
31/01/2010
28) जेथे आभाळच फाटलं तर आपण कोठे कोठे ठिगळ जोडणार ताई आपल्या राजकारण्यांची स्थिती हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या मागे अशी झाली आहे.या अमेरिकन लांडग्या मुळे आफ्रिका पूर्ण बरबाद झाला, पाक त्याच मार्ग वर आहे. पण मनमोहन & कंपू यांच्या डोळ्यावरील या लांडग्याचे कातडे झाकल्यामुळे त्यांना कांहीच दिसत नाही जगतीकारणाचा बोम्ब मारणारी अमेरिका सुद्धा आता बचावात्मक पवित्र्यात आली आणि outsourcing च्या विरोधात कायदे करत आहे भारतीयावर हल्ले होवून हि त्यांना कोणी जाब विचारत नाही धोबी का कुत्ता ना घर का ...
27) महाराष्ट्रा तील सर्व जिल्हा सहकारी बँक आणि राजकारणी नेत्यांनी काढलेल्या सर्व सहकारी बँकांची हीच दुर्दशा झाली आहे. पण या राजकारण्यांचे कोणीही वाकडे करू शकले नाही सामान्य थकबाकीदारास हेच नेते जीणे नकोसे करून सोडतात पण बँका बुडवून हे आमदार, खासदार मंत्री होतात. निवडणूक आयोग सरकारचे बुजगावणे आहे. या नेत्यांना त्यांच्या नातेवाईकाना खरे तर जेल मध्ये टाकावे पण तेच समाजात मानाने राहतात यांना निवडणूक लढविण्यास कायद्याने सरकार बंदी का घालत नाही? बंदी घातली तर सर्वच राजकारणी जेल मध्ये बसतील घरी जातील
26) मंदिर वही बनायेंगे पासून राममंदिराचा प्रश्न राज्यघटनेच्या चौकटीत सोडवला जाईल, याचाच अर्थ मंदिर बांधण्याचा स्वदेशी बाणा भाजपने सोडून दिला आहे फक्त संघाच्या प्रथे प्रमाणे कबुल करत नाही. कडी लावा आतली मी नाही बाई त्यातली किंवा ताकाला जावून भांडे लपवणे हा प्रकार आहे
25) भ्रष्ट्राचाराचा महामेनु असणारा मुकेश , लाचार राजकारणी आणि रीश्वातखोर नोकरशाही हि मुंबईला लागलेली कीड आहे. ओकाफ्ची जागा हडप करणारा,मोटारीवर कर न भरणारा मुकेश बाहेर असता तर त्याची जागा जेल मध्ये असती मुंबई महाराष्ट्रा पासून वेगळी करून आसपास ची लाखो एकर जागा हडप करण्याचा याचा डाव आहे. झोपडपट्टीचे विश्व हे मुंबई ला कलंक नाही तर हि सत्ता, पैसा आणि जमिनीच्या राक्षसी लालचेनी, हपापलेली हि मंडळी मुंबईची कलंक आहे. याचा विरोध मराठी अस्मिता असलेल्या माणसाने केलाच पाहिजे जय मुंबई जय महाराष्ट्रा
24) बातमी नीट वाचली . प्रशांत हा कायद्याची पदवी घेत होता. त्याचे वडील हवालदार आहेत .या आधी प्रशांतने दोनदा आत्म्हतेचा प्रयत्न केला होता पोलीस खात्यात असून , कायदे माहित असून हे लोक दीड वर्ष कसे गप्प बसलेत अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो असे खेदाने म्हणावे लागते. यात कोणालाही पाठीशी घालावयाचे नाही पण वस्तुस्थिती कडे लक्ष वेधले
23) शाळेला खोल्या नाहीत, संडास-बाथरूम नाहीत, ब्लक बोर्ड नाहीत क्रीडांगण नाही एवढेच काय शिक्षक हि नाही आणि हे म्हणे १४००० रुपयात हर्बल गार्डन उभारणार खरच यांच्या अक्क्लेची कीव करावी का हे लोक जनतेला मूर्ख समजतात 14000X1000 च्या हिशोबाने १.४ कोटी रुपये अनुदान लागेल.बाकी बियाणे,रोपे याचा खर्च वेगळा. वन खात्याची जमीन शाळांना लागून तर नाही मग विद्यार्थी-शिक्षक झाडे लावायला जंगलात जाणार का? आवो चोरो लुटो सारा! आधा नोकरशहा का आधा नेता का जय लोकशाही !!
22) जुनी नोकरशाही मुजोर झाल्यामुळे आणि राजकर्त्यांची अंडी-पिल्ली त्यांना माहित असल्या मुळे यांना जुमानत नाही. हे सरळ मनाच्या आब ने एक प्रकारे मंजूर केले आहे. यामुळेच नवीन नोकरीस लागलेल्यांना गडचिरोलीत काम करणे सक्तीचे करण्यात येणार आहे यापेक्षा जे जुने याठिकाणी जाणार नाहीत त्यांना सरळ नोकरी वरून काढून टाकावे हा कायदा करा जुने अधिकारी काय फक्त आयोग पदी नेमून मलिदा खाण्या साठीच आहेत का?
21) सरकारी जाहिरातीत पाकीस्थान च्या लषकर प्रमुखाचा फोटो . क्रीडा महासंघाच्या नकाशात प्रजासत्ताकदिनीच भारताचा भूभाग पाक,चीन चा दाखवणे आणि वर याची भलावण करणे हे फक्त भारतातच घडू शकते. भारत युद्धात जिंकतो पण तहात हरतो हे म्हणतात ते कांही चूक नाही. येथील राजकारणी आणि नोकरशाही हि मुर्दाड बनलेली आहे. काय परिणाम होतील याचा विचार न करता निर्णय घेतात. याचा दुष्परिणाम मात्र देश भोगतो नेहरू पासून हे सुरु आहे.. पण paid news च्या आधारे हे सर्व लपवले जात आहे.सर्व्रत्र यांचे भाट आहे. हेच या देशाचे दुर्देव्य आहे.
20) आहो!! सकाळ वाले आमचे बर चाललं तुम्हाला बघवन का . गेली ६० वर्ष हि राज्यघटना प्रत आम्ही जनते पासून दूर ठेवली . आश्वासनावर जनतेला झुलवत ठेवले तिला कर्तव्य करायला शिकवले आता ती हक्क मागू लागली तर काय करू - नेताजी कहीन
19 भारतात क्रिकेटचा धर्मा प्रमाणे अफूची गोळी म्हणून वापरला जातो विशेष म्हणजे क्रिकेट शब्द उच्चारला तर प्रेमी-विरोधक दोघांना हि नशा येते याचा वापार शरद पासून बाळासाहेब पर्यंत सर्व्हच राजकारणी स्वता:चा स्वार्थ पूर्ण करण्या करता करतात मताच्या खरेदी-विक्री मुळे त्यांची मतदाराची बांधिलकीशी त्यांचे घेणे-देणे नाही. देशाचा जेवढा वेळ क्रिकेट खेळण्यासाठी बरबाद होतो त्यापेक्षा जास्त वेळ चर्चा करण्यास वाया जातो यामुळे हा खेळ बंद करणे बरोबर बगलेत छुरा घेउंन खेळणाऱ्या पाक आस्ट्रेलिया बरोबर तर खेळूच नये
18) या यादीत टाटांचे नाव आले हे अभिमानस्पद आहे. आणि अश्या यादीत नाव यावे म्हणून टाटा उद्योग करत नाही पण बाकी पेकी काही जन नक्कीच वादग्रस्त आहेत. म्हणतातना राजाच्या राणीचे चारित्र्य संशयातीत असले पाहिजे तसे उद्योगपतींचे उद्योग हि संशयातीत असले पाहिजेत
17) "पेड न्यूज' चा कलंक आपणास कधी पासून वाटत आहे. याचे जनक पंडित नेहरू आणि कॉंग्रेस आहे फक्त त्याकाळी पैसा न देता एखादे पद ,लायसन्स, परकीय शिष्यवृत्ती या स्वरुपात दिली जात होती यातूनच नेहरू घराण्याच्या हिमालय एव्हाढ्या,भिडरवला चुका असूनही त्यांचे गुणगान गाणारे भाट संपादक आहेतच बाहेर यांच्यावर महाअभियोग चालवून काढून टाकले असते आज सर्वच मोकळा बाजार झाल्या मुळे हे उघडे झाले मक्तेदारी संपल्या मुळे त्या विरुद्ध ओरड होत आहे. नाही तर त्याच त्या राजकारण्यांचे चेहरे बातम्या झळकल्या नसत्या बाबूजी बेचते हें
16)नि. कर्नल सदानंद घारपुरे आपण इंग्रजाळले आहात म्हणून असे म्हणत आहात राज ठाकरेचे कांहीच चूक नाही जगात कोठेही जा प्रत्येक व्यक्ती स्वताची भाषा, वेशभूषा , खाणे-पिणे परंपरा जपते. जेंव्हा माणसास ठेस लागते तो आपल्या मातृभाषेतच भावना व्यक्त करतो. तेंव्हा त्याला कोणी जबरदस्ती केलेली नसते आणि आपली संस्कृती पाळा हा सांगणे कोणत्या कायद्याने गुन्हा आहे.आज चीन, जपान आपली संस्कृती सांभाळूनच प्रगत झाले. जो आपली संस्कृती इतिहास विसरतो त्याला भविष्य काळ क्षमा करत नाही यामुळेच जगाच्या पाठी वरून अनेक जन लुप्त झाले
15) इतना आदर इंसान तो क्या ! दुश्मन भी पूजे जाते हे!!
दुश्मन कब राजा होगा ! ये सोचा के मै घाबरता हुं !!
भारत का रहनेवाला हुं ! पाकीस्थान के गुन गाता हुं !!
14) महिन्या पूर्वी विद्यार्थी आत्महत्या हि मुख्य मथळ्याची बातमी आता दुय्यम झाली आहे. कांही दिवसांनी सवय झाल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या च्या बातमी सारखी या कडेही दुर्लक्ष होणे सुरु होईल आणि परत कांही दिवसांनी बुद्धिवादी , हुशार लोक भांडवलदार जग विद्यार्थ्यात हिम्मत नाही म्हणून प्रचारा ची हाकाटी पिटणे सुरु करतील अखेर सरकार गेरशिक्षण तज्ञ,सोयीच्या माणसाचा आयोग नेमेल हा आयोग आजाराचा अभ्यास न करता बाकी बिनकामाचा अभ्यास करून सोयीचाअहवाल देईल सरकार पकेज जाहीर करून विषय संपवेल सिस्टीम भ्रषटाचार करेल
13) मुळातच साई संस्थान हे भाविक देवस्थान न राहता बड्या लोकांचे मोजमाजेचे पर्यटन स्थळ झाले आहे. साई दर्शन पंचतारांकित झाले आहे त्यातच हिंदी सिनेमा आणि टीवी मालिकेतून या शिर्डीचे मार्केटिंग मोठ्या प्रमाणांत झाले आहे. म्हणून गर्दीही वाढत आहे. भाविकां कडून आलेला पैसा भाविकांच्या सोयी साठी उपयोगात आणावालागाला तर सरकारच्या नावाने रडण्याची गरज नाही ९०० एकर जमिनीची आणि विमानतळाची खरच गरज आहे का? दररोज ४५ लाख खर्चा चे ओंडीत काटेकोरपणे होते का? २४ घंटयात सेकॅनदाला १ जरी भाविक धरला तरी ९०००० फक्त दर्सन होते दिवस-रात्र मंदिर उघडे ठेवले तरी 90000 जणांचेच दर्शन होत नाही या करता मंदिर 24 तास उघडे ठेवावे लागेल. तर मग मंदिर स्वच्छता मूर्तीची पूजा-पाठ कधी होणार वेळच मिळणार नाही. मग दीड-दोन लाख लोक कसे दर्शन घेत असतील याचा विचार करण्याची वेळ आली आहे.दर्शन,पूजा,प्रसाद सर्वच गोष्टी भक्ताला विकत घ्याव्या लागतात यामुळे खर्च नक्की कश्या करता होतो आणि तो समर्थनीय आहे का
12) हिशेबी मालमत्तेप्रकरणी अभियंत्याला जामीन!!!!! डॉक्टर वर हल्ला केल्यास सामान्य माणसास अजामीनपात्र अटक , वृतमान पेपर वर हल्ला केल्यास सामान्य माणसास अजामीनपात्र अटक .... पण सामान्य माणसास लुबाडून भ्रष्टाचार बेईमनी करून करोडो रुपये बेकायदेशीर जमवानार्याला मात्र तुरंत जमिना वर सुटका !! अजब न्याय न्यायालयाचा !! बेहिशेबी मालमत्ता , भ्रष्टाचार हा अजामीनपात्र गुन्हा असा कायदा सरकार का करत नाही ? किंवा हा कायदा आपल्या वरच उलटून आपणास अटक होवून जेल मध्ये जावे लागेल हि भीती वाटते
11) अरे ! ओ सांबा !! कितनी बार धमकी दे राहा हैं यह आदमी !!! सरकार पुरे हाजार बार धमकी दे चुका हे! खाली बात करता हैं ! दूर दूर अमेरिका मै जब दहशदवादी हमले करते तो अमेरिका कहती हैं बहुत हो चुका हम पाक ओर लादेन का खात्मा करेंगे ! कितना इनाम रखा हैं हमे मारनेको पुरा १०० करोड ओर नब्बे हजार अमेरिकी सिपाई सरकार!! उन्होने हिजडे की फ़ओज भेजी हैं क्या? सरकार आपने उनका बिर्याणी कबाब मिठाइया रसगुल्ला खाया हैं सरकार!! अब उन्हे बॉम्ब, रायफल कि गोलिया खाव कहना ! हमको एकही आदमी मार सकता हैं! ओर वो आदमी हैं हम खुद
10) बाळासाहेब ठाकरे मला आदर्श वाटतात कारण. ज्याचा आदर्श हा हिटलर आहे तो काय आदर्श आहे आपणाला हिटलर समजला नाही बेचिराख झालेल्या जर्मनीस गरुड पंखाचे बळ देवून प्रगतीमान केले पहिल्या महायुद्धाचा वचपा काढून जगा बरोबर एकट्या जर्मनीने टक्कर दिली हे येऱ्या गबाळ्याचे कमकुवत नेत्याचे काम नाही हिटलर केवळ योद्धाच नव्हता तर त्याला अनेक विषयात प्रभुत्व होते. याच्याच काळात जर्मनीच्या वैभवात भर टाकणाऱ्या अनेक योजना मार्गी लागल्या आपले नेतृत्व साधे पाकीस्थान विरुद्ध लढू शकत नाही आणि हिटलर तर जगाशी लढला हारहि वेगळी
9) बाळासाहेब ठाकरे मला आदर्श वाटतात कारण...... त्यांनी महाराष्ट्राला मराठी माणसाला मराठी अस्मिता जागवणारा, रोखठोक बोलणारा, वेळ प्रसंगी दोन थोबाडीत मारणारा , अब्बुला त्याची जागा दाखवणारा सिस्टिमला सुता सारखे सरळ करणारा राज ठाकरे घडवला....
8) बाकी मंत्र्यांनी खुलासे पाठविले अंतकवादी हमले,चीन ची घुसखोरी याचा संरक्षण मंत्रालयाशी संबंध नाही वाढती गुन्हेगारी अंतर्गत हिंसाचाराचा गृह खात्याशी संबंध नाही. विद्यार्थ्याच्या आत्महत्तेचा,खालावलेल्या शिक्षण दर्जाचा शिक्षण खात्याशी संबध नाही, रस्त्याच्या दुर्दशेला बांधकाम खाते जबाबदार नाही. ढासळलेल्या,फसलेल्या आर्थिक धोरणास अर्थ मंत्रालय जबाबदार नाही मुंबई च्या बकालपणास दुरवस्थेला महापालिका जबाबदार नाही कुपोषण आनरोग्यास आरोग्य खाते जबाबदार नाही. देशाच्या सर्व कमकुवतपणास पंतप्रधान जबाबदार नाही
7) अरे वन्य प्रेंमी कार्यकर्त्यानो जरा ज्योती बसू यांच्या कडून अक्कल घ्या . या प्राणी प्रेमीना रेसकोर्स वरील घोड्यान वरचे अत्त्याचार दिसत नाही. पण भारतातील बैल,गाई, कुत्री, यांच्यावरील अत्त्याचार दिसतात. INDIA तील कुत्र्यांच्या स्पर्धेतून त्यान गुलाम सारख्या सर्कस केले तर चालते ५ स्टार हाटेल मधील नंगा नाच कोंबडी चालतो पण लावणी चालत नाही. टीवी वरील रियालिटी शो मधील बालकलाकार उर्फ बालकामगार चालतात पण पोटा-पाण्या साठी लहान मुलांनी काम केलेले चालत नाही काम केलेले चालत नाही .यांना समुद्रात बुडवावे
6) मनमोहंनजी आता तरी अमेरिकेच्या गुलामगिरीतून बाहेर पडा जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान आहात हे विसरू नका. तुमच्या मागे ११० कोटी जनता आहे. युद्ध नुकसान करेल पण एकदाची बिमारी निघून जाईल आपण अर्थतज्ञ आहात नफा नुकसानीचा ताळेबंद मांडा केवळ नोकरशहा सारखे वागू नका राजा सारखे वागा. पंजाब चा इतिहास पहा सगळ्यात जास्त लढावंये ज्या राज्यातून झाले तेथून आपण आला आहात वारसा विसरू नका. जे इतिहास विसरतात त्यांना भविष्य काळ क्षमा करत नाही लक्षात घ्या
5) ज्योती चा अर्थ उजेड प्रकाश या अर्था शी बांधिलकी मानत जीवन जगलेल्या बसु नी मरणा
नंतर हि देहदान करून आजच्या राजकारण्यांना जनसेवा चा प्रकाश दाखवला हा मार्ग कोणी पत्करणार नाही हे नक्की पण यांनी अंधार वाटचालीत उजेड दाखवला हे महत्वाचे
4) चीन म्हणजे कमकुवत पंतप्रधान असलेला देश नाही. आणि गुगल च्या आणि चीन च्या वादात मध्ये पडण्याचा अधिकार अमेरिकेला कोणी दिला. तसे पाहिल्यास कोणत्याही स्वतंत्र देशाच्या कार्बारात हस्तक्षेप अमेरिका आंतरराष्ट्रीय कायद्याने करू शकत नाही हं भारताची गोष्ट वेगळी आ बैल मुझे मार हि य राजकारण्याची नित्ती आहे. आंनी आज जे राजकारभार करतात अमेरिकेशी बांधिलकी मानणारे आहे म्हणून भारताचा लोचा झाला आहे.
3) अभिनंदन जे काम सरकारने सार्वजनिक व्यवस्था उभारून करायचे ते आपण लहान प्रमाणात का होएना आपण करत आहात खर म्हणजे आपण फक्त मोटार उत्पादना कडे लक्ष्य दिले या करता ज्या मुलभूत सोयी आवशक असतात त्या रस्ते निर्मिती कडे दुर्लक्ष केले. आणि दुर्देवाने रस्ते निर्माण उद्योग भ्रष्टाचारी गुत्तेदार, राजकारणी आणि नोकरशहा या त्रयी च्या कचाट्यात सापडला आहे. या मुळे जनतेस त्रास होत आहे अमेरिका प्रगत झाली ती आधुनिक रस्त्यान मुळे .चीन ने सुद्धा बस ला महत्व दिले मोठेपणाच्या कल्पना बदलून आपण हि बस सार्वजनिक प्रवास करावा
2) देल्ही अबभी बहोत दूर है. नाहक परेशान होनेकी जरुरत नाही. हा नकाशा पाहिल्यावर सरकारी प्रव्रक्त्याने वरिष्ट सूत्राचा हवाला देऊन सांगितले. याबाबत उच्च चोकशी मंडळ नेमले असून यांना या बाबत अहवाल देण्यास सांगितले आहे हा अहवाल प्राप्त होताच तो घेऊन स्वत पंतप्रधान हा गोपनीय अहवाल घेऊन अमेरिकेला पुरावा सादर करण्यास जातील. हा अहवाल गोपनीय असल्या मुळे जाहीर होणार नाही पण वाहिन्यांनी किंवा कोणत्याही प्रसार माध्यमाने तो प्रकाशित केला तर तो चुकीचा आहे असे आम्ही आत्तच जाहीर करतो
१) Vishal, Chennai said: यांनी दिलेली प्रतिक्रिया हि बातमीशी अत्यंत विसंगत आहे. बातमी काय आहे प्रतिक्रिया काय याचा ताळमेळ बसत नाही महाराष्ट्रीयन माणसा बद्दल जे तशोरे ओढले ते अत्यंत चूक आहेत . मुंबई महानगरपालिकेची कोट्यावधी रुपयांची बाकी मॅरेथॉन घेणाऱ्या या श्रीमंत संस्थे ने २-३ वर्षा पासून थकवली तरी पण उदार मनाने मुंबई महापालिका आणि मुंबेकर मराठी मानस हि स्पर्धा राष्ट्रीय कर्तव्य समजून करतात आणि महाराष्ट्रीयन चे अभिनंदन करणे या देशात गुन्हा आहे का?
--
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.
No comments:
Post a Comment