Translate

Monday, March 11, 2013

हुरळली इंडियन मेंढी लागली अमेरिकन लांडग्याच्या मागे अशी झाली आहे. ………



ज्या अमेरिकेत प्रत्येक सहाव्या मिनिटाला  एका अमेरिकन महीलेवर बलात्कार होतो , आणि ५ पैकी एका महीलेवर आयुष्यात कधीना कधी एकदा तरी बलात्कार झालेला असतो, ज्या अमेरीकेत पुरुष सैनिक आपल्याच सहकारी महीला सैनिकावर बलात्कार करण्यात बदनाम झालेले आहेत त्या अमेरिकेने  जागतिक महिला दिनी ८ मार्च २०१३  रोजी दिल्लीमध्ये गेल्या वर्षी धावत्या बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणाची बळी ठरलेल्या 23 वर्षीय तरुणीला अमेरिकेमध्ये आंतरराष्ट्रीय महिला साहस पुरस्काराने गौरविण्यात आले.. तीच्या वर अत्याचार झाला ती पुरुषाच्या वासनेला बळी पडली तीचा जीव गेला आणि हे राजकारणी तीचा जागतिक साहसी महीला म्हणून गौरव करत आहेत. अमेरिकेने आपल्या स्वतः च्या देशातील बलात्कारी महिलेचा असा पुरस्कार देवून कधी गौरव केला नाही.. आणि कोणताही संवेदनाशील देश (इंडिया सोडला तर)  अश्या लांच्छनास्पद कृत्याला राष्ट्रीय अभिमानाचा विषय बनवणार नाही. पण आमची अवस्था  हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या मागे या म्हणी प्रमाणे  हुरळली इंडियन मेंढी लागली अमेरिकन लांडग्याच्या मागे  अशी झाली आहे. ………

ही बातमी आणि गेले तीन महिने या बलात्कारावर आपले राजकारणी , साधुसंत, सेलिब्रेटीज आणि भांड मिडीया ज्या तऱ्हेने बेताल बडबड करत आहेत, बातम्या देत आहेत त्या वाचल्यावर १७/ १८ शतकात मेलेल्या नवरया बरोबर जिवंतपणी जाळल्या जाणाऱ्या, सती जाणारया स्त्रीयां वरील अत्याचारांची  आठवण झाल्या शिवाय राहत नाहीं . स्त्रीला जिवंत जाळून मारायचे आणि वर ती सती गेली म्हणत तीचे मंदीर उभे करत तीची पूजा करायची तसाच हा प्रकार झाला आहे. 








 
अत्याचार करणारा क्रूर बलात्कारी बाल वयाचा म्हणून त्यास सौम्य शिक्षा द्या म्हणणारे मानवतावादी याच देशात राहतात   मेलेल्या प्रेतावरील टाळूचे लोणी खाणारे आपले बेईमान भ्रष्ट्र राजकारणी , सेलिब्रेटीज आणि मिडीया मात्र झालेल्या बलात्कार आणि त्याच्या बातम्यांचा  आपल्या फायद्या साठी दुरुपयोग करत आहेत ......असला दांभिकपणा, हलकटपणा  फक्त इंडियातच होऊ शकतो.

सती गेलेली बिचारी महीला जळून जाऊन एकदाच मरून जात होती.  पण बलात्कार झालेली महिला जर दुर्देवाने जिवंत राहिली तर तिला जगण्या पेक्षा मेले असते तर बरे झाले असते असे वाटायला लागते.  तीची अशी दुरावस्था मिडीया,समाज आणि आपली न्यायव्यवस्था करते . त्याच बरोबर आरोपीचा बचाव करताना पीडीत महीलाच  बदचलन होती असा आरोप सरास केला जातो. बलात्कार कसा झाला , आरोपीने कोठे हात लावला, कसा लावला इत्यादी अवमानकारक प्रश्नाची सरबती करत आरोपीचे कायदेपंडित वकील  त्या महीलेवर भर न्यायालयात न्यायधीशांच्या साक्षीने शाब्दिक बलात्कार करत आपली असुरी कामवासना भागवत असतात.  बलात्कारी आरोपीस सजा कोणती द्यावी याची वर्षानुवर्षे नुसती चर्चाच होते….

इंडिया हे जागतिक मेडिकल हब , मेडिकल टुरिझम झाले आहे म्हणून स्वतः ची पाठ थोपटून घेणारया इंडिया सरकारने जनतेच्या तीव्र रागाला, क्षोभा ला घाबरून ( क्षोभ हिंदी भाषा का एक शब्द है जिस का अर्थ होता है बहुत अधिक मात्रा में गुस्सा आना| यह क्रोध का अंतिम चरण होता है जिसमें मनुष्य अपने सारे आपे खो कर बुरीई तरह पागल हो जाता है तथा जो कुछ सामने आये, उसे नष्ट कर देने की इच्छा होती है|) बलात्कारी महिलेला अत्याधुनिक उपचाराच्या नावा खाली सिंगापूरला पाठवून दिले. आणि निश्वास सोडला . 

मिडीया बलात्कारी बातम्यांची ब्रेकिंग बातमी सतत क्लिप सह २४ तास दाखवत प्रेक्षकांना, त्यांच्या वैषयिक भावनाना  चेतावत असतो.   जात धर्म प्रांत शहर खेडे या वरून अश्या बातमीचे महत्व  ठरवले जाते.  वन्य श्वापदांच्या मागे धावणाऱ्या  क्रूर लांडग्या प्रमाणे ,२४  तास ब्रेकिंग न्यूज च्या पाठीमागे धावणारा मिडीया ब्रेकिंग बातम्या साठी बलात्काराची खोठी बातमी तयार करण्यास मागे पुढे पाहणार नाही असे वाटावे इतकी परिस्थिती भयानक झाली आहे.

राष्ट्रपतींनी या बलात्कारी पिडीत महिलेचा शूरवीर नायिका म्हणून गौरव केला. हीचे बलिदान वाया जावू देवू नका म्हणत देशाला साद घातली तर यांच्या दिवटया  चिरंजीवांनी तर दिल्ली बलात्काराच्या घटनेमुळे आक्रमक झालेल्या महिलांनाच लक्ष्य केले. रात्री डिस्को थेकमध्ये जाऊन दिवसा मेणबत्त्या लावणाऱ्या ' डेंटेड अँड पेंटेड ' महिला अशा शब्दांत त्यांनी आंदोलकांची संभावना केली. या घटनेनंतर बेजबाबदार वक्तव्यांची सुरुवात झाली , ती अर्थातच स्त्रियांना उपदेश करण्यापासून. स्त्रियांचे कपडे या आतापर्यंत अनेकदा घासून गुळगुळीत झालेल्या विषयाला भारतीय जनता पक्षाचे आमदार बनवारीलाल सिंघल यांनी तोंड फोडले. स्त्रियांनी लक्ष्मणरेषा ओलांडली , तर रावण बसलेला आहेच , या शब्दांत त्यांनी आपल्या अक्क्लेचे तारे तोडले . भाजप ची मानसिकता अजून ही रामायणातून बाहेर पडावयास तयार नाही .  मध्य प्रदेशातले भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनीही स्त्रियांनाच मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला. या सर्वांवर कडी म्हणजे आसाराम बापू. टाळी एका हाताने वाजत नाही वगैरे म्हणी वापरून त्यांनी बलात्काराची जबाबदारी पीडित मुलीवरही ढकलली. या मुलीने समोरच्या पुरुषांना भाऊ मानून विनवणी केली असती , सरस्वती मंत्र म्हटला असता , तर ही आपत्ती ओढवली नसती , अशी बाष्कळ विधानं करून आसाराम बापूंनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी दाखवून दिली. युवती आणि महिलांवर होणारे बलात्काराचे प्रकार समजू शकतो ; पण लहान मुलींवरील असे अत्याचार करणे सर्वाधिक वाईट कृत्य आहे . असे कृत्य करणाऱ्यांना फाशीच दिली पाहिजे , असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री रमेश बैस यांनी केले . बलात्कार ' इंडिया ' त होतात , ' भारता ' त नाही . हा पाश्चात्त्य संस्कृतीचा परिणाम आहे . असे अक्क्लेचे तारे डॉ . मोहन भागवत , सरसंघचालक , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी तोडले . तर  दिल्लीत बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेला बिहारमधून दिल्लीमध्ये स्थलांतरीत झालेलेच जबाबदार असल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगून टाकले .  औरंगजेबाच्या घोड्याना जसे  संताजी धनाजी प्रमाणे दीसत होते तसे सर्वच  ठिकाणी राज याना  बिहारीच दिसतात म्हणे !!!!!

तर मी ममता बॅनर्जींना विचारू इच्छितो की , बलात्कार करवून घेण्यासाठी त्या किती नुकसानभरपाई घेणार ? अनीसुर रहमान , प . बंगालचे मार्क्सवादी आमदार महिलांविरोधातील गुन्ह्यांवर आमच्याकडे उपाय नाही . त्यांचे सध्या ग्रहच फिरले आहेत , त्याला कोण काय करणार ? ही परिस्थिती कधी बदलणार ते फक्त ज्योतिषीच सांगू शकतील .
नानकी राम कंवर , छत्तीसगडचे गृहमंत्री  या सर्व वक्तव्या मुळे बलात्काराचे गांभीर्य मात्र कमी झाले . 
कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया दुखः व्यक्त करण्या करता सफदरजंग दवाखान्यात जातीने हजर झाल्या. ( रात्रंदिवस महात्मा गांधी च्या नावाने जप करणाऱ्या कॉंग्रेस आणि सोनिया गांधीना; ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये लागू करण्यात आलेला लष्करी विशेषाधिकार कायदा (AFSPA) मागे घेण्यात यावा यासाठी गांधीजीच्या अहिंसात्मक उपोषणा  च्या मार्गाने  गेल्या  १२ बारा वर्षांपासून उपोषण करीत असलेल्या  शर्मिला इरोम  या  सच्चा भारतीयास भेटण्यास वेळ मिळत नाही . तिच्या नाकात नळ्या लावून अन्न जबरदस्तीने भरवल्या जाते.  आणि उलट तीच्या वरच आत्महत्तेचा गुन्हा केला म्हणून खटला भरणारे हे सरकार अश्या बलात्कार जातीय, धार्मिक  दंगे झाले तर मतांच्या लाचारी साठी धावून जाते ) आणि कडी से कडी सजा देणे चा वायदा केला. तशी पत्रे ज्या शिला दिक्षिताना आपली मुलगी दिल्लीत सुरक्षित नाही हे कटू सत्य पचवता येत नाही तीला आणि गृहमंत्र्याला ज्याला बॉम्ब स्फोटाची आगाऊ माहीती मिळवून देखील ते थांबवता आले नाही त्यानां पाठविले. आता ही  कडी से कडी म्हणजे काय हे हीच्या सरकारी कायदेपंडिताना आज तारखे पर्यंत ठरवता आलेले नाही हे लक्षात घ्या.  
मग मुलायम पुत्र तरी मागे कसे राहणार मेलेल्या मढ्याच्या टाळू वरील लोणी खाणाऱ्यांच्या  जमातीत मोडणाऱ्या मुख्यमंत्री अखिलेश  यादव यांनी पीडीत महिलेच्या घरच्यांना रुपये २०  लाख मदत जाहीर  केली . संपूर्ण ओषध उपचाराचा खर्च सरकार करेल जाहीर केले. यांच्या काय बापाच्या खिशातून पैसा थोडा खर्च होणार जनतेचाच पैसा.  तीच्या घरातील एकास सरकारी नौकरी देण्याचे आश्वासन दीले  ….  अजून २-३ राज्यांनी लाखोची मदत जाहीर करत स्वतःहाचा उदारपणा जाहीर करत नार्काश्रू ढाळले .

सिंगापूर मध्ये जीव तोडून सर्व प्रयत्न करून हि निर्भया जिवंत राहीली नाही . परत जन क्षोभ अनावर झाला . सरकारने तातडीने एक खास विमान तीचे प्रेत आणण्यासाठी सिंगापूरला पाठवले . बलात्कारा नंतर आणि मेल्यावर तीला विमान प्रवास घडवण्यातच सरकारला धन्य वाटले . 

इंग्लंड विरुद्ध खेळलेल्या २०-२० क्रिकेट सामन्यात  युवराज सिंह याला मिळालेला मैन ऑफ दी मैच पुरस्कार याने दिल्ली मधील बलात्कार पिडीत महीलेला समर्पित केला म्हणे . पुरस्कार समर्पित केला म्हणजे काय होते हे मला अजुन पर्यंत समजलेले नाहीं . मिळालेला पैसा मात्र हे खिलाडू कधी समर्पित करत नाही . फक्त बोलाची कढी आणि बोलाचाच भात अशी यांची प्रवृत्ती . नशीब या निर्भया च्या नावाने रात्रंदिवस २०-२० क्रिकेट मालीका यांनी सुरु नाही केली .
या बलात्काराचा सरकारने  इतका धसका घेतला की त्याचे परिणाम रेल्वे अर्थसंकल्प  आणि आर्थिक अर्थसंकल्पावर झाले . तीच्या नावाने निर्भया एक्स्प्रेस बलिया ते दिल्ली चालू करण्याची घोषणा करण्यात आली . तर चिदंबरम यांनी स्त्रियांच्या सुरक्षितेते साठी वार्षिक अर्थ   संकल्पात रुपये १००० कोटी चा निर्भया स्थापित केला. आणि सरकारचे बलात्कारा बद्दलचे दायित्व संपविले . 
हा सर्व गोंधळ कमी होता की काय म्हणून हिंदी सिनेमा जगत  या बलात्कारात उतरले .  दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना स्वतःला सुधारण्याची संधी मिळावी, अशी मागणी अभिनेता राहुल बोस याने केली आहे. महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी आणि स्त्री-पुरुष समानतेसाठी या आरोपींना काम करण्याची संधी दिली जावी, असेही त्याने सांगितले आहे. राहुल बोस म्हणाला, की जर आपला समाज सभ्यतेकडे वाटचाल करीत असेल ( कोणता सभ्य समाज बरे याला अभिप्रेत आहे. ) जर आपण भारता पलिकडच्या संस्कृतीचा विचार करीत असू तर आपण माफीचा नक्कीच विचार करायला हवा. अशी ही मुक्ताफळे याने उधळली . नशीब बाकी भट्ट कंपनी बोलली नाही. बहुतेक त्याना बलात्कार हे रोजचेच काम असल्या मुळे फारसे कांही वाटले नाही 
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणावर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणाला बंगाली चित्रपट निर्माते अग्निदेव चटर्जी यांनी सुरुवात केली आहे. 'अ पॉलिटिकल मर्डर' असे या चित्रपटाचे नाव आहे. महेश भट्ट च्या तोंडाचा घास याने पळविला . पण सन्नी लियोन ला घेवून भट्ट नवीन सिनेमा याच थीम वर काढत आहे.

बलात्कार पिडीताच्या बलिदाना नंतर ही दिल्ली मधील बलात्काराचे तांडव थांबण्याची कांही चिन्हे दीसत नाही . उलट बलात्काराचे प्रमाण अधिक वाढले . बलात्काराष्ट्र हीच दिल्ली ची नवी ओळख झाली आहे. 

No comments: