(महत्वाची सुचना :- महाराष्ट्र सरकारने सध्या २०१३ जाहीर केलेल्या विना अनुदान मराठी शाळा वाटपाच्या जंगी कार्यक्रमाचा आणि या लेखातील ओसाडवाडी राज्याच्या महाराजांच्या शाळा वाटप योजनेचा अर्थाअर्थी कांही संबंध नाही . असलाच तर महाराष्ट्र सरकारने आमचा कार्यक्रम पळवला असे समजण्यात यावे.)
एक दवंडी ऐका हो ऐका ....… विना अनुदान मातृभाषा शाळां वाटपाचा जंगी कार्यक्रम….
डम डम डम डम ऐका हो ऐका ऐका … ऐका हो ऐका s s s s s s... ओ सखाराम , ए तुकाराम ... तात्या, नाना, मामा, काका, भावांनो, टग्यानो आणि सगळ्या गावकऱ्यानों , ताया-बायांनो ध्यान देऊन ऐका… परत परत दवंडी होणार नाही , कोणालाही परत संधी भेटणार नाही . लक्ष असु द्या ईकडे …. ओ ओ ओ ओ s s s s s
ओसाडगावा च्या महाराजांनी,महाराणी यांनी सर्व शिक्षण योजने अंतर्गत सर्व मुलाना शिक्षणाचा हक्क बहाल केला आहे. त्याच बरोबर मुलां मुलींना मोफत शिक्षण हक्क ही बहाल करण्यात आला आहे.…. याचाच परीणाम राज्यात शिक्षणा साठी शाळा कमी पडत आहे. या साठी महाराजांनी पैसा खर्च करण्याची ऐपत असणाऱ्या पालकांच्या मुलां मुलीं साठी बांधा, शिकवा, लुटा या तत्वा वर राज्यातील प्रत्येक खेड्यापाड्यात वाड्या तांड्या मध्ये विना अनुदानित शाळा या तत्वा वर मातृभाषा शाळा सुरु करण्याचे ठरविले आहे. या योजनेनुसार शाळा सुरु करण्याचे s s s s प्रस्ताव मागविण्यात आले आहेत .…ओ ओ s s s . शाळा प्रस्तावाच्या अटी नियम पुढील प्रमाणे आहेत .….
१ ) स्वच्छ कार्य प्रणाली साठी सर्व प्रस्ताव ई संगणक टेंडर प्रणाली द्वारेच दाखल करावे लागतील . आणि त्याची एक छापील पेपर प्रत (hard copy ) शिक्षणाधिकारया कडे सादर करावी लागेल .
२ ) आपणास शिक्षणाची आवड असावीच अशी अट नाही; आपणास शिकवता येत नसले तरी चालेल.
३) साखर, मद्द, भेसळ, भूखंड काळाबाजार सम्राट आणि वाळू , तेल माफियांना आपला काळा पैसा या शैक्षणिक धंद्यात गुंतवणूक पांढरा करण्याची आणि समाजात मानाने जगण्याची उत्तम संधी . अशी संधी आयुष्यात एकदाच मिळते . परतपरत ही संधी मिळणार नाही .
४ ) आपणा कडे फक्त १५ लाखं पांढरा पैसा आणि शाळा बांधकामा साठी १५ लाखं बँकेत जमा असणे आवश्यक आहे. आणि २ ते ५ एकर चा भूखंड बस्स…. आपण शाळा शिक्षण सम्राट होऊ शकता .
५ ) आपण कीती ही शाळांचे प्रस्ताव दाखल करू शकता फक्त त्या पटीत आपणा कडे पांढरा पैसा आणि भूखंड असणे आवश्यक आहे.
६ ) ज्या गावा करता, वाड्या तांड्या करता ऐका पेक्षा जास्त प्रस्ताव येतील; तेथे ज्याने सर्वात जास्त अनामत रक्कम भरली असेल त्याला शाळा बहाल करण्यात येईल . या करता जास्तीत जास्त अनामत रक्कम भरावी . कमीत कमी अनामत रक्कम १५ लाखं आणि त्या नंतर त्याच्या पटीत .
शाळा बहाल करण्याचे सर्व हक्क महाराजांच्या , महाराणींच्या , राजकुमारांच्या आणि राजकुमारींच्या वरिष्ठ शाळा शिक्षण समितीला असेल. एक कींवा सर्व प्रस्ताव मान्य करण्याचा कींवा नाकारण्याचा हक्क अधिकार फक्त या समितीलाच असल्या मुळे कोणीही मध्यस्त , दलाल मंत्री राजवाड्यातील कर्मचारयांना लाच, स्त्री मद्द आमिष देण्याचा प्रयत्न करू नये. असा प्रयत्न करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे . या अमिषासाठी स्वतःह महाराज,महाराणी, राजकुमार , राजकुमारी याना मध्यरात्री एकांतात भेटावे. या भेटी साठी आगाऊ वेळ आणि राजवाड्यात प्रवेश करण्याचा पास देण्याचा अधिकार फक्त या चौघांनाच आहे .
जाता जाता एक उघड गुपित सिक्रेट …… भविष्यात या विना अनुदानित शाळा माफियांच्या दबाबाने शिक्षकांनी परीक्षांच्या कामात असहकार, उत्तरपत्रिका न तपासणे , शिक्षकांचे साखळी उपोषण अशी आंदोलने केल्यावर विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या उज्ज्वल भवितव्या साठी या शाळा ना मांडावली, तोडपानी करून अनुदान देण्यात येईल . अर्थात त्याचा लगान वेगळा आकाराला जाईल .

No comments:
Post a Comment