भगवा दहाषदवाद आज भारतात पसरत आहे असे वक्तव्य करणाऱ्या पी .चिदंबरम यांना, या मंत्र्याचे डोके ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल करत आज लोकमान्य टिळक यांनी स्वतः निवडून दिलेल्या लोकशाही सरकारची हजेरी घेतली असती. पण आजच्या बाजारू वर्तमान पत्राच्या संपादकाची असे लिहिण्याची हिम्मत नाही. गडद भगवा रंग हा त्यागाचं प्रतीक म्हणून वापरला गेला आहे. पांढरा रंग प्रकाश, सत्येची वाट दर्शवण्यासाठी वापरला आहे. तर हिरवा रंग हरित झाडे व शेती दर्शवतो. याच शेतीवर कोट्यवधी हिंदुस्थानींंचे जीवन अवलंबून आहे. तसेच अशोकचक्र हे या ध्वजाखाली राहणार्या हिंदुस्थानींनी सत्येची कास धरावी यासाठी वापरले आहे.
पण आज दुर्देवाने भगवा रंग हिंदूचे आणि हिरवा रंग मुसलमान धर्माचे प्रतिक म्हणवल्या जात आहे. देशात जो आंतकवाद, दहशदवाद काश्मीर पासून कन्याकुमारी आणि मुंबई पासून कलकत्त्या पर्यंत पसरला आहे त्याला आळा घालण्यास केंद्र सरकार संपूर्णतः अपयशी ठरले हे अपयश लपवण्यासाठी खुद: भारताच्या गृहमंत्र्यांनी भगवा आंतकवाद,दहशदवाद भारतात पसरत आहे म्हणत हिंदुनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्या चा प्रयत्न केल्या मुळे चोर सोडून संन्यासाला बळी देण्याचा हा प्रकार आहे. प्रत्येक घटना मतांच्या हिशोबाने पाहीली जात असल्यामुळे भाजपने, शिवसेनेने जसे या वक्तव्याचे राजकारण सुरु केले तेंव्हा मतांचा धोका ओळखून कॉंग्रेस ने ही हे पक्षाचे मत नाही म्हणत पी.चिदंबरम यांना मंत्र्यांनी जबाबदारीने वक्तव्य करत जावे म्हणत तो मी नव्हेच असा पवित्रा घेतला.
महत्वाचा मुद्दा हा भगवा दहशतवाद का निर्माण झाला . याची कांही कारणे असतील का याचा अभ्यास करण्याची तसदी ना विरोधी पक्षाने केली ना सत्ताधारी . मुळातच हिंदू हा सहिष्णू आहे तलवारीच्या टोकावर धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न हिंदुनी कधीही केला नाही. मग हा भगवा दहशदवाद का निर्माण झाला. हा निर्माण होण्यास कॉंग्रेस राज्यकर्त्यांचे मुस्लीम दहशतवाद विरूद्धचे कमजोर धोरण कारणीभूत आहे. पाक दहशदवादी गेल्या ६० वर्षा पासून काश्मीर जाळत आहे , या दहशतवाद्यांनी भारतात मुंबई,पुणे येथे कित्येक वेळा हल्ले केले, कारगिल हल्ला केला एव्हढेच नव्हे तर भारतीय संसदेवर सुद्धा हल्ला केला.या सर्व प्रसंगी केंद्र दहाषदवाद्यांचा खातमा करण्यास पराभूत ठरले. किंबहुना मतांच्या घाणेरड्या राजकारणा मुळे केंद्राने कणखर भूमिका कधीच वठवली नाही. यातूनच केंद्र विरुद्ध च्या रागामुळे हिंदुनी सुद्धा दहशदवादी कृत्य करण्यास सुरुवात केली. यातूनच ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत घडलेल्या बाबरी मशिदीच्या ... बाबरी विध्वंसाची चोकशी धीम्या गतीने आज १८ वर्षा नंतरही चालतच आहे सर्व राजकारण्यांनी मिळून भारतात एक वाईट पायंडा स्वतः च्या फायद्या साठी पाडून ठेवला आहे. राजकारण्यावर कितीही मोठा गुन्हा नोंदवला गेला तरी त्यास निवडूक लढवण्यास बंदी नाही. याचाच गेरफायदा घेत .मधल्या काळात बाबरी विध्वंस करणारे सत्तेत येवून सुद्धा गेलेत. चारा घोटाळा करणारे लालू ,शिबू सोरेन, कोडा,राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस चे अनेक गुन्हेगार नेते राष्ट्रीय नेते म्हणवतात आणि वर्षानुवर्ष जेल मध्ये राहून निवडून येतात. यांची खरी जागा जेल पण हे संसदेत बसून देशाचा कारभार करतात,धोरणे ठरवितात, पगार वाढवून घेतात.पण शासन करत नाही. या सर्वाचा दुष्परिणाम जनतेवर झाला आणि जनतेनेच स्वरक्षण करण्या साठी प्रति दहशवाद सुरु केला . यास अनेक पक्षांचा हातभार , पाठींबा आहे. पण स्वतः ला निधर्मी मानणारे जसे यांच्या पासून हात झटकतात तसेच हिंदुधर्मीय पक्ष सुद्धा विश्वामित्री पवित्रा घेतात. हीच हिंदूधर्माची शोकांतीका आहे.
मध्यंतरी जालावर ठणठणपाळ तुम्ही भगवा रंग ,हिरवा रंग मानता का नाही? हे आधी सांगा .म्हणत म्हणत माझ्या वर हल्ला केला. .पण मी मानवाच्या रक्ताचा लाल रंग फक्त मानतो इतर कोणताही रंग मानत नाही म्हणाल्या बरोबर ठणठणपाळ हे अमेरिकन एजंट असून भारतात फुट पडत आहे. असा अजब आरोप केला गेला. आता हा सगळा भगवा , हिरवा दहशदवाद पाहून माझे मत चूक की बरोबर हे तुम्हीच ठरावा. अहिंसेच्या नसबंदी मुळे मने सुद्धा कमजोर झाली आहेत. ठण२पाळ याला किडन्याप काय त्याला मारून ही कांही उपयोग होणार नाही. त्याच्या लाल रक्ताच्या एका थेंबातून लाखो ठण२पाळ जन्म घेतील. इतका माझा आत्मविश्वास आहे. अनेक प्रतिक्रिया आल्या .पण नेहमी प्रमाणे ठण२पाळ याला झोडून काढण्या पलीकडे कांही विचारच झाला नाही. बरोबर आहे म्हणा ताकही फुंकून पिणारे आपण या पेक्षा दुसरा विचार काय करणार
Thanks & regard,Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.
4 comments:
ठणठणाट
प्रेषक प्रियाली (शुक्र, 08/27/2010 - 15:11)
ठणठणपाळ द ग्रेट अमेरिकन एजंट उर्फ पालथ्या घड्यावर पाणी.
ठऽणऽऽऽठऽणऽऽऽठऽणऽऽऽठऽणऽऽऽ
दुसरी बाजू
प्रेषक रिकामटेकडा (शुक्र, 08/27/2010 - 16:23)
नक्षलवाद्यांविषयी भुई धोपटूनही वेदांतच्या खाणींविषयीचे वाद संपत नाहीत असे बघून चिदंबरम यांनी मऊ माती खणायला घेतली आहे.
आक्रसताळ
बाजू
प्रेषक आरागॉर्न (शुक्र, 08/27/2010 - 16:36)
श्री. ठणठणपाळ हे नेमके कुणाच्या बाजूने आहेत आणि कुणा(कुणा)च्या विरोधात आहेत हे कसे शोधावे बरे?
सोप्पे आहे पण....
प्रेषक प्रियाली (शुक्र, 08/27/2010 - 16:43)
सोप्पे आहे पण यादी न संपणारी आहे.
1. हिंदू x मुसलमान - ठणठणपाळ हिंदू
2. हिंदू x बौद्ध - ठणठणपाळ बौद्ध
3. हिंदू x ख्रिश्चन - ठणठणपाळ हिंदू
4. तथाकथित उच्चवर्णिय x तथाकथित मागास - ठणठणपाळ मागास
5. भारत x पाकिस्तान - ठणठणपाळ भारत
6. भारत x अमेरिका - ठणठणपाळ भारत (म्हणजे ते कुठले एजंट आहेत ते कळू नये म्हणून)
7. भारत x इंडिया - ठणठणपाळ भारत
8. शहरी x ग्रामीण - ठणठणपाळ ग्रामीण
9. भाजपा x साम्यवादी - ठणठणपाळ साम्यवादी
10. काँग्रेस x साम्यवादी - ठणठणपाळ साम्यवादी
11. भाजपा x काँग्रेस - ठणठणपाळ भाजपा
12. काँग्रेस x भाजपा - ठणठणपाळ काँग्रेस
यादी संपत नाही. थकले!!
विस्तृत
प्रेषक आरागॉर्न (शुक्र, 08/27/2010 - 16:49)
विस्तृत टंकनाबद्दल आभार.
इथे 'पानी रे पानी तेरा रंग कैसा' हे गाणे आठवले. :)
फरक
प्रेषक प्रियाली (शुक्र, 08/27/2010 - 17:05)
ते कधी कोणाची आणि का बाजू घेतात हा फरक मला कळला असता तर मीही अमेरिकेची एजंट झाले नसते का!
मला डावी बाजू उजवी बाजू असे करायचे होते पण पूर्ण लिश्ट लिहिल्यावर काही ठिकाणी ते तसे नाही हे कळले आणि पुन्हा टंकायचा कंटाळा आला.
शशी थरूर वि. ललित मोदी
प्रेषक प्रियाली (शुक्र, 08/27/2010 - 17:12)
सांगा; शशी थरूर वि. ललित मोदी - ठणठणपाळांची बाजू?
सुनन्दा
प्रेषक असा मी आसामी (शुक्र, 08/27/2010 - 17:15)
सुनन्दा
जुनी मागणी
प्रेषक रिकामटेकडा (शुक्र, 08/27/2010 - 17:14)
त्यांना आपण किडनॅप करून बंद करून ठेवू शकतो का? जेणेकरून बटबटीत लेखांचा रतीब कमी होईल? तर मी पाररेट पायरेट खेळायला तयार आहे.मानवतावादी
प्रेषक प्रियाली (शुक्र, 08/27/2010 - 17:15)
तशी मागणी आधीही झाली होती.
धन्यवाद.
तिथे ते मानवतावादी होते हे ही कळले. ;-)
यशस्वी लेखक
प्रेषक असा मी आसामी (शुक्र, 08/27/2010 - 17:11)
ठण२पाळ हे सर्वात यशस्वी लेखक आहेत. त्यांच्या प्रत्येक लेखाला/चर्चेला खूप प्रतिसाद मिळतात.
Post a Comment