Translate

Friday, May 14, 2010

‘पद’, ‘पैसा’ आणि ‘प्रतिष्ठा’ या ‘प’च्या बाराखडीत अडकलेल्या पालकांच्या प्रबोधनात्मक रायगड “ चला मुलांना घडवू या!”

आमचे ब्लॉगर स्नेही  डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर बालरोग तज्ञ महाड हे डॉक्टर कमी समाजसेवक जास्त असे आहेत . आजच्या कट प्रक्टीसच्या च्या जमान्यात असे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे हा या अवलिया डॉक्टरांचा शालेय शिक्षणा पासून छंद. ब्लोग्स च्या निमित्ताने यांची ओळख झाली.आणि हा माणूस आजच्या डॉक्टरकीच्या व्यवसायात  चुकून आला असे वाटते.व्ययक्तिक रोग पेक्षा सामाजिक रोगांची यांना नेहमी काळजी असते. आणि नुसती काळजी करून थांबत नाही तर या रोगावर विलाज करण्या साठी गेली २५ वर्षे ते महाड सारख्या चवदार तळ्याच्या सामाजिक कार्याची परंपरा असलेल्या गावात कार्य करत आहेत. हा एक योग योगच म्हणावा लागेल.
पु.ल च्या सामाजिक कार्या मागे ज्या प्रमाणे कडक दुर्गा सुनीताबाई यांचे पाठबळ होते तसेच पाठबळ डॉक्टरांच्या नेत्ररोग  तज्ञ पत्नी  सुजाता वहिनींचे पाठबळ या बालरोग  तज्ञ बालकास लाभले असे म्हंटले तर ते योग्य ठरेल. व्यासायिक आणि कोटुंबिक या दोन्ही आघाड्यावर या वाहिनिंचाच मोठा सहभाग आहे. हे स्वत: डॉक्टर देखील मोठ्या मनाने मान्य करतात. असो अश्या या डॉक्टरने रायगड जिल्ह्यात आपल्या  मित्रांच्या मदतीने " चला मुलांना घडवू या" याचा आदर्श वस्तुपाठ ‘रायगड पोलीस’ आणि ‘अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटना’  घालून दिला त्या निमित्ताने हा प्रपंच आपणा समोर मांडत आहे. 
 आणि महत्वाचे डॉक.स्वतःhttp://drkidsblog.blogspot.com/ या BLOG द्वारे बालक आणि त्यांचे प्रश्न त्याही पेक्षा पालकांचे प्रश्न यावर मार्गदर्शन सोप्या मराठी इंग्रजी हिंदी अश्या जमेल त्या भाषेत  करणार आहेत.

घडामोडी – रायगड चला मुलांना घडवू या!” महाड येथील बालरोग तज्ज्ञ डॉ़ चंद्रशेखर दाभाडकर उपक्रमाचा यशस्वी रायगड पॅटर्न
जयंत jayantdhulap@gmail.com 
सामाजिक समस्येच्या सोडवणुकीकरीता, समाजास अपेक्षित नसलेले समाज घटक जर एकत्र आले आणि प्रामाणिक प्रयत्न झाले तर गंभीर आणि चिंताजनक सामाजिक समस्या सोडविण्याकरिता कोणती आणि कशी प्रभावी व यशस्वी कार्यपद्धती निर्माण होवु शकते याचा आदर्श वस्तुपाठ ‘रायगड पोलीस’ आणि ‘अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटना’ यांनी संयुक्तरित्या राज्याचा ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून राबविलेल्या विद्यार्थी आत्महत्या समस्येबाबतच्या ‘चला मुलांना घडवू या!’ या उप्रकमातून राज्यास घालून दिला आहे. सामाजिक समस्या सोडवणूकीच्या देशातील एकमेव अशा ‘पोलीस’ आणि ‘पत्रकारांच्या’ संयुक्त उपक्रमाच्या यशस्वीततेची दखल घेवून शाबासकी देवून राजमान्यता देण्याचे महत्त्वपूर्ण काम राज्याचे गृहमंत्री आऱ आऱ पाटील यांनी करुन ‘चला मुलांना घडवू या!’ हा उपक्रम ‘रायगड पॅटर्न’ म्हणून राज्यभर अमलात आणण्याची घोषणा केल्याने आता खऱ्या अर्थाने पोलीस व पत्रकारांच्या सहयोगातून रायगडात जन्मलेली सामाजिक चळवळ राज्यभर पोहोचणार आहे.

अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेने राज्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आत्महत्या या समस्येचा अभ्यास करुन या समस्येच्या मागे ‘पालक’ हा मोठा घटक असल्याचा प्राथमिक निष्कर्श मिळविला होता. दरम्यान अभिव्यक्ती समर्थनच्या एका पत्रकार सदस्याने रायगड जिल्'ाात गेल्या पाच वर्षांत झालेल्या विद्यार्थ्यांच्या ५८ आत्महत्यांची माहिती रायगड पोलीस यंत्रणेच्या माध्यमातूनच संकलीत करुन, या ५८ पैकी ३२ आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालक आणि कुटुंबियांशी संपर्क साधून विद्यार्थी आत्महत्येमागील कारणमिमांसा जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. या साऱ्या पाश्र्वभूमीवर ‘अभिव्यक्ती समर्थन’ने विद्यार्थी आत्महत्या समस्येबाबत पोलीसांच्या सहयोगातून पालक प्रबोधनाचा हा उपक्रम तयार करुन त्याच्या संयुक्त अंमलबजावणीचा प्रस्ताव तयार केला. सामाजिक बांधिलकीची तीव्र जाणीव असलेले राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त रायगडचे जिल्हा पोलीस अधिक्षक रावसाहेब शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रस्तावास मान्यता दिली आणि मोठे बळ ‘अभिव्यक्ती समर्थन’ला लाभले. पाल्य व पालक प्रबोधनाकरीता कार्यरत महाड येथील बालरोग  तज्ञ डॉ़ चंद्रशेखर दाभाडकर ‘अभिव्यक्ती समर्थन’चे एक सक्रीय स्नेही असून त्यांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून हा उपक्रम रायगड जिल्'ाात अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यास त्यांनी मान्यताही दिली. आपले रुग्णालय आणि व्यवसाय बंद ठेवून ते या उपक्रमात सहभागी होणार होते, सामाजिक बांधिलकीपोटी कोणाचेही व्यक्तीगत नुकसान होणे योग्य नाही, या मुद्याचा रायगड पोलीस आणि अभिव्यक्ती समर्थनने जाणीवपूर्वक विचार करुन उपक्रमांतर्गत डॉक्टरांच्या मानधनाचे नियोजन केले. नाजूक सामाजिक समस्येच्या उपाय योजनात्मक या उपक्रमाच्या आयोजनात कोणत्या स्वरुपाची त्रृटी राहू नये या करीता रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक रावसाहेब शिंदे यांनी रायगड जिल्'ाातील पोलीस अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावून, त्यांच्या समोर उपक्रमाचा हेतू व आयोजन पद्धती या विषयी ‘अभिव्यक्ती समर्थन’ ला मांडणी करण्यासा सांगितले तर व्याख्यानात नेमका काय विषय असणार याची मांडणी डॉ़ दाभाडकर यांनी केली. आणि याच बैठकीत ‘पद’, ‘पैसा’ आणि ‘प्रतिष्ठा’ या ‘प’च्या बाराखडीत अडकलेल्या पालकांच्या प्रबोधनात्मक ‘चला मुलांना घडवू या!’ या उपक्रमाच्या आयोजनाकरीता पोलीस, प्रेस (पत्रकार) आणि पेडीएट्रीशियन (बालरोग तज्ज्ञ) या इंग्रजीतील तिन  ‘पी’ च्या एका विचाराचा पर्याय जन्मास आला.
http://www.thanthanpal.blogspot.com

No comments: