Translate

Sunday, December 27, 2009


मार्केटिंग च्या या जगात, देवाच्या नावाखाली जनतेला लुबाडले जात आहे.आणि हे कटू सत्य सांगितले तर आमच्या श्रद्धेवर घाला घातला म्हणून (भक्त नाही) तर देवाचे दलाल ओरड करून सांगणाऱ्याचा निषेध करणार . धार्मिक स्थळे हि मोजमज्जा ( सभ्य भाषेत) करण्याची ठिकाणे झाली आहेत. अशी मंदिरे उभारून लोकांच्या अंधश्रद्धेचा गेरफायदा घेऊन गावोगाव हस्तक नेमून नवस केल्या वर कसा फायदा होतो याचा नियोजितपणे प्रचार केला जातो.भक्त येवू लागले म्हणजे मग पंचतारांकित सुखसोयी येतात, या सोयी आणि देव एकाच पकेज मध्ये मिळाल्यावर गर्दी होते. आपण कधी गंगा नदीवर गेला असाल तर आपणास याचा प्रत्यय येईल . पवित्र गंगेत स्नान करत असताना तेथील पुजारी आपल्या न कळत मोबाइल वर चित्रण करत असतात.देवाच्या पुजारयाला दलालाला  ब्लैक मनी दिल्याशिवाय देवाचे दर्शन होत नाही. असे दर्शन त्या देवाला आवडत असेल का? शनि मागे लागला हें ऐक असेच भोळ्या जनतेला, भक्ताला  फसवीण्याचे राजरोस साधन. शनिला देव मानल्या जाते.मग  देव भक्ताला का परेशान करेल, त्रास देईल . याचा कोणी विचारच करत नाही. मग रोज हजारो किलो तेल वाया घालवले जाते. आणि गणिताचा विचार केला तर सेकंदाला ऐक भक्ताचे दर्शन झाले तर 86400 भक्ताचे दर्शन ही होत नाही, यात देवाच्या आरामाचा,पूजेचा वेळ पकडला नाही , देव 24 तास काम करतो हा हिशोब धरला.तर मग 24 तासात २ ते ३ लाख भक्त कसे दर्शन घेतात आपणच हिशोब करा .



मटा ऑनलाइन वृत्त
पापक्षालन आणि पुण्यप्राप्तीच्या उद्देशाने लाखो श्रद्धाळू नागरिक तीर्थयात्रा करतात हा भारतीयांचा गैरसमज असल्याचा दावा ' ग्राम नियोजन केंद्र ' या स्वयंसेवी संस्थेने केला आहे. देशातल्या प्रचंड प्रसिद्ध असलेल्या मोठ्या तीर्थयात्रा आता सेक्सयात्रा बनत चालल्याचा निष्कर्ष संस्थेने काढला आहे. देशातील मोठ्या तीर्थयात्रांची बारकाईने पाहणी केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

शारीरिक सुखासाठी हपापले अनेकजण श्रद्धेच्या पांघरुणाखाली लपत तीर्थयात्रेतून फिरताना गुपचूप लैंगिक संबंध ठेवण्यासाठीच प्रयत्न करत असल्याचे ' ग्राम नियोजन केंद्र ' या स्वयंसेवी संस्थेचे म्हणणे आहे. केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्रालयासाठी तयार केलेल्या आपल्या अहवालात संस्थेने आपले निष्कर्ष स्पष्टपणे नमूद केले आहेत.

देशाच्या विविध भागांतून निघणा-या तीर्थयात्रांमध्ये भारतीयांप्रमाणेच परदेशातून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. मुद्दाम सेक्ससाठी या तीर्थयात्रांमधून सहभागी होणा-यांचे प्रमाण सध्या कमी असले तरी हळुवारपणे वाढत असल्याचे संस्थेने आपल्या पाहणी अहवालात सांगितले आहे. तीर्थयात्रांमधल्या तरुणांच्या वाढत्या संख्येवर बोट ठेवताना या गटात श्रद्धाळूंप्रमाणेच सेक्सयात्रींचे प्रमाणही मोठे असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.

तीर्थयात्रेचा सेक्स हब म्हणून वापर करुन घेणा-यांमध्ये परदेशी नागरिकांप्रमाणेच भारतीयदेखिल मोठ्या प्रमाणात आहेत. भारतीयांचा भर यात्रेच्या निमित्ताने घराबाहेर पडल्यावर वेश्यागमनाकडे जास्त आहे तर परदेशातून आलेले अनेक नागरिक मोठी रक्कम मोजून लहान मुलांचे लैंगिक शोषण करत असल्याचे ' ग्राम नियोजन केंद्र ' या स्वयंसेवी संस्थेने आपल्या अहवात स्पष्ट केले आहे. देशी-विदेशींसाठी देशातल्या निवडक मोठ्या तीर्थयात्रा या सेक्स हब झाल्या आहेत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

याआधी बंगळुरूच्या ' इक्वेशन्स ' या स्वयंसेवी संस्थेनेही देशातील मोठ्या तीर्थयात्रांमध्ये स्वैराचार वाढत असल्याचे एका पाहणी अहवालात नमूद केले होते. यात्रांमधून लहानग्यांचे मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण होत असल्याचे सांगत इक्वेशन्स या संस्थेने केंद्र सरकारकडे शोषण रोखण्यासाठी तातडीने कठोर उपाय करण्याची मागणी केली होती. तशीच मागणी ' ग्राम नियोजन केंद्र ' या स्वयंसेवी संस्थेने केली आहे.

तीर्थयात्रांमधून होणारे लहान मुलामुलींचे शोषण वाढत असून ते थांबवण्यासाठी कठोर कायदे करुन त्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. तीर्थयात्रेचे सेक्स हबमध्ये रुपांतर होऊ लागल्यामुळे भविष्यात तीव्र सामाजिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेऊन सरकारने यात्रांमधल्या गैरकारभारावर चाप लावण्याची गरज असल्याची मागणी अहवालाच्या माध्यमातून संस्थेने केली आहे.

2 comments:

Anonymous said...

लोकाना देवाची गरज का वाटते हा प्रश्र अधिक महत्त्वाचा आहे असे मला वाटते.

SShejale said...

Lokkanchya manat bhiti nirman keli geli ahe anya tya bhiticha phayada uthavala jato devachya navane