Translate

Sunday, August 15, 2010

मी तर १५ ऑगस्ट काळी फीत बांधून साजरा करायच्या विचारात आहे,

आज सकाळ मध्ये आता बस्सं...freedom हवंच :) या बद्दल वाचकांना कुठल्या गोष्टींपासून तुम्हाला हवेय 'स्वातंत्र्य'? असा विचार करावयास लावणारा प्रश्न विचारला. हे वाचून वाचकांच्या असंख्य प्रतिक्रिया आल्या .त्या वाचावयास पाहिजेत. visit http://72.78.249.107/esakal/
20100812/4729459394379485399.
htm . त्यातील ९०% च्या वर वाचकांनी भ्रष्ट्राचार,आणि भ्रष्ट्र राजकारणी नेत्या पासून देशाला स्वातंत्र्य हवे असे स्पष्ट सांगितले आहे. मी तर १५ ऑगस्ट काळी फीत बांधून साजरा करायच्या विचारात आहे, मला आता भारतापासूनच स्वतंत्र हवे आहे. महाराष्ट्राचा एक वेगळा देश तयार करा, आणि आम्हाला गांधी घराणे, उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर घाणी पासून स्वातंत्र्य द्या. ,"लाज वाटते मी भारतीय असल्याची!!!" , मला वाटत कि नक्षलवादी हे चांगले आहेत मग त्यांच्याच हातात सत्ता द्या ह्या राजकारणी लोकांपासून तरी सुटका होईल.त्याला हाच एक पर्याय आहे. इंग्रज बरे होते असे वाटते... येथे पर्यंत सामान्य जनतेच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. ह्या उद्रेकाचे रुपांतर क्रांतीत कधी होवू शकते हे सांगण्या साठी कोण्या ज्योतिष्याची गरज नाही. फक्त एक ठिणगी पडण्याचा अवकाश आहे.
चला, तर मग करू या सुरूवात 'स्वातंत्र्या'साठी !




मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे । आज भारताला परकीय देशातील दहाषदवाद्या पासून धोका नाही, नक्षलवाद्या पासून तर नाहीच नाही. तर देशातील व्हाईट कॉलर अंतर्गत दहशतवाद्यान पासून खरा धोका आहे.. १) भ्रष्ट्र , प्रांतवादी, जातीय, बेईमान राजकारणी.२) भ्रष्ट्र मुजोर नोकरशाही ३) अप्रामाणिक व्यावसाईक कट प्रक्टिस करणारे डॉक्टर्स.न्याय खरेदी-विक्री करणारे वकील,अशील, न्यायधीश. ४)काळाबाजार करणारे उद्योगपती,व्यापारी,भूखंड माफिया ठेकेदार ५)भेसळ सम्राट, ६)शिक्षण ,सहकार सम्राट नेते,आणि अखेर IPL चा आणि COMMON WEALTH चा बझार मांडणारे नेते. अतिरेकी मानवतावादी या अंतर्गत दुश्मना पासून देशाला खरा धोका आहे. पाकीस्थान उगीच भारतावर दहाषदवादी हल्ले करून बदनाम होत आहे. पाक ने जर भारतातील भ्रष्ट्र नेत्यांशी, भ्रष्ट्र नोकरश्याही शी, व्यापारयान शी , INDIA मधील उच्चपदस्थांशी हातमिळवणी केली तर कांही दिवसातच दिल्ही वर पाकचा झेंडा फडकेल इतके हे नालायक देशद्रोही आहेत. ( पाक जनतेला मराठी नव्हे राजकारण्यांना समजत नाही म्हणून हे मी उघड लिहिले आहे.)
जुने निजामकालीन लोक सांगत निजाम रस्त्याने जात होता तर सोन्याच्या अशरफिया जनते वर उधळत जात होता. मशिदीच नव्हे तर हिंदू मंदिरांच्या देगभाली साठी शेकडो एकर जमिनी दान देत होता. आता तुमचे नेते सत्यनारायणाच्या दर्शनाला आले तरी यजमाना समोरच देवा समोर चार-आठाणे टाकण्यासाठी हात पसरतात. आणि जमिनी दान देण्या ऐवजी शासकीय,अशासकीय भूखंड स्वतः हाडपतात. आणि हे आजच्या भूखंड प्रेमी नेत्या कडे पाहिल्यावर सत्य वाटते.
आज १५ आगस्ट २६ जानेवारीला झेंडावंदन एक निर्जीवी यांत्रिक समारंभ झाला आहे. एक दीवस आधी पासून देशभक्ती पर हिंदी गाणी, सिनेमे क्रिकेटच्या खेळाडू हिंदी हिरोईन च्या देश प्रेमाच्या फालतू गप्पा, २४ तास बडविल्या जातात. देशप्रेमाचा कृत्रिम माहोल तय्यार केला जातो. पंतप्रधान कमांडोज च्या गराड्यात झेंडा फडकावतात, निर्जीवपणे भाषण देत भ्रष्ट्राचारा विरुद्ध घोषणा करतात (पण एकाही पंतप्रधानाची भ्रष्ट्राचारा विरुद्ध लढायची हिम्मत झाली नाही .) जय हिंद म्हणतात, जनतेला साद देण्यास सांगतात, पण लोक त्यास उस्फुर्त प्रतिसाद देत नाही. सत्तेत कोणताही पक्ष असो,गेल्या ६२ वर्षात हेच नाटक परत परत दाखवल्या जाते. दुसऱ्या दिवशी परत जनतेचा जीवनसंघर्ष सुरु. कारण या स्वातंत्र्यात जनतेला कांहीच महत्व नाही. पैसा, जात, धर्म यावरच भारतीय भ्रष्ट्र लोकशाहीचा डोलारा उभा आहे. म्हणून यांच्या पासून स्वतंत्रता हवी आहे. तरच गर्वाने मेरा भारत महान!! म्हणता येईल नाही तर हे भ्रष्ट्र लोक देश कधीच विकून टाकतील.हे तुम्हा आम्हाला समजणार देखील नाही.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.
blogspot.com

1 comment:

Anonymous said...

आपने मेरे मुंह की बात छीन ली/
At times I feel ashamed that I am Indian.
At times I feel, we do not deserve Freedom.
At times I feel, we do not deserve democracy.
At times I फील, Bhagatsing, Rajguru, Savarkar, Madanalal Dhingra might be repenting for their sacrifice !!!

पाक ने जर भारतातील भ्रष्ट्र नेत्यांशी, भ्रष्ट्र नोकरश्याही शी, व्यापारयान शी , INDIA मधील उच्चपदस्थांशी हातमिळवणी केली तर.....
तुम्हाला खात्री आहे, अशी हात मिलावनी जाली नसल्याची?............हल्ली मिलट्री मधे प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याच्या बातम्या आहेत.
हल्ली प्रामाणिक पोलिसांना / अधिकार्यांनना काम करणे नको केले जाते.

कारण या स्वातंत्र्यात जनतेला कांहीच महत्व नाही. पैसा, जात, धर्म यावरच भारतीय भ्रष्ट्र लोकशाहीचा डोलारा उभा आहे.
१०० % खरे आहे.