Translate

Wednesday, March 6, 2013

नुरा कुस्ती ...एक लुटुपटीचा ; खोटा . खेळ ....


आजच्या संगणक पिढीला नुरा कुस्ती माहीत असणे शक्य नाहीं ...पण कुस्तीच्या आखाड्यात एके काळी नुरा कुस्त्या चांगल्याच गाजत असत... दोन पहेलवान मोठमोठया गर्जना करत एकमेकाना आव्हाने प्रति आव्हाने देत कुस्ती लढत ......पण मोठ्या प्रमाणात कुस्ती पाहण्यास जमलेल्या कुस्ती प्रेमींची मात्र कुस्ती संपल्या वर निराशा होई ..तुल्यबळ मल्लांमध्ये कुस्तीचे डाव रंगतील असा सुरुवातीला मोठा गाजावाजा होवून प्रत्यक्षातली लढत म्हणजे अगोदरच निकाल ‘फिक्स’ झालेली नुरा कुस्ती.. आपण फसवले गेलो आहोत हे त्यांच्या लक्षात येई.....कारण प्रचंड गाजावाजा करत झालेली ही कुस्ती हारजीत चा फैसला न होताच संपवली जाई..... कारण ही कुस्ती म्हणजे एक लुटुपटीचा ; खोटा . खेळ असे.




ही नुरा कुस्ती आज आठवण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील विद्या , संस्कृती चे केंद्र , माहेरघर असलेल्या पुण्यात या आठवड्यात मनसे v / s राष्ट्रवादी यांची होणारी कुस्ती.
सुरुवातीला राज ने जालन्याच्या प्रचंड जाहीर सभेत राष्ट्रवादीला जाहीर आव्हान दिले . मी आता इथे, २ तारखेला सांगतो, ७ तारखेला पुण्यात येत आहे.. पुण्यातले काकडे मला, म्हणतात, चार दिवस आधी सांगा पुण्यात येताना. मी आजच सांगतो. मी ७ तारखेला पुण्यात येणार आहे. हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा. मनसेची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले जात असून आम्हालाही जसास तसे उत्तर देता येते, हे विसरु नका, असा कडक इशारा राज यांनी दिला.ही पापं तुम्ही कुठे फेडणार, असा सवाल करत राज ठाकरे म्हणालेत, सत्ता हातात द्या, मग बघा विकास काय असतो ते. गडी बिथरलाय’ या अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेताना... राज ठाकरेंनी जनता सरळ घरात घुसून मारतील, असा सज्जड दमच भरला... ‘मी असं काय वावगं बोललो... काय चुकीचं बोललो.. माझ्या पेक्षा जनता तुम्हांला काय शिव्या घालतात ते पहा.. जशास तसे उत्तर देऊ म्हणे, या तर बघू मग... होऊन जाऊ दे... महाराष्ट्र काय यांचा बापाचा आहे.... …माझ्या ताफ्यावर दगडफेक कोण करतंय ? हे विसरू नका तुम्हीही रस्त्यावरून फिरतात. आमच्याकडूनही दगड येऊ शकतो. जशाच तसे उत्तर देण्यास मीही तयार आहे. गृहखाते,पोलीस बाजूला करा आणि मग लढा, दोन पायांवर सुद्धा परत जाऊ देणार नाही. तुमची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. हा सत्तेचा, पैशांचा नुसता माज चढलाय हा माज उतरावा लागेल असं सणसणीत उत्तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांना दिलंय.… तुम्ही 14 वर्ष जो महाराष्ट्रावर बलात्कार केलाय त्याची उत्तर कोणी द्यायची ? ……. अरे बाप रे बाप …….
 
राज ने आव्हान देताच पुण्याच्या राष्ट्रवादीच्या पहलवाना जोर चढला आणि साहेबांचा आदेश येण्या आधीच राज ने पुण्यात येऊनच दाखवावे असे प्रती आव्हान राज ला देण्यात आले.राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा व खासदार वंदना चव्हाण अंकुश काकडे यांनी विरोध केला , राष्ट्रवादीची ताकद दाखवून देऊ राष्ट्रवादीही जशास- तसं उत्तर देऊ शकते . राज यांना पुण्यात येऊ देणार नाही असा इशारा अंकुश काकडे आणि राष्ट्रवादीच्या लहान मोठ्या नेत्यांनी देण्यास सुरवात केली ……. अजित पवारसुद्धा या लढाईत उतरले. मनसेनं एक तरी संस्था उभी करून दाखवावी, नौटंकी बंद करावी, अशी टीका अजित पवारांनी राज ठाकरेंवर केली आहे. 'हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेवून मैदानात या' असं आव्हान उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला देत या कुस्तीला प्रोहस्थान दिले. ह्या राड्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर होणाऱ्या टीकेवर त्यांनी राज ठाकरेंना सुनावलं. तर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी मात्र मी आवाहन करुन कार्यकर्ते थांबणार नसल्याचं सांगत राडा होणारच असे जाहीर केले.
आता पुण्याला जंगी कुस्ती होणार म्हणून समस्त मराठी माणूस ७ तारखेची आतुरतेने वाट पाहू लागला. हजारो कार्यकर्त्यांचा , महिलांचा उत्साह पाहून प्रतिस्पर्धी पहिलवानान चे बाहू फुरफुरू लागले. आता पर्यंत कोल्हापूरच्या लाल मातीत होणारया रांगड्या पहेलवानांच्या कुस्त्या पाहण्याची सवय असलेल्या मराठी माणसाना पुण्याच्या सदाशिव पेठी संस्कृती असलेल्या शहरात होत असलेल्या कुस्ती पाहण्याची उत्सुकता लागली होती ……. ढोल ताशे नगारे डीजे झांज-टिप-या आणि लेझीम यांच्या संमिश्र नादाने महाराष्ट्र दुमदुमु लागला………
हा आवाज आयुष्यभर बेरेजेचे राजकारण करत आता दिल्ही दरबारात पंतप्रधान पदाची स्वप्ने पहाणारया साहेबांच्या कानी मोठा जाळ करून गेला. त्यांच्यातला राजकारणी जागा झाला ……… एका नवख्या पहेलवाना बरोबर कुस्ती करणे आणि केल्यावर हारणे हे धोकादायक ठरू शकते; हे लक्षात येताच साहेबांनी पुण्यात फोन लावणे सुरु केले. कार्यकर्त्याना योग्य तो संदेश दील्या नंतरच साहेबाना मध्यरात्री गाढ झोप लागली….
 
सकाळी सकाळी आलेल्या वर्तमान पत्रांचे हेडींग पाहून प्रतिस्पर्धी कार्यकर्त्ये हिरमुसले झाले. राज याना पुण्यास येण्यास आमचा विरोध नाही त्यांनी फक्त दुष्काळाचे राजकारण करू नये म्हणत त्यांचा राज यांच्या दौऱ्यास परवानगी दीली ……. आता राज एकतर्फी कुस्ती जिंकल्यातच जमा आहे असे मनातल्या मनात मांडे खात असलेल्या मनसे कार्यकर्त्यांवर राज यांनी आणखी एक बॉम्बगोळा टाकला….
राज ठाकरे यांनीही नरमाईची भूमिका घेत पुण्याचा दौराच रद्द केला. पुण्यात आपली सभा नव्हतीच, केवळ अंकुश काकडे यांनी आव्हान दिल्याने पुण्याच्या ‘वैशाली’ त जाऊन डोसा खाऊन परत येणार होतो, पण आता तो ही बेत रद्द केल्याचे राज ठाकरे यांनी मंगळवार स्पष्ट केले. शरद पवारांबाबत आदर व्यक्त –
 
मराठी माणसाची मात्र आपणास फसविले गेलो ही भावना झाली . फक्त वर्तमान पत्रात मिडीया मध्ये रंगवलेली नुरा लुटुपुटु ची खोटी खोटी कुस्ती होती . हे त्याच्या लक्षात आले.

No comments: