोधा बरोबरच आधुनिक छपाई आणि वीज मोठा वाटा आहे. संगणक खूप नंतर १९५० च्या आसपासचा.म्हणजे नवीनच पण याने जगात सर्व शोधांना विकासाच्या बाबतीत मागे टाकले. जुन्या शोधांच्या विकासास शतकोनोशतके लागली.पण संगणकाने अवघ्या ५० वर्षात सर्व जग व्यापले.
जगात मानवी जीवनाला कलाटणी देणारे अग्नी , शेती, गोल चाक, शस्त्र या प्राचीन शोधा बरोबरच आधुनिक छपाई आणि वीज मोठा वाटा आहे. संगणक खूप नंतर १९५० च्या आसपासचा.म्हणजे नवीनच पण याने जगात सर्व शोधांना विकासाच्या बाबतीत मागे टाकले. जुन्या शोधांच्या विकासास शतकोनोशतके लागली.पण संगणकाने अवघ्या ५० वर्षात सर्व जग व्यापले.
तर माझा मुद्दा वस्तूंच्या नासाडीचा. विजेच्या प्रकाशमान जगात आपण अजून ही तेला तुपाचे दिवे मंदिरा न मध्ये, घरातील देवा समोर जाळले जातात.दक्षिण भारतात तर मंदिरा समोर या तेला तुपाच्या दिव्यांची मोठी आरासच असते. थेंब थेंब या प्रमाणे हजारो टन तेल तूप अनावश्यक रीत्या अश्या रीतीने जाळत असतो. ही नासाडी टाळण्या साठी विजेचे छोटे बल्ब वापरण्यास काय हरकत आहे. या साठी खास नमुन्याचे दिवे समया बनवता येईल. तसेच लग्न मध्ये वधूवरांच्या अंगावर अक्षता म्हणून अन्नधांन्य टाकणे जे वधूवरांच्या डोक्या वर कधीच पडत नाही. निव्वळ धान्याची नासाडी होय. आपली मते महत्वाची.भारतात अंदाजे एका घरात वर्षाला आपण 3500 ग्राम्स तेल( साडेतीन किलो) आणि चांगले तूप समई साठी वापरल्या जाते असे आपल्या म्हणण्या प्रमाणे मान्य केले , आणि फक्त कमीत कमी २०,००००००० लोकसंख्या गृहीत धरली तर एका कुटुंबात ४ सदस्य या प्रमाणे 50000000 ( 5 कोटी) घरे तेल जाळत असतील' ११० कोटी लोकसंख्ये पैकी फक्त २ कोटी.९० कोटी बाकीच्यां जनतेची एव्हढे तेल जाळण्याची क्षमता नाही असे गृहीत धरले आहे. यांचा तेल जाळण्याचा आपल्या किमती प्रमाणे हिशोब पुढे दिला आहे. वापर धरून हिशोब केला तर
3.5 kilograms * 50 000 000 = 175 000 000 kilograms एव्हढ्या वजनाचे तेल तूप जळतो.
175 000 000 * 250 = 43 750 000 000 रुपयांचे तेल तूप जाळले जाते.
Search for documents containing the terms 175000000*250. हा हिशोब कमीतकमी घरे गृहीत धरून केला तर आकडे पाहूनच डोळे मोठे होतील. यात लाखो मंदिरात जे तेल बरबाद केले जाते त्याचा हिशोब केला नाही. बाकी या रक्कमेत काय होवू शकत याचा हिशोब अभ्यासू ने करावा. माझे गणित कच्चे आहे त्या मुळे आकडेवारी चुकत असेल तर आपण हिशोब कारणे . आकडे कमी जास्त या पेक्षा होणारी नासाडी लक्षात घ्या. या आधी हा अभ्यास कोणी केला असे तर त्याची LINK कृपया द्यावी.म्हणजे मला अधिक अभ्यास करता येईल.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com
No comments:
Post a Comment