आई खाऊ घालेना , बाप भिक मागू देईना आणि माय-बाप सरकार बालकामगार विरोधी कायदे करून काम करू देईना. कोटयावधी बालकांना गुन्हेगारीच्या मार्गावर वाटचाल
करावयाला लावणारा असा हा भारत सरकारचा बाल कामगार विरोधी कायदा आहे. बाल कामगाराच्या हीता करता काहींचं नाही करता फक्त बालकाना कामावर न ठेवण्याचा कायदा करून आणि कामावर ठेवल्यास मालकांना जेल मध्ये टाकण्याचा,त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक दंड लावण्याचा अजब कायदा करून सरकार, राजकारणी नेते आणि नोकरशाही आपण बाल कामगाराच्या सर्व समस्या दूर केल्याचे आणि आपण बालकाचे मुलांचे हित पाहत असल्याचे ढोल पिटत आहे. पण वास्तवात हा कायदा नोकरशाहीच्या भ्रष्ट्राचाराला आधिक वाव देत आहे. पण शासन बुद्धीजीवी वर्ग वेड पांघरून पेडगावला जात आहेत. आणि बालक काम करून घराची चूल पेटण्यासाठी राबत आहे. हेच दाहक सत्य आहे. आणि शासन यंत्रणा वार्षिक श्राद्धा प्रमाणे बालकामगार दिवस "आमच्या विभागात बालकामगार नाहीत" अश्या पाट्या लाऊन साजरा करतात.
रेल्वे ने प्रवास करत असताना स्
तेच उच्चभ्रू , मध्यम समाजातील मुल, मुली अभ्यास सोडून रियालिटी शो च्या नावाखाली टी.व्ही वर वेडे वाकडे तोडक्या कपड्यात सरक्यालो खटीया १२ बजे असे विचित्र गाणे घाणरडे हावभाव करत असतात; कमरे खालचे विनोद सांगत असतात , तेंव्हा हेच उच्च वर्ग , या बाल कलाकार उर्फ बाल कामगार याचे कोतूक करत असतात. या कलाकारांना बाल मजदूर ,कामगार म्हणतो म्हणून दचकलात? हां हे बाल कलाकार १००% बाल कामगार आहेत हे विदारक कटू सत्य आहे. नैसर्गिक जीवन जगण्याचे, खेळाचे,अभ्यास करण्याचे सोडून हे बाल कामगार 8 - 10 तास चेहऱ्यावर मेकअप चे थर चढवून, अक्शन, कट, च्या वातावरणात, फ्लूड लाईट च्या प्रखर प्रकाशात ,घामने ओलेचिंब होत काम करत असतात. याच वेळी परीक्षेकांची कुजकट, अवमान करणारी शेरेबाजी ऐकत अपमान गिळून चहेर्या वर खोटे हसू आणत काम करत असतात. राग, त्रागा केला तर स्पर्धेतून बाहेर फेकल्या जाण्याची भीती असते.जशी भीती कामावरून काढून टाकण्याची बाल कामगाराला असते. त्याच बरोबर आई वडिलांच्या अंतहीन अपेक्षांचा फुगा फुटला तर काय होईल याची पण भीती मनात असतेच. पण आजच्या उपोभोगवादी, बाजारू संस्कृतीत या कडे कोणाचेच लक्ष जात नाही, कारण बाजारू संस्कृतीत बाबूजी तुम क्या क्या खरीदोगे यांहा तो हर चीज बिकती है हेच सत्य आहे . यामुळे या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते.हीच या मुलांची म्हणण्या पेक्षा आपल्या समाजाची शोकांतीका आहे.मुख्य गोष्ट आज जगात 22 - 23 कोटी बाल कामगार काम करत आहेत. विषम सामाजिक, आर्थिक परिस्थिती मुळे, बाजारू अर्थ व्यवस्थे मुळे ; जगातील कोणत्याही कायद्याने ही बाल कामगार व्यवस्था बंद पडणार नही . मग अतिरेकी कायदे करण्या पेक्षा या बाल कामगारांना कायद्याने कामगार हक्क देऊन त्यांची ताकद वाढविण्याची गरज आहे. या करता मालकांना बाल कामगारांच्या शिक्षणाची जबाबदारी देण्यात यावी.या मुलांचा सरकारी शिक्षणाचा आर्थिक भार या मालकांवर टाकावा. शाळे मध्ये आई-वडिलांच्या नावा बरोबर या मालकांचे जबाबदार पालक म्हणून नाव टाकावे. मुलांचे कामाचे तास शाळेच्या तासा बरोबर नियमित करावे. 5 - 6 तासा पेक्षा मुलांचे कामाचे तास जास्त होणार नाही, या मुलांना ओवर टाइम मध्ये काम करणे, ओवर टाइम काम करण्या करता सक्ती करणे कायद्याने बंद करणे. संघटीत कामगारा चे हक्क या बहाल करणे. अश्या व्यवस्थित नियमावली करून या बालकांच्या श्रम शक्तीला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देऊन देशाच्या या भावी नागरिकांना सशक्त बनविणे हीच काळाची गरज आहे. नाही तर समाज कंटक , गुन्हेगारांच्या, शुद्र राजकारण करणाऱ्या नेत्यान च्या सापळ्यात अलगद सापडून ही पिढी बरबाद होईल , आणि याचे गुन्हेगार तुम्ही आम्ही सगळेच असुत. हे ध्यानात घ्या.
No comments:
Post a Comment