Translate

Thursday, December 24, 2009

आपल्या पत्नीच्या प्रेमा करता एकट्याने आख्खा पहाड फक्त छाननी हातोड्याने.......


माझा भारत महान आहे.पण तो महान आजच्या 3 पेज वर चमकणाऱ्या क्रिकेट खेळाडू, फिल्मी नट-नट्या किंवा आपल्या राजकारणी नेत्या मुळे नव्हे, 100 स्रीया बरोबर लग्न करून प्रेमाचा आव आणणाऱ्या  ताजमहल बांधणाऱ्या आणि काम झाल्यावर कारागिरांचे हात तोडणार्या  राजा मुळे तर नव्हेच नव्हे .तर स्वर्गातून गंगा पृथ्वी वर आणणाऱ्या भगीरथ , अजिंठा , वेरूळ चे पहाड खोदून त्यावर नावाची साधी पाटी न लावता कर्म करणाऱ्या कारागीरा मुळे भारत महान आहे
महात्मा फुले. बाबासाहेब आबेडकर,योगी विवेकानंद , बाबा आमटे , मेधा पाटकर, आणि इतर अनाम अज्ञात  सामान्य माणसा मुळे माझा भारत महान आहे. आज अश्याच एका अवलियाची गोष्ट आहे .बिहारी भारतीयाने  आपल्या पत्नीच्या प्रेमा करता एकट्याने  आख्खा पहाड फक्त छाननी हातोड्याने फोडून गावकऱ्या साठी बोगदा ३५० फूट लांब १६ फूट रुंद आणि १२ फूट उंच अशा आकाराचा कल्पनाही करू शकत नाही असा तयार केला.


दशरथ मांझी हा बिहार प्रदेशाचा एक रहिवाशी. गया जील्हायातील गेहलोर-वजीरगंज हे खेडे ही त्याची जन्मभुमी आणि कर्मभूमी. या खेड्यात ना रस्ते ना इतर सोई -सुविधा ना दवाखाना . कोणतीही अडचण आली, सरकारी कामकाज असले  तर 50 किलोमीटर दूर असलेल्या वजीरगंजला मोठी टेकडी पार करून जावे लागे.नवीन मार्ग तयार करून हे अंतर कमी करता येईल याची कोणी कल्पना ही केली नव्हती.भारतातील अनेक खेड्या सारखी याही खेड्याची दुरवस्था होती.
 याच खेड्यात दशरथ मांझी हा सामान्य नागरिक ( common man ) राहत होता . जनावरे चारावयास नेणे हा त्याचा उद्योग होता. भल्या सकाळी तो जनावरे घेऊन टेकडीवर जात असे. दुपारी त्याची पत्नी शिदोरी-पाणी घेऊन टेकडीवर जात असे. एक दिवस उशीर झाला म्हणून टी टेकडी चढायला घाई करू लागली .तेवढ्यात तीचा पाय घसरला आणि दशरथ च्या डोळ्या समोर त्याची पत्नी टेकडी वरून खाली पडली. मनात असून देखील दशरथ तीला मदत करू शकत नव्हता. पत्नीला फ्राकचर झाले होते. दशरथ ने तीला वजीरगंज ला 50  किलोमीटर अंतरावर असलेल्या  डॉक्टर कडे नेले . वास्तविक पाहता वजीरगंज त्याच्या गावा पासून फक्त 8 -10 किलोमीटर अंतरावर होते.पण मध्ये टेकडी असल्या मुळे आणि टेकडी चढून जाणे अवघड होते यामुळे लांबच्या रस्त्याने जावे लागे.
या प्रसंगा नंतर दशरथ विचार करू लागला, त्याला रात्री स्वप्ने पडू लागली . ही टेकडीच काढून टाकली तर . किंवा यातून रस्ता केला तर.त्याला स्वप्नात रस्ता तयार झाल्याचे दिसू लागे पण जागा झाल्यावर ते स्वप्नच आहे हे सत्य उमगे. आणि तो निराश होत असे. कारण हे काम साधे नव्हते .टेकडी 350 फुट उंचीची होती.आपल्या शहरी भाषेत सागावयाचे म्हणजे 35 मजली इमारत एव्हडी.. उंच ..विचार करा.
एव्हढा विचार कोणी केलाच नव्हता. माणसे टेकडी चढून किवा लाबच्या रस्त्याने जा - ये करत होती.
या टेकडीतून बोगदा करून रस्ता केला तर बाजूच्या गावात साज जाता येंत होते. पण हे सहजसाध्य काम नव्हते,या कामा करता लागणाऱ्या खर्चा करता राजकीय , आर्थिक आधार शक्तीची आवशकता होती.
आणि दशरथ हा कांही शहाजहान प्रमाणे राजा नव्हता की लोकशाहीतील राजकीय नेता नव्हता. या मुळे नोकरशाही त्याचे काम करणे शक्यच नव्हती. ही रस्त्याची कल्पना ऐकून गावकरी लोकांनी त्याला वेड्यात काढले.सरकारची या कामा करता मंजुरी मिळविण्या साठी  बाबू  लोकांचे हात ओले करणे आवश्यक होते कारण त्या शिवाय ते या कामाला हात लावण्यास तयार होणार नव्हते. याशिवाय यांचे कडे हेलपाटे घालावे लागणार होते. या करता कोणीही तय्यार नव्हते . राजकीय नेत्यांनी निवडणुकीत रस्त्याचे आश्वासन दिले ते हवेत विरून गेले.
तरीही हार न मानता दशरथ शासन दरबारी हेलपाटे मारू लागला. पण लालफितीत हे काम होणे शक्य नव्हते आमचा फायदा काय? यावर दशरथ कडे उत्तर नव्हते. टेकडी फोडण्याचा वर्षानु वर्ष लागणाऱ्या मजुरांचा खर्च करण्या करता तो कांही शहंशाह नव्हता  गावातील लोक , पाहुणे त्याला वेड्यात काढू लागली. पण जाता येता ती टेकडी त्याला वाकुल्या दाखऊ लागली , या माजोरी टेकडीचा गर्व आपण उतरावायाचाच असा प्रण दशरथ ने केला. अखेर त्याने एकट्यानेच रस्ता तयार करण्याची प्रतिज्ञा केली.


