20)#@आज संपूर्ण वैद्यकीय व्यवसाय हा रुग्णांच्या करता नसून मेडीसीन उत्पादक, विमा कंपन्या डॉक्टर यांच्या नफेखोरी साठी चालवला जातो हे कटुसत्य आहे. आणि भारतातच नाही तर अमेरिकन पाच्शिमात्य नागरिक सुद्धा या प्रश्नाने हैराण केले आहे.ओबामाने ही हात टेकले. ८० % आजारपणा साठी सामान्य वैद्यकीय ज्ञान असलेला या शाखेची पदवी घेतलेला तज्ञ चालतो. पण हे सत्य लपवले जाते. असे डॉक्टर केवळ खेड्यातच नव्हे तर शहरात सुद्धा आवश्यक आहेत पण हि भ्रष्ट साखळी मोडण्याची ताकद आजच्या राजकर्त्यात नाही कारण सर्वांचेच हात बरबटलेले आहे
19)#@ भाविकांच्या श्रद्धेच्या पैश्या चा ठेका काय फक्त पुजार्यानीच घेतला आहे काय? आता तिरुपतीच्या मंदिरात प्रत्येक भागातून येणाऱ्या भाविकांसाठी वेगळी हुंडी बसवावी .त्यांनी आपल्याच हुंडीत पैसे टाकावे असा कायदा करावा.यामुळे कोणत्या भागातून किती दक्षिणा जमा झाली याचा हिशोब ठेवता येईल . आणि या हुंडीतील पैसा त्या त्या विभागा साठी खर्च करावा त्याच प्रमाणे भ्रष्टाचारी नोकरशहा, राजकारणी, काळा बझार करणारे व्यापारी यांच्या वेगळ्या हुंड्या ठेवाव्यात यातील दक्षिणे मधून या व्यवहाराची कल्पना येईल .
18)@#$%^& हे आहेत भारताचे खरे खुरे आयडॉल .युथ आयकॉन आहेत .कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन | मा कर्मफलहेतुर्भू: मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ||.या वृतीने काम करणाऱ्या अश्या सामान्य माणसामुळेच भारत माझा देश महान झाला आहे. प्रसाद काणे आणि त्यांच्या भारतीय समाज सेवा केंद्र सहकार्यांचे जाहीर अभिनंदन !! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अशी बातमी देऊन जगण्याची उर्मी दिल्याबद्दल आपले आभार .kanebandhu@sanchernet.in
17)@#$ शस्त्रक्रिया नको. त्या महागड्या दवाखान्याच्या बिलाचे टेन्शन नको .सरळ दोन पेग घेतली तर हृदया बरोबरच जगण्याचे टेन्शन खतम. आणि हो एक राहिलेच हा पुरातन भारतीय संस्कृतीचा विजय आहे आमच्या पूर्वजांना याची आधीच कल्पना होती म्हणून ते सोमरस पीत होते . असे नागपूरच्या संस्कृती रक्षक संघाने जाहीर केले.तर आमच्या साहेबाना जाणत्या राजास हे माहित असल्या मुळे आणि शेतकऱ्यांच्या शेत मालास जास्त भाव मिळावा या करता द्राक्षा पासून शॅंम्पेन' चे धोरण त्यांनी अमलात आणले. आता तर याच गुणधर्मा धान्या पासून दारू करणार आहोत
16)@#$% On 12/31/2009 11:23 AM Col. (retd) Sangram Mohite, London said: आदरणीय ठणठणपाळ, फार छान लिहिले आहेत तुम्ही. जे लोक राज ठाकरे , शरद पवार आणि राहुल गांधी सारख्या राजकारणी, श्रीमंत आणि selfish माणसांना ikon मानतात ; त्यांची एका दृष्टीने कीव येते , राग येतो . पण हि भीती वाटते कि जर सध्याची पिढी असे लोक ikon मानत असतील, तर देशाचे काय होणार ?
15)@#$ आपण कोणाचेही नाव सुचविले नाही , याचाच अर्थ आजच्या पिढी पुढे 'युथ आयकॉन' म्हणून कोणाचे नाव देण्याच्या लायकीचे नाही हे आपणास स्पष्ट माहित आहे. माझ्या मते आजच्या पिढीचा एकच 'युथ आयकॉन' आहे तो म्हणजे ..............
