गडकरीआपणास माफी मागावयाची होती तर समस्त श्वान जमातीची मागायची होती. या दोघांना श्वानाची उपमा देवून आपण समस्त प्रामाणिक, विश्वासू म्हणून जगात प्रसिद्ध असलेल्या प्राण्यावर अन्याय केला आहे. या प्राण्यांना हे समजले तर ते समस्त मानव जातीस हानिकारक आहे. हे दोघे जण जीवनभर यांना निवडून दिलेल्या मतदाराशी, जनतेशीच बेईमान झालेले आहेत.मग यांच्यात श्वानांचा कोणता गुण आपणास दिसला की , आपण लालू,मुलायम यांना कुत्रे असे संबोधन केले असे श्वानांनी आपणास विचारले आहे. कृपया आपला जबाब आपण त्वरित द्यावा.
आजच जंगला मध्ये सर्व प्राणिमात्रांची सभा राजे सिंह यांच्या अध्यक्षते खाली भरली होती.आम्ही जंगलात राहतो पण आमच्या येथे तुमच्या सारखी भ्ररष्ट लोकशाही नाही. या सभे मध्ये आपला प्राणीमात्र कडून निषेध केला गेला आणि आपल्या सारख्या नेत्या कडून श्वानाचा अपमान केल्या मुळे राजीनाम्याची मागणी केली आहे. जर आपण राजीनामा दिला नाही तर भाजपच्या नागपूर आणि दिल्ही मुख्य कार्यालया समोर रात्रंदिवस मोन पाळून निषेध करण्यात येईल .
2 comments:
गडकरी माफी मागवायची तर श्वान जमातीची मागा हा अपमान करताना आपण हे हि विसरलात कि परक्या माणसाचा , बाईच्या हातापायाचे तळवे श्वान कधीही चाटत नाही त्यांच्या कडे ढुंकूनही पाहत नाही.आणि तसा त्यांनी प्रयत्न केला तर मालकाच्या रागलोभाची परवा न करता परकीयांवर सरळ तुटून पडतो आणि मालकाचे संरक्षण करतो.हा इतिहास तुम्ही विसरू नका.
वा! लिहिलंय ही जबरदस्त आणि सोबतचे चित्र तर अगदी ब्लास्टच आहे. खरच खूप सत्य आणि भेदक!
Post a Comment