Translate

Tuesday, May 25, 2010

ग्रामीण शिक्षणाच्या आयचा घो!!!

अंधेर नगरी चौपट राजा, टका शेर भांजी टका शेर ख्वाजा. हजारो साल पुरानी  कहावत आपल्या महाराष्ट्र सरकारला लागू होते हे. आजच्या १२ वी च्या निकालाने सिद्ध झाले. जुन्या मंत्र्या पेक्षा कांही तरी नवीन करण्याच्या नादात कालचा गोंधळ बरा होता म्हणावयाची वेळ आली. शहरात आज निकाल मिळाले पण ग्रामीण भागाला निकाल ८-१० दिवसांनी मिळणार आहे.
महाराष्ट्रा फक्त मुंबई,पुणे येथेच आहे या दृष्टीकोनातून सर्व निर्णय राबवले जात आहे मुलांचा सत्यानाश व्हायचा तो टाळत नाही. १२विचा निकाल जाहीर करण्याची लगीन घाई करते वेळी खेड्या-पाड्याचा विचार ग्रामीण भागातून निवडून आलेला राजकारणी सुद्धा करत नाही हे या देशाचे दुर्देव्य आहे, हा नेता मुंबईच्या चमकोगीरीला भुलून स्वत;च्या मतदाराला विसरून जातो. आणि महमद तुघलक हा राजा बरा असे वाटते.
हा निर्णय घेण्याच्या आधी संगणक सर्व दूर राज्यात आहेत का याचा विचार झाला?
हे संगणक चालवण्या साठी पुरेशी वीज आहे का?
या दोन्ही गोष्टी नसताना आणि निकालाच्या प्रिंटींग चे काम झाले नसताना हा उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग बांधण्याचा प्रकार कसा घडला. लाखो रुपय पगार खाणारी भ्रष्टाचार करणारी नोकरशाही, नेते  कश्या करता आपण पोसत आहोत. 
बर ह्या निकालाचा कांहीच फायदा शहरी लोकांना सुद्धा झाला नाही.  शाळेतून ORIGINAL  गुण पत्रिका मिळत नाही तो पर्यंत या जाहीर झालेल्या निकालाचा कांही फायदा नाही. त्या घ्यावयाच लागणार. नंतर प्रवेशाची  सर्व कामे सुरु होतील  वीज पाणी याबाबत आता पर्यंत शहरी आणि ग्रामीण असा भेद सरकार करतच आली आहे. आत्ता शिक्षणक्षेत्रात ही हा भेद सुरु झाला. हा भेदभाव नेहमीच होतो. कोणताही शेक्षणिक प्रकल्प सुरु करायचा झाले तर मुंबई,पुणे गेला बझार औरंगाबाद,या विकसित शहरातच होतो. आणि वर राज्याचा मुख्यमंत्री हतबल होवून म्हणतो ग्रामीण भागात शासकीय कर्मचारी जात नाही. आणि मुर्खा सारखे कारण देतो. ग्रामीन भागात मनोरंजनाच्या ,मॉल च्या सुविधा नसल्याने तेथे कर्मचारी जात नाही. कर्मचारी जर ऐकत  नसतील तर नोकरी वरून काढून टाका ना .जनतेने त्या करताच तुम्हाला निवडून दिले.. नाहीतर एक दीवस तुम्हाला घरी बसावे लागेल.
गुणवान यादी चे सुद्धा असेच. तळागाळातील , बहुजन समाजातील, ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवान यादीत येवू लागली तर मुलांच्या कोवळ्या मनावर वाईट परिणाम होतो म्हणून गुणीजनाची यादीच रद्द केली.इतके दीवस यांची मुले यादीत झळकत होती तेंव्हा यांना बालमनाचा विचार आला नाही. असो हा कोळसा काळा तो काळा.
ताजा कलम:- जाता जाता मुख्यमंत्री आणि गुणवत विद्यार्थी यांचा कांही संबध आहे का या वर कोणी तरी Phd करावी.कारण विलासरावांचे मुख्यमंत्री गेल्या बरोबर लातूर पटर्ण चा बोऱ्या उडाला आणि निकाल चा निक्काल लागला. याच बरोबर आता हा शेक्षणिक विकास नांदेड कडे सरकला . या योगायोग का आणखी कांही याचा आपणच विचार करावा मांडावा.
                                       ग्रामीण शिक्षणाच्या आयचा घो!!!

1 comment:

MeghaRane said...

खरंच ग्रामीण काय आिण् शहरी पण िश्क्षणाच्या आयचा घो!

आजोबा इथे शहरात पण सगळीकडेच िश्क्षणाच्या सुिव्धा उपल्ब्ध नाही आहेत. खरंच सगळेच त्रास्ले आहेत् सरकारच्या या धोरणामुळे.
सगळेजणच पालक,िवद्यार्थी व िश्क्षक हवाल्िद्ल झाले आहेत्.