भारताचा "Common Man" हाच 'युथ आयकॉन' आहे . जो अनेक वादळास समर्थ पणे लढतो. कोणताही गाजावाजा न करता आपले काम करत असतो. या कॉमन मैन मध्ये तुम्ही आम्ही कोणीही
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |
मा कर्मफलहेतुर्भू: मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि || या वृतीने काम करणारा असू शकतो
14)@#$%^& केंद्रीय राजकारण्यांनी खासदार बंगला बळकाविण्याचा डाव घरा बाहेर सामान फेकून उधव्ळून लावला. राज्य राजकारण्यांनी शिर्डीत यांचे पंख ( आयाळ ) कापली . विधायक सामाजिक काम करण्याची कधी सवय नाही आता फक्त रस्त्यात उतरणे हिंसात्मक आंदोलना शिवाय हातात करत्या येण्या सारखे कांही कामच नाही आणि तसे केले नाही तर धंदा बंद होईल तत्वहीन राजकारणाचा हा नमुना आहे
13)#@मागास भागात अधिकारी जात नाही याचा अर्थ आपण राज्य करण्यास अपात्र आहात हेच सिद्ध होते .केवळ कायदा अधिक कडक कायदा करून प्रश्न सुटणार नाही. ज्या अधिकाऱ्यास बदली मंजूर नाही त्यास सरळ घरी बसविणे हा कायदा करा . बदल्या या संपूर्ण संगणीकृत डाटा फीड करून मानवी (राजकीय किंवा नोकरशाही) हस्तक्षेप होणार नाही या पद्धतीने करा आणि नियमाला पळवाट ठेऊ नका लोण्याच्या गोळ्याची अपेक्षा करू नका . मग बघा नोकर शाही कसे काम करते.ते
12)#@$%^& १९९१ मध्ये आर्थिक सुधारणांना हात घालताना जी इच्छाशक्ती त्या वेळच्या सरकारने दाखविली तशी अन्य क्षेत्रातील सुधारणांसाठी दाखविली पाहिजे. आहो ती हिम्मत दाखवणाऱ्या पतप्रधानांचे P. V. Narasimha राव यांचे नाव घ्यायला आजच्या सरकारला लाज वाटते.आणि हर मास्टर्स व्हाईस असलेल्या पंतप्रधाना कडून अपेक्षा करणे चुकीचे आहे आणि नोकरशहा हा कधी हि प्रहावा विरुद्ध प्रवास करत नाही
@#$%*& लोण्याच्या गोळ्या साठी भांडणाऱ्या २ लबाड मांजरा सारखी हि भांडणे आहेत. याही पेक्षा लोण्याचा गोळा गुरुजींनी पळविल्या मुळे व त्यात भाजपने भागीदारी केल्या मुळे कॉंग्रेस जास्त चिडली आहे.
11)##Gurur Brahma Gurur Vishnu, Gurur Devo Mahesh Varah. Guru Shakshat Para Brahma,Tasmai Shri Guruve Namah. भाजपच्या संस्कृती प्रमाणे भाजपने गुरुजीना मुख्यमंत्री केले . हा भाजपचा आदर्शवाद आहे. जनतेने हिंदू संस्कृतीचे पुनर:जीवन झाले म्हणून आनंद उत्सव गुढ्या उभारून केला पाहिजे पण आम्ही नत:ध्रष्ट आम्हाला गुरुजींचा इतिहासच आठवतो . वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी होतो आणि रामायण लिहितो हे आम्ही विसरतो. आता गुरुजी आणि गडकरी मिळून नवीन रामायण (रावणायन नाही हो) लिहितील
10)आदरणीय महापौर मुंबई, आपणास जनतेने निवडून दिले आहे.गेल्या १५ वर्षा पासून आपल्या पक्षाचे मुंबई महापालिकेवर राज्य आहे. मुंबई वर हि वेळ का आली याचे आपण चिंतन करावे या करता आपला मित्र पक्ष भाजप मदत करेल कारण चिंतन करण्यात ते मास्टर आहेत. आडातच नाही तर पोहोऱ्यात कुठ्न येणार अशी खेड्यात म्हण आहे .या म्हणी प्रमाणे आपण पाणी पुरवठ्या साठी काहींच व्यवस्था केली नाही तर अधिकारी कोठून हि पाणी आणू शकणार नाही. आजच्या परिस्थितीत एक दिवस आड पाणी बंद हाच उपाय आहे. महाराष्ट्राची वीज चोरून मुंबई चा मेकअप केला पण ..
9)%#@&* गडकरी साहेब ८ राज्यात आपले सरकार आहे असे आपणच म्हणाला होतात. आता आपण अध्यक्ष आहात. आपल्या अधिकारात बाकींच्या राज्यात गुजरात प्रमाणे सक्तीचे मतदान लागू करा म्हणून, पक्षा आदेश काढा पण फक्त स्थानिक संस्थे करता न ठेवता आमदार निवडणूक साठी ही लागू करा. हां तेव्हढ एक लहान काम आहे स्वच्छ राजकारणा च , वेळ मिळाला तर पहा . आता आपला हात लागल्या मुळे शिबू सोरेनन स्वच्छ झालाच ना. आता आंध्रा चे राज्यपाल एन. डी. तिवारी याना: ही पवित्र करुन घ्या. मागचे आपले जे मत होते ते विसरण्याचा त्रास होईल एव्हदेच आणिजनता तर विसरभोळी आहेच.आपल्या हातात कुजबुज गँग आहेच आपण सत्यवादी
आहे याचा गोबेल्स टाइप प्रचार करण्यास . कमी जास्त लिहाले तर माफी असावी. बीड मधील एक सामान्य कार्यकर्ता समजल ना
8)#@*& वा ! ताज ! भारतीयांच्या अपमान झाला म्हणून Jamsedji Tata यानी हे हॉटेल उभारले होते पण काळाचा महिमा पहा याच हॉटेल मध्ये ईतर पंचतारांकित हॉटेल मधे सामान्य भारतीय नागरिकास नेहमीच प्रवेशनाकारला जातो. आज अवचटं याना प्रवेश नाकारला म्हणून आपल्या मुख्य पानावर बातमी आली. प्रवेश नाकारण्याचाकायदा आहे का? येथे सर्व जाती-जमातीच्या लोकांना मुक्त प्रवेश आहे अशी पाटी हॉटेल मधे लावणे कायद्यानेबंधनकारक असताना याना व सामान्य माणसास प्रवेश कोणत्या कायद्या खाली नाकारला जातो. हे जनतेस समजले पाहिजे
7)#@@शिवसेनेने हा पहारा जनतेच्या मूलभूत प्रश्न सोडविण्या साठी केला असता तर मुंबई चे आणि पक्षाचे आज जे बेहालझाले, ते झाले नसते. या पेक्षा भ्रष्ट्र नगरसेवक, नोकरशाही आनाधिकृत बांधकामे यावर पहारा ठेवा म्हणजे येणार्यानिवडणुकात जनता तुम्हाला विचारेल. नाही तर परत मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला असे म्हणण्याची पाळीयेइल पण वेळ टळून गेलेली असेल. जय महाराष्ट्रा जय भारत !!
6)$#@&*भारतात लोकशाही आहे हे आपणास माहित नाही काय आणि मनमोहन यांचा बॉस अमेरिका जो पर्यंत परवानगी देत नाही तो पर्यंत काम कसे सुरु होणार?आणि भारत पाकीस्थान मध्ये हुकुमत करायची असेल तर अमेरिकेला नाराज करून कसे चालेल . वीज नाही पाणी नाही धान्य तुटवडा तरीही आम्ही बहुमताने निवडून आलो ना मग तेल नसले तर काय बिघडणार आणि चीन प्रमाणे आमच्या कडे हुकुमशाही नाही हं भ्रष्ट्राचारी लोकशाही आहे हे खरे आहे लापातागंज सारखा हा देश आहे कभी कभी काम भी होता है नही तो हमेशा हि है उसमे कोई बडी बात नही चलता है .