1958 वर्षाच्या एक दिवस २८ वर्षाच्या दशरथाने  बकऱ्या टेकडीवर घेऊन  जाताना स्वतः बरोबर छ्नी - हातोडा घेतला . दशरथने बकऱ्या चारावयास सोडून दिल्या आणि टेकडीचा अंदाज घेऊन रस्ता बांधण्याचा कच्चा आराखडा तयार केला. भीष्म प्रतिज्ञा करून त्याने छ्नी हातात घेऊन हातोड्याने टेकडीवर प्रहर केला. टेकडीला हे नवीनच होते. टेकडी भीतीने शहारली , आणि सुरु झाला एक वर्षानु वर्षाचा संघर्ष . निसर्ग विरुद्ध मानव.


हा हा म्हणता पंचक्रोशीत  दशरथ छनी-हातोडीने  टेकडी फोडत आहे ही बातमी पसरली. आख्खा गाव , पाहुणे हातातील कामे टाकून हा अजब प्रकार पाहण्या साठी टेकडी कडे धावत सुटले. बायको आई -वडील भाऊ बहिण नातेवाईक सर्व प्रेमाची मंडळी जमली. आणि त्याला या वेडा पासून दूर करण्याचा प्रयत्न करू लागली. बाबारे ss! हा पागलपणा सोडून दे. पोटा -पाण्याचे पहा .छ्नी-हातोडीने डोंगर फोडता येणे अशक्य आहे.पण दशरथने कोण कडेही लक्ष दिले नाही , ना उत्तर दिले. तो आपला डोंगर फोडण्याच्या कामात दंग होता. जगावेगळी त्याची निसर्गा विरुद्ध लढाई सुरु झाली .


घरच्या सह गावकर्यांना वाटले 2 - 4 दिवसात दशरथाच्या डोक्यातून टेकडीवरचे भूत उतरून जाईल. पण लोकांनी त्याला ओळखले नव्हते .
हे भूत सहजासहजी उतरणे शक्य नव्हते. दिवसा मागून दिवस , वर्षा मागून वर्ष जात होते. कोणत्याही प्रसंगात दशरथ टेकडी फोडण्याचे काम बंद करत नव्हता .
             बायकोचे आजारपण, बाळंतपण , उन ,पाऊस , कश्याचीही पर्वा न करता तो अखंड काम करत होता . ती टेकडी त्याच्या कडे पाहून त्यास हिणवत होती. अनेक घाव घालून एक दगडाचा तुकडा देखील पडत नव्हता .नवीन छ्नी हातोड्या साठी त्याने बकऱ्या सुद्धा विकल्या .नवीन मोठी हत्त्यारे विकत घेतली. कामा करता जास्त वेळ मिळावा म्हणून त्याने डोंगराजवळ झोपडी बांधली. मुले-मुली मोठी होत होती पण या कडे त्याचे लक्ष नव्हते. आयुष्यात टेकडी शिवाय दुसरा विषय त्यच्या डोक्यात नव्हता
वर्षा मागून वर्ष जाऊ लागले तशी टेकडीने हार मानण्यास सुरुवात केली. हळू हळू रस्ता आकार घेऊ लागला.लोक आता दशरथ कडे आदराने पाहू लागले. याकामाच्या श्रेया साठी लोक त्याला मदतीचा हात पुढे करू लागले. पण त्याने दुर्लक्ष केले. याच काळात मुख्यमंत्री लालूंनी त्याची कीर्ती ऐकून पाटण्यास भेटीस बोलावले. घरच्यांनी त्यास स्वतः करता मदत मुख्यमंत्र्या कडे मागावयास सांगितले. पण दशरथ च तो . य्ताने स्वतः साठी कांही मागितले नाही गावाकरता दवाखाना मागितला. लाईट मागितली . सरकारी खाक्या प्रमाणे कागदावर योजना मंजूर झाल्या .दशरथ आपल्या कामाला लागला.
अखेर तब्बल 24 वर्षानंतर1982 साली  त्याचे स्वप्न पूर्ण झाले. दोन  तप पूर्ण झाल्यावर टेकडीने पूर्ण शरणगती पत्करली मानवाने निसर्गावर परत एकदा मात केली. टेकडीतून आरपार जाणारा रस्ता पूर्ण झाला. हा बोगदा लहान साहन नव्हे तर तब्बल 350 फुट लांब , 16 फुट रुंद 12 फुट उंच या आकाराचा झाला.  50 किलोमीटरचे अंतर 40 किलोमीटर ने कमी झाले.
        आता तुम्हीच ठरावा सत्तेच्या पैश्याच्या जोरावर ताजमहाल बांधून खोट्या पेमाचा बाजार मांडणारा शहनशाह मोठा की पत्नीच्या प्रेमाखातर
स्वतःच्या बळावर गावाकरता डोंगर फोडणारा रस्ता बांधणारा दशरथ मोठा .










--
Thanks & regard,


Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com




3 comments:

Anonymous said...

Remarkable.
pan post sampurna lihilyasarakhi vatat nahi.

रविंद्र "रवी" said...

Kautukaspad gosht aahe hi. Ashi lok aahet?

THANTHANPAL said...

aahet fakt tyancha gajavaja karat marketing hot nahi. mhanun he anam bharatiy jaga samor yet nahi.