प्रतिकूल परिस्थितीचे रडगाणे गात न बसता जिद्दीच्या जोरावर काय घडविता येऊ शकते
याचे एक उत्कृष्ट उदाहरण जम्मू-काश्मीरच्या शाह फैझल याने सर्व तरुणांपुढे ठेवले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशभरातून पहिला आलेल्या फैझल
याच्या या देदीप्यमान यशाचे अनेक कारणांनी महत्त्व आहे. काश्मीर खोऱ्यातील लोलब
या दुर्गम खेड्यात वाढलेल्या शाह फैझल याचे वडील तो लहान असतानाच अतिरेक्यांच्या
हल्ल्यात मरण पावले.
subhash sawant pune jai maharashtra said:तुजा बापाचा बदला घ्ये ! खून का
subhash sawant pune jai maharashtra said:तुजा बापाचा बदला घ्ये ! खून का
बदला खून से ! जय महाराष्ट्र !
हा कोण देशद्रोही आहे जो काश्मिरीला सल्ला देण्यास निघाला. गाढवा त्या शाह फैझल ने भारतीय
(यूपीएससी) परीक्षेत देशभरातून पहिला येवून त्या अतिरेक्यांचा बदला घेतला .
आणि ते चुकीच्या मार्गाने जात
आहेत हे दाखवून दिले. या शाह फैझल च्या यशाने अनेक वाट चुकलेल्या दहशदवादी तरुणांना प्रेरणा मिळून
ते कालांतराने भारतीय समाजाशी एकरूप होतील. असे मुर्खा सारखे सल्ले देवून महाराष्ट्राला बदनाम करू नको
आधीच दोघे जण हे काम करत आहेत ते काय कमी आहे.
यूपीएससीत काश्मिरी गुलाब - Saturday, May 08, 2010 AT 12:27 AM (IST) प्रतिकूल परिस्थितीचे रडगाणे गात न बसता जिद्दीच्या जोरावर काय घडविता येऊ शकते, याचे एक उत्कृष्ट उदाहरण जम्मू-काश्मीरच्या शाह फैझल याने सर्व तरुणांपुढे ठेवले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशभरातून पहिला आलेल्या फैझल याच्या या देदीप्यमान यशाचे अनेक कारणांनी महत्त्व आहे. काश्मीर खोऱ्यातील लोलब या दुर्गम खेड्यात वाढलेल्या शाह फैझल याचे वडील तो लहान असतानाच अतिरेक्यांच्या हल्ल्यात मरण पावले. शिक्षिका असलेल्या आईने त्याला वाढविले. सतत हिंसाचार आणि अस्थिरतेच्या खाईत लोटल्या गेलेल्या काश्मीरमध्ये राहणाऱ्या या युवकाने वैफल्य येऊ न परंतु लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तो देशभरात पहिला आला. हिंसेच्या मार्गाने मानवी आकांक्षा आणि स्वप्ने चिरडता येत नाहीत, हे दाखवून देत त्याने विध्वंसवादी प्रवृत्तींना सणसणीत चपराक दिली आहे, त्याचबरोबर देशभरातील कानाकोपऱ्यांत, दुर्गम भागांत, खेड्यापाड्यांत प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या; परंतु मनात स्वप्नांचे कोवळे अंकुर जपणाऱ्या तरुणांना प्रेरणा दिली आहे. "यूपीएससी'च्या परीक्षेत फुललेला हा काश्मिरी गुलाब सर्व विधायकवादी प्रवृत्तींना बळ देणारा आहे. कारण अनेक क्षेत्रांतील परिवर्तनासाठी, प्रगतीसाठी तहानलेला भारत सनदी नोकरशाहीवर फार मोठी भिस्त ठेवून आहे. त्यामुळेच परिवर्तनाची खरीखुरी आस असलेल्यांना हे क्षेत्र खुणावते. महाराष्ट्रात तशा ध्येयवादी युवकांची संख्या कमी नाही. त्यातील बरेच जण या परीक्षा देऊन यशस्वीही होतात; परंतु या ध्येयवादाला स्पर्धा परीक्षांचे तंत्र व मंत्र यांची जोड दिली पाहिजे, हे लक्षात घेऊनच गेली काही वर्षे राज्यात पद्धतशीर प्रयत्न झाले. यंदाही त्या प्रयत्नांची फळे दिसली व ६४ मुले यशस्वी झाली. मात्र देशपातळीवरील स्पर्धेचा विचार करता; पहिल्या शंभरात मराठी विद्यार्थी चमकले नाहीत. मराठी टक्का नेमका कोणत्या बाबतीत कमी पडत आहे, याचा आता तज्ज्ञांनी शोध घ्यावा. महाराष्ट्राचा दिल्लीत प्रभाव पडत नाही असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ते केवळ राजकीय क्षेत्रापुरते मर्यादित नसते. राजकारणाबरोबरच खेळ, कला, साहित्य, संस्कृती आणि मुख्यतः सनदी सेवा या विविध क्षेत्रांत आपली मुद्रा उमटविण्याचा प्रयत्न मराठी माणसांनी केला पाहिजे. हिंसाचाराचे सावट असतानाही ते भेदून काश्मिरी तरुणाने मिळविलेले लखलखीत यश त्यासाठी निश्चितच प्रेरणा देणारे ठरेल. हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा अशी सह्याद्रीची ख्याती आहे, ती परंपरा कायम ठेवण्याची जिद्द महाराष्ट्रातील तरुणांमध्ये निर्माण व्हावी. | |
प्रतिक्रिया On 5/9/2010 7:23 PM darshanp said: फैझल ..तुझा आम्हाला एक भारतवासी म्हणून अभिमान आहे... On 5/9/2010 4:37 PM subhash sawant pune jai maharashtra said: जम्मू-काश्मीरच्या शाह फैझल यास आमचा महाराष्ट्राचा मानाचा मुजरा ! तुजा बापाचा बदला घ्ये ! खून का बदला खून से ! जय महाराष्ट्र ! On 09.05.2010 01:21 Laxman said: Mr Faizal u r really great. Congratulations!! On 5/8/2010 4:06 PM amol sapkal said: आएस शाह साहेब त्रिवार अभिनंदन. मला अभिमान आहे भारतीय लोकशाहीचा आणि निर्पेक्षतेचा. On 5/8/2010 3:46 PM अभिजित कुलकर्णी said: हमने बनाया हे फिरसे नया आशिया जायो ये बात किसी तुफानसे कह दो अशी जिद्द बाळगणाऱ्या शह फैसलला सलाम On 08/05/2010 15:41 Aparna said: खूप खूप आनंद झाला बातमी वाचून ....मनःपूर्वक अभिनंदन . On 5/8/2010 10:24 AM Rohit Patil,nmu campus Jalgaon said: salam shah faizal,tuzya jiddila salam,pratikul paristhitah na dagamagata kay karta yete te tu dakhavun dile. Dhanvad Sakal Newspaperla sudha samajat jagruti kanyache kam apan khupach chan karata ahata |
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com
No comments:
Post a Comment