Translate

Monday, August 9, 2010

भ्रष्ट्राचाराचा देशभावनेशी संबंध जोडणे योग्य आहे का?

राष्ट्रकुल खेळा च्या भ्रष्ट्राचारा ची धुणी धुवत देशाच्या इज्जतीची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली जात असताना, इतके दीवस ७ वर्ष खेळाची तय्यारी होत असताना आपला कांही संबंध नाही अश्या तोऱ्यात गप्प बसणाऱ्या सरकारला आता वाईट परीस्थीतिची जाणीव झाली. प्रकरण आपल्या अंगावर शेकणार आहे हे लक्षात आल्यावर तडकाफडकी संयोजन समितीच्या ४ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. आता मोठे शार्क मासे वाचवण्याची damage control An effort to minimize or curtail damage or loss. मोहीम जनतेच्या देशभावनेस आवाहन करत सुरु झाली आहे. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा आणि याकरता पहेली जाहिरात सहारा उद्योग या बदनाम उद्योग समूहास हाताशी धरून सरकारनेच सुरु केली हे लहान मुलगा ही सांगील.

बारात घर के द्वार पर आयी है, पहले बारातीयोका का स्वागत करो , शादी धूमधाम से हो जाने दो , फिर आपकी जो भी शिकायत है घरके अंदर बेठ कर सुल्झायेगे अब देश के इज्जत का सवाल है अशी भाषा करत आपल्या पापा वर पांघरून घालण्याचा प्रयत्न जोमदारपणे केला जात आहे पण यावेळी दुलहन के घर वालोका चारित्र्य या बाबत मात्र सोयीस्कर रीत्या दुर्लक्ष करा म्हणून सूचित केले जात आहे. याच वेळी १९८२ च्या asiad game 1982. च्या खर्चाचा हिशोब आज १९१० मध्ये २८ वर्षानंतरही पूर्ण झाला नाही अशी धक्कादायक माहिती खुद्द सरकारी प्रव्रक्त्यानेच सांगितली आणि ये तो होता ही राहता अशी बेजबाबदार विधाने ही केली.
देशभावना आणि भ्रष्ट्राचाराची सांगड घालून भारतीय जनतेला मूर्ख बनवता येते हे या मतलबी नेत्यांना चांगलेच अवगत झाले आहे. याचे उत्तम उदाहरण IPL चे भ्रष्ट्र आयोजन . आणि जेंव्हा हा भ्रष्ट्र क्रिकेटचा भोपळा फुटला तेंव्हा ललित मोदींचा बळी देवून आपले राजकारणी नेते सही सलामत सुटले नाही तोच हा नवा घोटाळा उजेडात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या दृष्टी ने समाधानाची बाब म्हणजे सोनिया कॉंग्रेस यात अडकली आहे. यामुळे राष्ट्रवादी नेते गालातल्या गालात हसत ख़ुशी जाहीर करत आहे. आपला नवरा मेला तरी हरकत नाही सवत रंडकी झाली या प्रकारे हे वागणे आहे.देशाच्या बदनामीचे सोयरे सुतक कोणाला नाही.
परकीय देशात अश्या स्पर्धा आयोजित करताना खेळ खेळाडू यांना मध्यभागी ठेवून स्पर्धेचे आयोजन केले जाते, खेळ खेळाडूंच्या विकासास सर्वोच्च प्राधान्य देवून ५-७ वर्ष आधी संभाव्य खेळाडूंची निवड करून अत्यंत कठोर सराव सुरु केला जातो. जात,प्रांत,धर्म राजकारण दूर ठेवत हे प्रशिक्षण कोणतीही दयामाया न दाखवता सुरु होते. स्पर्धा सुरु होण्याच्या ८-९ महिने सर्व क्रीडांगणे तय्यार होवून देशातील स्पर्धकांना तेथे सराव करून घेतल्या जातो . तेंव्हा कोठे पदकांची लयलूट यजमान देशाचे खेळाडू करतात. आणि आपण स्पर्धा महिन्यावर आल्या तरी अजून खेळाडूंची संभाव्य यादी सुद्धा जाहीर करू शकत नाही. क्रीडांगणे धड पणे बांधू शकत नाही. तरी पण अर्धा प्याला भरलेला आहे हे पहा म्हणत जनतेलाच शहाणपणा शिकवला जात आहे , आणि भ्रष्ट्राचारावर पांघरून घातल्या जात आहे.
काल-परवा भारताच्या अर्थमंत्र्यांनी भारतीय संसदेत इमानदारीपणाच्या,प्रामाणिकपणाच्या चिंधड्या उडवत बँकांचे हजारो करोडो रुपये बुडवून देशाच्या प्रगतीच्या गप्पा मारणाऱ्या मोठ्या उद्योजकांची नावे जाहीर करण्यास नकार दिला. यावरूनच भ्रष्ट्राचार किती खोलवर रुजला आहे याची कल्पना येते. जेंव्हा सामान्य माणूस अडचणीत येतो आणि बँकाचे पैसे भरण्यास वेळ मागतो तेंव्हा मात्र हेच सरकार , बँका त्या माणसास रस्त्यावर आणण्याची भाषा करत त्यास आत्महत्त्या करण्यास मजबूर करतात. DRT च्या माध्यमातून अश्या कर्जदाराच्या करोडोच्या मालमत्ता केवळ १०-१२ लाखात विकून परत त्यास परेशान करत बसतात, या मालमत्ता विक्रीत प्रचंड भ्रष्ट्राचार होतो बँका पासून सर्व जण यात सामील असतात.पण सरकार या कडे सोयीस्कर दुर्लक्ष करते. ह्याच मालमत्ता विकत घेणारे त्या मालमत्ता ७०-८० लाखाला विकून मालामाल होतात. याच मालमत्ता प्रामाणिकपणे विक्री केल्या तर कर्ज संपूर्ण फिटून , कर्जदारास लाखो रक्कम मिळेल पण लक्षात कोण घेतो. लहान कर्जदाराची ,शेतकऱ्यांची नावे वर्तमान पेपरात जाहीर करून तयान आत्म्हत्त्यास प्रवृत करणारे सरकार, संसदेत मात्र निर्लज्जपणे मोठ्या उद्योगपतींनी किती कर्ज बुडवले आणि त्यांची नावे सांगण्यास निर्लज्जपणे नकार दिला. ह्या बुडवलेल्या पैशाचा कांही % वाटा नक्कीच यांना मिळत असणार या मुळे नावे जाहीर करत नाही एकीकडे माहिती अधिकाराच्या गप्पा मारावायाच्या आणि दुसरीकडे संसदेतच भ्रष्ट्राचारी , बँक पैसा बुडवणाऱ्या उद्योगपतींना पाठीशी घालावयाचे हे फक्त भ्रष्ट्र इंडिया राजकारणीच करू शकतात. अ‍ॅनिमल फार्म (मला कळलेले) प्रेषक लॉजिकल यांच्या लेखात म्हंटल्या प्रमाणे .....
"all animal ara equal but some are more qual than others" . आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने आणि भाषणांनी सर्व सामान्य प्राण्यांच्या मनावर हा नियम कोरला जातो. मग त्यांच्या कष्टावर हे मोजके प्राणी गब्बर होतात आणि बाहेरच्या जगाला 'आम्ही किती प्रगती केलीय' याचा देखावा निर्माण करतात. हा सर्व सुखाचा देखावा तयार झाला म्हणजे "ऑल इज वेल अ‍ॅण्ड वी लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर" याचाच अर्थ परीकथा संपली.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

No comments: