Translate

Friday, February 5, 2010

भारता सारखा बिनडोक वापर दूरदर्शनाचा जगात कदाचित च होत असेल.



 भारतात ५०० टी.व्ही .चैनल्स आहेत पण दाखवल्या जाणारे कार्यक्रमाची वर्गवारी केली तर ती फ़क्त ४ किंवा ५ भरेल
१) परत परत दाखवल्या त्याच त्याच ब्रेकिंग शिळ्या झालेल्या  बातम्या,प्रेक्षेक ही त्याच उत्साहाने पाहत असतात,न कंटाळता. आठवा २६/११ किंवा ९/११ .


२) प्रसिद्ध सासु-सुनेच्या न संपणाऱ्या भांडणाच्या मालीका. यातील पात्रे २ पिढ्या नतर ही कशी जवान दिसतात हा  P.hd. चा विषय होइल. त्याच प्रमाणे स्त्री पात्रांचे मेकअप, साप,विंचू च्या कपाळा वरील टिकल्या, वेषभूषा   करणाऱ्या स्त्रीया भेटल्या तर मी दंडवत घालीन. चेहरया वरील खलनायेकिचे गूढ़ हावभाव, आणि नेहमी अगदी मरणाच्या प्रसंगात सुद्धा नविन आणलेले भरजरी , किंवा तोड़के कपडे   वापरणारी पात्रे पाहून कंटाळून  रिमोट दाबला तर त्या मालिकेत ही  तेच प्रसंग चालू असतात. मला अजून एका गोष्टीचे नवल वाटते एकच पात्र अखंड बडबडत असते बाकी पात्रे मक्ख बिन चेहऱ्याने उभी असतात कॅमेरा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून फक्त फिरत असतो.यालाच अभिनय म्हणतात . P.hd. करण्या करता यात बरेच विषय मिळतील. गरजू विद्यार्थांना मी याचा तयार प्रबंध  फुकट देण्यास तय्यार आहे .

3) अचकट विचकट हावभाव करत नाचणारे बालकलाकार (बालाकामगार) आणि हिंस्त्र जनावर ज्या प्रमाणे आपल्या शिकारीचे लचके तोडतो त्या प्रमाणे सर्वज्ञ असलेला अभिनेता गायक गुरु महागुरु मुलांच्या गाण्याची चीरफाड़ करत असतो, आणि गायक अपमान हसून सहन करत असतात.तक्रार केली हसले नही तर स्पर्धेतून बाद होण्याची भीती आणि पालकांचा अपेक्षाभंग होण्याची.
४) दुपारच्या वेळी, रात्री वेळी अवेळी दाखवण्यास हमखास प्रेक्षक मिळणारा प्रेक्षक  खाद्य पदार्थ शिकवणाऱ्या मी सुद्धा पाहतो.या मलिका पाहून पदार्थ केला तर हमखास बिघाडतो असे समस्त नवरे वर्गाचे मत आहे.आणि अखेर मारून मुटकून विनोद निर्माण करणाऱ्या बालकलाकार पासून ते म्हाताऱ्या कलाकाराचे विनोद (जे ऐकून फ़क्त  नवज्योतसिंग सिद्धूच हसू  शकतो) दाखवणाऱ्या मालीका.  हसणारे प्रेक्षक दाखवा १०००० रुपये बक्षिस मिळावा.अशी माझी खुली ऑफर आहे.
आखरी थोडे बहुत मानधन देवून भारतातील सर्व भाषेच्या  जुन्या नव्या सिनेमाचे , गाण्याचे हक्क विकत घेवून, कधी न घेता ते २४ तास दाखवायचे हा प्रकार सोप्पा आहे. बाकी कांही जास्त कलाकामागर साभाळावे लागत नाही.एकच मानधनात १०-१२ वेळी सिनेमा दाखवता येतो. बस्स संपले कार्यक्रम आणि विविध चर्चेची न संपणारी गुऱ्हाळ. असा बिनडोक वापर दूरदर्शनाचा जगात कदाचित च होत असेल. तरी पण भारतातील लापतागंज दाखवणारे चैनल.discovery , history channel , national geographic , animal planet , या सारखी आणखी असतील जी पहाताना रिमोट कण्ट्रोल वापरावा लागत नाही.


 

1 comment:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

याच कारणासाठी घरात टी.व्ही., केबल असूनही त्याचा वापर करावासा वाटत नाही. डिस्कव्हरी, हिस्टरीसारख्या वाहिन्या तेवढ्या बघाव्याशा वाटतात. वेळ मिळाल्यास माझ्या ब्लॉगवरील सिरियल किलर हा लेख अवश्य वाचून पहा..