विधवा होण हा स्त्री चा दोष मानणे ही आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीचा सर्वात मोठा दोष आहे.आणि ज्यांचे नवरे जिवंत त्याच स्त्रिया ह्या विधवांचे अस्तित्व नाकारतात हे दुर्देवी आहे. एकदा नवरा निधन पावला की त्या स्त्रीची किमत समाज शून्य करून टाकतो. पण हीच विधवा नवऱ्याच्या निधना नंतर त्याच्या वंशाच्या दिव्यांना कितीही संकट आले तरी ती दूर करून मोठी करते, उच्च शिक्षण देते.स्वतः एक वेळ उपाशी राहते पण
मुलांना कमी पडू देत नाही.त्याच बरोबर स्वतः;च्या शीलाचे संरक्षण करण्याची घराण्याचे नाव इज्जत राखण्याची अवघड जबाबदारी सुद्धा पर पाडते. पण या सत्या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून समाज तीला जीने मुश्कील करतो. या त्रास देण्यात पुरुषा पेक्षा तिच्या आसपासच्या विवाहित स्त्रियाच आघाडीवर असतात. विधवा स्त्री जरी यांच्या नवऱ्यास सद्हेतूने बोलली तरी या विवाहिता तिच्या विरुद्ध वाटेल त्या अफवा पसरवतात आणि आपल्या नवऱ्यास सुद्धा भांडत बसतात.जसा कांही यांचा नवरा ती विधवा पळवून च नेवू लागली होती. स्त्रीयांच्या उत्सवाचे अनेक सण पूर्वपरंपरेने आयोजित करण्यात येतात, पण स्त्री विधवा झाली की या सणांना येण्यास बंदी घातली जाते . हेच मुळात चूक आहे.मकरसंक्रांत सारख्या स्त्रीच्या महत्वाच्या सणाला तीला डावलले जाते.खर तर नवऱ्याच्या माघारी मुलांची आई बरोबरच वडिलांची जबाबदारी पाळणाऱ्या या विधवा या हळदी-कुंकुवाच्या खऱ्या हक्कदार आहेत. पण या सर्व गोष्टीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते याच वेळी तिची आर्थिक सामाजिक शारीरिक पिळवणूक केली जाते. पण ती या सर्वाना पुरून उरते.
या उलट, पुरषाचे नवऱ्याचे वागणे, बायको मृत झाली की तिच्या मासिक श्राद्धा ची ही वाट न पाहता हे महाशय लग्न करून मोकळे होतात. याला कारण की आई विना पोरांचे हाल होतात, म्हणून पुन्हा लग्न केले असे सांगतात . आई विना मुल पोरकी होतात म्हणून पुरुषाला लग्नाची परवानगी. हाच न्याय स्त्रीला का लावला जात नाही. बापा विना पोर उघड्यावर पडतील म्हणून स्त्रीचे लग्न लावून दिले जात नाही. असा कसा धर्म आणि धर्मशास्त्र. तर पुरुष हा कमावता असूनही पुन्हा लग्न करतो. पण स्त्रीला उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना तिने लग्न करू नये असे आमचे धर्मशास्त्र सागते आहे याचा आधार घेत स्त्रिया वर अन्याय २१ व्या शतकात ही चालूच आहेत. या धर्मशास्त्र लिहाणार्यांच्या शहाणपणा विषयी यामुळे शंका येते. दोनशे वर्षा पूर्वी सती प्रथेतून स्त्रियांची सुटका करणाऱ्या राजा राम मोहन रोय मुलीना शिक्षण देणाऱ्या महात्मा जोतीबा फुले यांच्या क्रांतिकारक विचारांचा पुढे आपण किती मागासलेले आहोत हे समजते. आज परत एकदा अशा विचारवंतांची गरज आहे.
Thanks & regard,Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.
2 comments:
खरंच योग्य तेच मांडले आहे. माझ्या आजोबासारखे अनेक िवचार करु लागले तर या युगात असे क्रांित्कारक घडवणे नक्कीच अशक्य नाही्.
अगदी अगदी सत्य बोललात. स्त्री हक्कांविषयी आणि तिच्या 'खऱ्या सन्मानाविषयी' आपण खूपच मागासलेले आहोत. निराधार स्त्रियांना या राष्ट्रात जे हाल सोसावे लागत आणि जी सामाजिक बोच सहन करावी लागते ती सगळ्यां कळत नाही असे नाही, पण पुढे होणारे खूप कमी. ज्यांच्या बायकोच्या कपाळाला कुंकू आहे त्यातलेच बरेचजन 'या' स्थितीला कारणीभूत आहेत. मला हिंदू संस्कृतीचा आदर आहे, पण याच हिंदू संस्कृतीत 'थेअरी' मध्ये स्त्रीला माता आणि देवी म्हंटले जाते आणि 'प्रक्टीकॅल' मध्ये तीच समजतील सगळ्यात खालाच वर्ग गणली जाते. सगळ्या शिव्या कुणावरून? तर नात्यातल्या स्त्रीवरून, का तिचाच इतका उद्धार होतो? आणि ह्या शिव्या आमच्या संस्कृतीने होळी वगैरेला जशा काय काम्पल्सरीच केल्यात! ह्याच समाजात विधवांचे तुम्ही म्हणता तसे हाल होतात. का?
कदाचित याला उत्तर आहे, स्त्री आत्मनिर्भर होणे आणि धर्म सांगते ते सत्य नव्हे तर सत्य आणि चांगले तोच धर्म ह्याची जाणीव. यात स्त्रीने आत्मनिर्भर होणे हा तर फार मोठ्ठा मुद्दा आहे जो तिला या सगळ्या पाशातून सोडवू शकतो.थोडी आर्थिक क्षमता आली की तिला 'विचार करण्याचा' आणि मत नोंदवण्याचा हक्क येईल(जो की या राष्ट्राचा नियम आहे) आणि तो आला की हळू हळू तीच माणूस म्हणून अस्तित्व 'खऱ्या अर्थाने' मान्य होईल. शासनाकडून या बाबतीत खूप अपेक्षा आहेत आणि त्या सोबतच समाजातील विचारवंत ज्यांचा लोकमाणसावर प्रभाव आहे त्यांच्या कडून ही. बदल कुठे कुठे होतोय पण अजून खूप बदल व्हायचाय आणि सध्या समाजात ज्या स्त्रियांकडे ही ताकत आहे त्यांनी यात पुढाकार घेणे फार जरुरीचे आहे, तुमच्या येणाऱ्या मुलींकरिता आणि आमच्या भगिनीन करिता.
Post a Comment