5)&*#@ आपण आपल्या बांधवांवर गेल्या २५०० वर्षात अन्याय केला हे सोईस्कर विसरून अमेरिकेत कसा न्याय आहे , याचे गोडवे गाण्यातच आजचा मध्यम वर्ग स्वताला धन्य समजत असतो. हा अमेरिकेत गेल्यावर अमेरिकेतील कायदे निमुटपणे पाळतो. पण भारतात आल्यावर येथील कायदे न पाळता तुलना करत बसतो. सिस्टीम ला बदलण्या साठी मतदानाचा अधिकार न वापरता फक्त दोष काढत बसतो. हीच याची शोकांतिका आहे.
4)*&%#@ कट प्रक्टिस कायदेशीर करावीच म्हणजे यातील काळा पैसा तरी उजेडात येईल आणि सरकारला कर भेटेल. पण याआधी डॉक्टर याला मान्यता देतील काय . असे झाले तर या धंद्यातील गुपिते बाहेर पडतील . आणि हे यांना परडवणारे नाही. जर या धंद्यात मेहनताना कमी भेटत असेल तर कोटी रुपये खर्चून मुलाने डॉक्टरच व्हावे असे या डॉक्टर पित्यास का वाटते. हेच कोटी रुपये बँकेत जरी फिक्स केले तर ७-८ वर्षात दुप्पट होतात आणि त्यावर व्याजा वर आरामात राहता येते. किंवा दुसरा उद्योग उभारून लोकांना काम देता येते.पण मेडी.कंपनी कडून काळा पैसा नाही मिळणार .
3)****उशिरा का होईना सरकारने हा निर्णय घेतला हे बरे झाले. यामुळे सरकारच्या मदतीने सेवाभावी संस्थेच्या नावाखाली शाळा काढून राजकारण करणाऱ्या शिक्षण सम्राटाना चाप बसेल. कारण स्पर्धे मध्ये जो चांगले शिक्षण देईल तोच शाळा चालवू शकेल. समाजानेही आता मानसिकता बदलणे आवश्यक आहे.ईतर सर्व गोष्टी महाग झाल्या तरी जीवनावश्यक शेतीमाल आणि शिक्षण मात्र स्वस्त: पाहिजे.मग यामुळे शेतीचे, शिक्षण क्षेत्राचे कितीही नुकसान होवो याची यांना परवा नसते.आणि अखेर हि किमत यांनाच भावी पिढ्याचे नुकसान करून चुकवावी लागेल हे लक्षात घ्याव
2)#%&**पहा !. पहा ! मीडिया उगीच भाजपावर संघा चे नियंत्रण आहे म्हणून खोट्या बातम्या पसरवत असतो.आता स्वतः अध्यक्ष नितीन गडकरी सुद्द्धा भाजपच्या कारभारामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हस्तक्षेप करत नाही, असे स्पष्ट केले. भाजपच्या अध्यक्षाची निवड पक्षाच्या घटनेनुसार झाली आहे, संघाने माझी नियुक्ती केलेली नाही. २००९ या संपत आलेल्या वर्षातील सर्वात सत्य वचना कडे आता तरी विनोदी न समजता मीडियाने गंभीरपणे पहावे.
आणि संघाचा व भाजपचा संबध नाही हे जनतेला सांगण्या साठी मोहीम राबवावी .
आपला विश्वासू , मी कायमस्वरुपी पक्षाचा कार्यकर्ता
एक सामान्य कार्यकर्ता...!! ??
1)या कायद्यांचा तुम्ही एकटे असताना हसण्या साठी उपयोग करा.प्लास्टिक पिशव्यांना बंदी . सार्वजनिक ठिकाणी दारू , सिगारेट पिण्यास बंदी. आम्ही अंतकवाद्यांचा कठोरपणे मुकाबला करू. चीन बरोबर लढाई करण्यास आम्ही समर्थ. देशातून गरिबी ( गरीब!!) हटवली जाईल. कोणीही उपाशी पोटी राहणार नाही. देशातून भ्रष्टाचार खतम करुत. आमच्या नितीमत्तेला जनतेने मान्यता देऊन आम्हाला निवडून दिले. हिंदीत लिहिलेल्या पत्रांना त्वरित उत्तर दिले जाईल . अमेरिकेला पुरावे देऊन पाकिस्तानला पराभूत करुत.महागाई कमी केल्या जाईल . भारत माझा देस
--
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.
No comments:
Post a Comment