Translate

Saturday, October 2, 2010

आयोध्या निकाला नंतरचे सामंजस्य

 आयोध्या निकाला नंतरचे सामंजस्य 

लोकांनी संयम वगैरे पाळला . अभिनंदनीय आहे. १९९२-९३ पेक्षा काही बाबतीत मॅच्युअर् झाला आहे.येथून पुढेही, ह्या विषयावर असेच सामंजस्य टिकुन राहण्यासाठी जे प्रयत्न सातत्याने घडणे आवश्यक आहे
या  सर्व बोलण्याच्या गोष्टी झाल्या . सरकारने आपले कणखर अस्तिव दाखवून दिल्या मुळे हे शक्य झाले. निकाला आधी हजारो गुंडा नेत्यांना स्थानबद्ध केल्या गेले होते, आणि जागोजागी बंदुकधारी अर्ध सैनिक , गावोगावी पोलीस संचालन , दिल्ही च्या जामामशीद च्या परीसरा पासून ते मंदिर परिसरात सैनिक गस्त चालू होती. या सर्वांमुळे आपण कांही आगलावे पणा केला तर सरळ जेल मध्ये रवानगी होईल हे मतलबी नेत्यांना  कळून चुकले. आणीबाणी नंतर देशात शासन नावाची गोष्ट अस्तिवात आहे हे प्रथमच जाणवले आणि याचा व्हायचा तोच परिणाम झाला. जनता नव्हे गुंड राजकारण्यांना हात चोळत गप्प बसावे लागले. जनतेला ना राम ना रहीम मध्ये रस आहे, त्यांना त्यांच्या रोजच्या रोजीरोटीची जास्त काळजी आहे. भारतात एक दीवस बंद झाला तर राजकारण्यांचे कांही वाकडे होत नाही पण ज्यांचे रोज कमावणे आणि प्रपंच चालवणे असते त्यांना उपाशी राहावे लागते.त्यांना कोणी फुकट जेवण आणून देत नाही,जसे नेत्यांना जेल मध्ये गेल्यावर सरकार यांचे चोचले पुरवत जेवण देते.
आजच  हळूहळू राजकारणी यांनी आपले आपले रंग दाखवण्यास सुरवात केली आहे. मतलबी राजकारण्यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा सुरु केली आहे. कारण सामंजस्य राहिले तर यांची दुकानदारी बंद पडेल. आणि सरकारने निकाल ठरवून लावला असला तरी  देश हिता साठी ते आवश्यक होते. १९९२-९३ पेक्षा काही बाबतीत मॅच्युअर् झाला आहे. तसले कांही नाही. कायद्याच्या धसक्यानेच  सरळ  वागण्यास मिडिया  मजबूर झाला.

1 comment:

महेंद्र said...

92-93 नंतर बराच फरक पडलाय हे खरं. मी स्वतः पण त्या काळात कसा वागलो, आणि आज ते कसे चुकिचे होते याची जाणीव होते.
अडवाणींना मात्र असं वाटत असेल की आपण केलेल्या त्या मार्च चा फायदा झाला म्हणून.
मुलायम ला घरचे शालजोडीतले दिले मुस्लीम लोकांनी पण. विनाकारण केलेल्या कॉमींट मुळे मात्र तो स्वतः तोंडघाषी पडला.
एकदा झालेल्या धार्मिक तिढ्यामुळे आता लोकांना समजलंय की कसं वागावं ते..