Translate

Monday, February 1, 2010

जगात भारत असा एकच देश आहे ज्याने कधीही दुसर्या देशावर हल्ला केला नाही

बाजारू क्रिकेट पेक्षा देश मोठा हे भारतीय कलावंत, पत्रकार यांना कधी समजणार हे देव जाणे. पाकीस्थान आपल्या देशाच्या नागरी वस्तीवर हल्ले करतो त्या वेळी केवळ गेट वे ऑफ इंडिया वर मेणबत्ती जाळण्या पुरते आणि टी.व्ही. समोर प्रतिक्रिया देण्या पुरते  यांचे देश प्रेम उफाळून येते. नंतर सारे सामसूम होताच यांचा बाजार सुरु होतो. शाहुरुख ला जर पाक खेळाडू बद्दल प्रेम असेल, तर सरळ परदेशात जावून तेथे हा संघ तयार करावा. केवळ स्वदेश सिनेमात काम करून देशप्रेम सिद्ध होत नाही मनात देशप्रेम असावे लागते आणि ते असेल तर असा कुप्रसिद्धी चा स्टंट करण्याची गरज पडत नाही.  देशाशी बेईमान लोकांना फक्त भारतातच आरामात राहता येते एव्हढेच नाही तर लाचार सरकार त्यांनाच संरक्षण पुरवते असले नपुसक सरकार असल्यावर पाक च्या हल्ल्या ची गरज नाही.  Musharraf  एकीकडे भारतात येऊन बासुंदी बिर्याणी झोडत होता त्याच वेळी कारगिल हि करत होता पण स्वदेशी भारत सरकारला त्याचा पत्ताच नव्हता यामुळे 9/11 परत झाले तर अमेरिका- पाक युद्ध होईल. या सर्व पापाचे धनी असणाऱ्या राजकीय नेत्यांना जाहीर पणे स्व:तह स्वताची जाहीर आत्महत्या करण्याची सजा जनतेने द्यावी या पापाला दुसरी सजा नाही . आंख के बदले आंख कान के बदले कान हाथ के बदले हाथ आणि जान के बदले जान हाच योग्य न्याय आहे.


भारतातील कलावंताना पाक सरकार धूप सुद्धा घालत नाही. त्यांना जवळपास बंदी आहे. पण आपल्या कलावंताचे  पाक चे जरा जास्तच प्रेम उतू जाते भारताने पाक कलावंताना नेहमीच सन्मानाने वागवले कारण भारताची संस्कृती. पण याचा गेरफायदा पाक ने नेहमी घेतला. युद्ध,दहशतवाद आणि खेळ कला यात फरक करा म्हणून   भारताला अक्कल शिकवणारे भारतीय पत्रकार आणि कलावंत  पाकीस्थानला दहशतवाद , युद्ध करू नका यात आम आदमीचे नुकसान होत आहे ही अक्कल का   शिकवत नाही ?
                
हा सामान्य नागरिकाला नेहमी प्रश्न पडतो त्याच प्रमाणे पाकिस्थानी खेळाडू, कलावंत आपल्या सरकारला भारता विरुद्ध दहशतवाद, युद्ध करू नका आम्हाला अमन शांती पाहिजे हे का सांगत नाही ? दिलीपकुमार पासून शाहुरुख अमीर शबाना जावेद अख्तर पर्यत बाजारू सिनेकामगार ( स्वताला कलावंत समजतात ही गोष्ट वेगळी) पाक सरकारला का ठणकावून सांगत नाही दहशतवाद सोडा त्यांना माहित आहे असले मूर्ख वागणे फक्त भारत सरकारच खपवून घेते एव्हढेच नव्हे तर पद्म पुरस्कार ही देते. पाकीस्थान राज्यकर्त्याचे भारत द्वेष करून सत्ता टिकवणे हेच काम झाले आहे.या भारत द्वेषा करता त्यांनी जोपासलेला दहाषदवादी आज त्यांच्यावरच उलटला हीच  पाकची शोकांतिका झाली आहे.

No comments: