
कोंबड कितीही झाकले तरी सूर्य उगवणारच. त्या न्यायाने मुंबईचे कितीही मेकअप केले तरी मुंबई चा खरा भयानक बकाल चेहरा लपणार नाही , हेच या पाण्याने दाखऊन दिले. आख्या महाराष्ट्रातील वीज चोरून, होय चोरुनच!!! त्याला अंधारात लोटून मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हणावण्याच्या नादात आणि राजकीय स्वार्थात मुलभूत सोई कडे दुर्लक्ष झाले. त्याचा हा परिणाम आहे.याला कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत शिवसेना सुद्धा तेव्हढीच जबाबदार आहे. आवो चोरो लुटो सारा आधा तुम्हारा आधा हाम्हारा..!! असा महानगर पालिकेत कारभार चालू आहे. या वर बोलणे हा गुन्हा आहे . आणि जे बोलतात तेही राजकीय फायद्या साठी . जनतेचे कोणालाही कांही देणे-घेणे नाही. जनतेच्या मुलभूत प्रश्ना कडे लक्ष देण्या ऐवजी रेल्वे चा पाणी पुरवठा कमी करण्याचा महंमद तुघलकी निर्णय घेऊन सरकार आणि नोकरशाही मोकळी झाली आहे.या पेक्षा वाटर पार्क , रेन वाटर बंद करावेत . पंचतारांकित होटल चा पाणी पुरवठा कमी करावा.
भारतीय रेल्वे मध्ये सामान्य डब्ब्यात बसून या निर्णय घेनारया माणसांनी कधी प्रवास केला होता का? आधीच बकाल अस्वछ आसलेल्या डब्ब्यात नाक मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी आत्मःहत्या कराव्यात हाच सरकारचा उद्देश असावा यामुळे लोकसंख्या ही कमी होईल. महाराजांच्या काळात असा निर्णय घेतला गेला असता तर ... महाराजांनी आख्या मंत्री मंडळा सह नोकरशाहीस हत्तीच्या पायाखाली शिरच्छेदाची शिक्षा दिली असती व अपील करण्याची पळवाट न देता ताबोडतोब अमंलात आणली असती . जय महाराष्ट्र !!!
No comments:
Post a Comment