Translate

Friday, August 6, 2010

एक राष्ट्रकुल स्पर्धा १२ भानगडी

              एक राष्ट्रकुल स्पर्धा १२ भानगडी
एक गाव बारा भानगडी ह्या ग्रामीण राजकारणावर आधारित मराठी सिनेमाची अखिल भारतीय आवृत्ती "एक भारतीय राष्ट्रकुल स्पर्धा आणि १२00 भानगडी" या नावाने जोरदार सांग्रसंगीत रीत्या जागतिक पातळीवर भारताच्या इभ्रतीची लक्तरे मांडत चालू आहे. कोण जास्तीत जास्त देशाची बदनामी करतो याची जणू स्पर्धा लागली आहे अश्या थाटात या स्पर्धेची सुरुवात स्पर्धा अधिकृत रीत्या सुरु व्हायच्या ७५ दीवस aadhich TVमिडिया, वर्तमान पत्रे, भारतीय


संसद या ठिकाणी चालू झाली आहे. या स्पर्धे ची सुरवात खुद्द सत्ताधारी पक्षाच्या माजी केंद्रीय खेळ मंत्र्यांनी
मणि शंकर अय्यर यांनीच केली हे अजून एक आश्यर्यचं आहे. राष्ट्रकुल स्पर्धा या राष्ट्रकुल स्पर्धा राहिल्या नसून फक्त ( Wealth Games ) पैश्या च्या प्रचंड भ्रष्ट्राचारच्या सार्वजनिक पैशाच्या स्वत:च्या वैयक्त्तिक स्वार्था साठी उपयोग करणाऱ्या स्पर्धा झाल्या आहेत असा घणघंणाती आरोप त्यांनी केला . तेंव्हा आज पर्यंत देशाच्या इज्जतीचा प्रश्न असल्या मुळे य गोष्टी वर ताक फुकून चर्चा करणारी TV माध्यमे, वर्तमान पत्रे मग सबसे पहले हमने इस भ्रष्ट्राचार का भांडाफोड किया करत या बदनामीच्या मारेथान स्पर्धेत उतरली. आणि पुढील दोन-अडीच महिने बातम्यांची काळजी मिटली म्हणत त्यांचा जीव भांड्यात का कोठे म्हणतात त्यात पडला. आता त्याच त्या जुन्या क्लीप दाखवून देशाच्या बदनामीची धुणे धुवण्यास सगळे मोकळे झाले. स्पर्धा भारतात भरवण्या पासून ते बटन रेली, बांधकाम, साहित्य खरेदी, टायलेट पेपर ( हे सुद्धा कमी पडले) य प्रत्येक बाबतीत घपला झाला .
हे कमी होते म्हणून लै न्गीक अत्याचाराच्या भानगडी समोर यायला सुरुवात झाली. महिला हॉकीत प्रशिक्षक एम. के. कौशिक यांच्याबद्दल लैंगिक शोषणाच्या तक्रारी झाल्याने हा माणूस इतकी वर्षे तिथे कसा राहिला याबद्दल आश्चर्य वाटते. महिला वेटलिफ्टर्सनीही त्यांच्या अधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. क्रिकेटमध्ये आयपीएलची चौकशी चालूच आहे. अश्या तऱ्हेने जगात कोठेही स्पर्धेची जय्यत तय्यारी होत नसेल .
एव्हडे होवून संसदेत चर्चा होवून ही आपले मिस्टर क्लीन पंतप्रधान मनामोहनजी, सोनिया, राहुल यांच्या चेहऱ्या वरची रेष हलत नाही. जणू कांही देशाच्या इज्जतीशी यांचे कांही देणे घेणे नाही.
अखेर ही राष्ट्रकुल स्पर्धा काय आहे याचा अभ्यास केला तर ही स्पर्धा इंग्रज लोकांनी १९११ मध्ये आपल्या गुलाम देशातील खेळ प्रथम आयोजित केली होती.( In 1911, the Festival of the Empire was held in London to celebrate the coronation of King George V. As part of the festival an Inter-Empire Championships was held in )स्वत:च्या साम्राज्याच्या विजय मोठेपणा या साठी ही स्पर्धा आयोजित केली होती. आपण स्वतंत्र होवून आज ६० वर्षे झाली .पण आपली मानसिक गुलामगिरी कांही कमी झाली नाही. आपण सार्वभोम स्वतंत्र राष्ट्र आहोत यामुळे या गुलामगिरी च्या
स्पर्धेत का म्हणून भाग घ्यायचा याचा विचार आपल्या महान राजकारणी नेत्यांच्या मनात ही कधी आला नाही. उलट त्यांनी या स्पर्धा देश ना देशाचा स्वभिमान आणि देशगौरव या स्वरुपात भारतीयान समोर मांडल्या. खोटी देशभावना खोटा देशगौरव चा दिंडोरा पिटून जनतेच्या खऱ्या प्रश्न वरून लक्ष दुसरी कडे वळविण्या साठी या स्पर्धेचा दुरुपयोग केला गेला हाच या खेळाचा मुख्य उद्देश आहे.. जसा बाजारू क्रिकेट आणि देशभक्ती चा संबंध जोडून IPL खाली देशबांधव आणि देशाला लुटले. आज आपण नीट रस्ते बंधू शकत नाही, जनतेला १२-१२ तास अंधारात राहावे लागते, शिक्षणाचा बेंडबाजा वाजला आहे , सर्व देशात शेतकऱ्यांना खता साठी लाठ्या खाव्या लागत आहेत, शेतकरी,विद्यार्थी आत्महत्या करत आहे, अन्नधान्य याचा काळाबाजार जोरात चालत असून गरीबच काय मध्यम वर्गाला ही जगणे मुश्कील झाले, तरी पण बेशरमपणे भारत ही जगातील आर्थिक महासत्ता म्हणत नगारे पिटल्या जात आहेत. सत्या कडे दुर्लक्ष करून खोट्या राष्ट्रीयत्वाचा जयजयकार चालू आहे. भारताच्या गरीबीचे जगभरात धिडढोरा पिटणाऱ्या Slumdog सिनेमाचा निर्लज्जपणे जय हो जय हो म्हणत जयजयकार करत आहोत. या सिनेमाला जी बक्षिसे भेटलीत ती त्याने भारताची जगात बदनामी केल्या मुळे दिली आहेत पण आपल्याला हा देशगौरव वाटतो , लग्गान हा भारतीयांच्या इंग्रजावरील विजयाच्या सिनेमाला का दिली नाही. पण आजूनही आपणात राष्ट्रीयत्वा भावना नाही उपजली . याच मुळे देशाच्या नाक कापणाऱ्या भ्रष्ट खेळा कडेही ही आपण दुर्लक्ष्य करतो ही आपली शोकांतीका आहे.

Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

No comments: