सध्या
FB च्या अनेक साईटवर वर होळीला पाण्याची नासाडी, उधळपट्टी म्हणून होळी खेळू नका असे
आवाहन केल्या जात आहे.... त्याच बरोबर आम्ही होळी नाही खेळली तर दुष्काळग्रस्ताना पाणी
मिळणार आहे का?? आमच्या धार्मिक उत्सवावर बंदी घालणारे तुम्ही कोण ??? आमचा पैसा खर्च करून आम्ही पाणी,रंग
उडवले तर इतरांना विरोध करण्याचा हक्क नाही इत्यादी इत्यादी .......

याच वेळी कांही जनतेच्या हातात पैसा मोठ्या प्रमाणत आला, हम दो हमारे दो नाही तर एकच या त्रिकोणी कुटुंब व्यवस्थे मुळे समाज रचनाच बिघडवून गेली . लहान मुलाना कौटुंबिक आजी आजोबा, काका , काकू यांच्या नात्याचे प्रेम, आनंद माहित नाही. आणि आई वडील दोघे ही कामात अखंड बुडालेले . मग या प्रेमाची भरपाई म्हणून वीक एन्ड ला विकतचा कौटुंबिक आनंद सोहळा ही परदेशी कल्पना या बाजार भांडवलदारांनी अंमलात आणली ..... आणि मग जिथे सामान्य माणसाला एक साधी खोली घेणे शक्य नाही त्या मुंबईत या व्यापाऱ्यांनी हजारो करोडोचे बेकायदेशीर भांडवल ओतून मनोरंजनाची ही मायावी बेटे निर्माण केली. कृत्रिम पाऊस पाडण्याची यंत्रणा उभी करून लाखो गैलन पाणी गटारात वाहू लागले …. आणि या ठीकाणी पाणीच नाही तर शराब शबाब नशेची ओषधी यांचा महापूर वाहत असतो..........पण दुर्देवाने या पाण्याच्या नासाडी बद्दल कोणी ही बोलत नाही कारण भक्कम असलेली कुटुंब व्यवस्था उध्वस्त झाल्या मुळे नाईलाजाने ही कृत्रिम मनोरंजनाची बेटं आपल्या धकाधकीच्या जिवनशैली चा एक भाग झाली ….

केवळ माझ्या कडे पैसा आहे म्हणून मी माझ्या मनोरजना
करता पैश्याचा आणि पाण्याचा कसाही उपयोग नव्हे दुरुपयोग करेन त्यास इतरांनी उपदेश देण्याचे
कांही कारण नाही ही माजोरी वृत्ती जेंव्हा माणसाच्या अंगात पैश्याने येते तेंव्हा तो
दुष्काळ ग्रस्त भागातील स्त्रियांचे पाण्या करता होणारे हाल काय समजणार ??? मुंबईत
पुरवठा होणारे पाणी मुळातच ग्रामीण महाराष्ट्राच्या विविध वाहणारया नद्यांवर धरणे बांधून
अडविलेले पाणी आहे. मुंबई तर सर्व खारे पाणीच आहे. दुष्काळी ग्रामीण जनतेचा त्या पाण्यावर
पहिला हक्क आहे. पण मुंबईकर हे वास्तव उपभोगवादी संस्कृती मुळे विसरला आहे.
दोन दिवस पाणी नळाला आले नाही तर मुंबईत हाहाकार मजतो…। गेल्या वर्षीची पाणी कपात आठवा …. हेच पाणी जेंव्हा महीनो न महीने ग्रामीण भागात मिळत नाही तेंव्हा तेथील जनतेचे काय हाल होत असतील याचा विचार करा. पण मी माझा पैसा माझे कुटुंब या पलीकडे विचार करण्याची ताकदच या उपभोगवादी संस्कृती मुळे आपण सर्वजण गमावून बसलो आहोत.
मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हणावण्याच्या नादात आणि राजकीय स्वार्थात मुलभूत सोई कडे दुर्लक्ष झाले. त्याचा हा परिणाम आहे.याला कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत शिवसेना सुद्धा तेव्हढीच जबाबदार आहे. आवो चोरो लुटो सारा आधा तुम्हारा आधा हाम्हारा..!! असा महानगर पालिकेत कारभार चालू आहे. या वर जनतेने बोलणे हा गुन्हा आहे . आणि जे बोलतात तेही राजकीय फायद्या साठी . जनतेचे कोणालाही कांही देणे-घेणे नाही. जनतेच्या मुलभूत प्रश्ना कडे लक्ष देण्या ऐवजी रेल्वे चा पाणी पुरवठा कमी करण्याचा महंमद तुघलकी निर्णय घेऊन सरकार आणि नोकरशाही मोकळी झाली आहे.या पेक्षा वाटर पार्क , रेन वाटर बंद करावेत . पंचतारांकित होटल चा पाणी पुरवठा कमी करावा. अस कोणी म्हणत नाही…. हे कटू सत्य आपण नाकारू शकत नाही ……

आणि या सर्व अधोगती विचाराना आपली भ्रष्ट्र शिक्षण पद्धती जबाबदार आहे. जागतिककरणा नादात आणि पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्याच्या नादात आपण शिक्षणातून मानवी मुल्य , भारतीय संस्कृती , सामाजिक बांधिलकी , नैतिकता या गोष्टी पार हद्दपार करून टाकल्या … याचाच परिणाम मी जर पाण्याचा गैरवापर केला नाही , होळी खेळली नाही तर दुष्काळ ग्रस्ताना पाणी मिळणार आहे का?? असा उद्धट प्रश्न हे उपभोगवादी विचारतात …… यात त्यांची चूक नाही …। तर आपल्या समाज व्यवस्थेचा शिक्षणाचा हा पराभव आहे.
1 comment:
बरोबर!!
Post a Comment