READ MORE
53) भारत त्याला लष्करी कारवाईने उत्तर देईल असे अमेरिकेतील "थिंक टॅंक'ला वाटते. असे भारतातील जनतेला गेल्या १० वर्षा पासून वाटते .. पण या वाटण्याचा कांही उपयोग नाही. जो पर्यंत सत्ते करता मतांचे राजकारण करावे लागते आणि अहिंसेचा पडदा सरकारने ओढला आहे तो पर्यंत युद्ध शक्य नाही. सरकार मग कोणतेही असो केग्रेस व भाजप फरक नाही. Musharraf एकीकडे भारतात येऊन बासुंदी बिर्याणी झोडत होता त्याच वेळी कारगिल हि करत होता पण स्वदेशी भारत सरकारला त्याचा पत्ताच नव्हता यामुळे 9/11 परत झाले तर अमेरिका- पाक युद्ध होईल.
या सर्व पापाचे धनी असणाऱ्या राजकीय नेत्यांना जाहीर पणे स्व:तह स्वताची जाहीर आत्महत्या करण्याची सजा जनतेने द्यावी या पापाला दुसरी सजा नाही . आंख के बदले आंख कान के बदले कान हाथ के बदले हाथ आणि जान के बदले जान हाच योग्य न्याय आहे.
51) राजू अमेरिकेत राहून उगाच पुड्या सोडू नकोस आज अमेरिकन सरकार सुद्धा नागरिकांना आरोग्याच्या सोयी सहज मिळत नाही म्हणून परेशान आहे तेथे तू चार मुलांच्या गोष्टी करतो child health care crisis america ya व ईतर साईट वर अमेरिकेत काय जळत ते उघड लिहिले आहे. आणि या परेशानी मुळे तू भारतात परत येण्याची तयारी करत आहे. अरे भारतात तरी समाजसेवी संस्था या मुलांचे पालकत्व स्वीकारतात अमेरीकेत तर कोणी वाली नसतो. अमेरिकेचे कोटुंबिक आणि समाज उध्वस्त झाले आहे या मुळे मुलाचे भवितव्याच्या काळजीने तुला आता देश प्रेम आठवत
50) भूमी पुत्रांना न्याय हि केवळ राज ची संकल्पना न राहता ती जागतिक विचारसारणी झाली आहे. मी नाही त्यातली.... हि तर संघाची जुनी नीती आहे. कोणत्याही प्रश्नावर वाद निर्माण होऊन आपले नुकसान होत आहे हे लक्षात आले कि चक्क मी बोलोलच नाही म्हणायचे. आपण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्यांबद्दल काहीही बोललेलो नाही,' असे असेल तर शिवसेनेच्या तत्वा विरुद्ध हे धोरण आहे. पहिले शिवसेनेची मैत्री तोडा महाराष्ट्रात मग असे वक्तव्य करा. आधी बिमारू राज्यांना विकास करण्याचा सल्ला द्या. नाही तर आपला लाल.... होईल
49) या घटनेवरून एक गोष्ट लोकांच्या लक्षात आली नाही ती म्हणजे माहितीचा अधिकाराची ताकद किती मोठी आहे. हि ताकद भूखंड माफिया, भ्रष्ट्र नोकरशाही, राजकारण्यांनी ओळखली आहे. यामुळेच सतीश शेट्टी यांची हत्या करण्यात आली आहे.कोर्टात वर्षानु वर्षे वेळ जातो यांचे काही वाकडे होत नाही पण समजदारीने माहिती मागितली तर माहिती लवकर मिळते आणि भ्रष्ट्राचारास वेसन बसते. यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त माहिती अधिकाराचा उपयोग करावा. याच अधिकाराचा वापर करून सतीश शेट्टी यांना न्याय मिळवून द्यावा . हीच खरी श्रद्धांजली ठरेल
48) जाहिरात करून जेवढा प्रभावी प्रचार झाला नसता त्या पेक्षा जास्त प्रचार व फायदा झाला. आणि प्रचाराच्या खर्च वाचला हं मंडावली करण्यास थोडा फार खर्च झाला पण तो खूप कमी जय महाराष्ट्र जय स्वातंत्र्य दिकद्रर्शकाच्या आयचा घो , हिरोच्या आयचा घो , फायनंसार च्या आयचा घो सिनेमा पाहणाऱ्याच्या आयचा घो अशी कांही नावे पुढील वेळी देता येईल
46) "जे नेते सध्या हयात आहेत, त्यांच्या जीवनावर किंवा त्याच्याशी साधर्म्य असणाऱ्या कथांवर चित्रपट काढूच नये.याही पेक्षा पुढे या नेत्यान चे पुतळे उभे करू नये . गल्ली बोळा पासून ते महामार्ग, झोपडपट्टी, शिक्षण संस्था, सार्वजनिक ठिकाणे यांना सुद्धा यांची नावे देणे कायद्याने बंद करावे. आणि नेता मेल्यावर ३० वर्षांनी यांची नावे आवशकता असेल तर पुढील पिढी देईल त्याच बरोबर राष्ट्रीय पुरस्कर पद्मश्री ते भारत रत्न हि सुद्धा ३० वर्षांनी च द्यावे
45) भारतातील विद्यार्थी सामान्य नागरिका भवती नोकरशहा राजकारण्याचा असा काही फास बसला आहे की त्यांना आत्महत्त्या करण्या शिवाय दुसरा पर्याय राहिला नाही हे माझे म्हणणे अतिरंजित वाटत असले तरी हेच कटू सत्य आहे. गेल्या ६०वर्षात नोकरशहा , राजकारणी नेत्यांनी कधी त्रासून आत्महत्या केल्याचे आपण ऐकले आहे का? इंग्रजाच्या१५० वर्ष काळा पासून चालत आलेली शिक्षण पद्धती बदलण्याची तसदी सरकारने घेतली नाही.रोजमराच्या जीवनात या दोघानाचा दहशदवाद एव्हढा आहे कि दुश्मनाचा पाकीस्थान चा दहशदवाद बरा हे नाईलाजने मान्य करावे
44) आहो असे काय करता विलासरावांना डी. लिट पदवी भेटते म्हणून ओरड का करतात ? शासकीय जमिनी , MIDC च्या जमिनी कोणताही भ्रष्ट्राचारा पुरावा मागे न ठेवता, कायदे कानून गुंडाळून ठेऊन कश्या हडप करायच्या, अकार्यक्षम असूनही जिंदगी भर मंत्री कसे राहावे , जनतेच्या प्रश्ना कडे विनोदी बोलून कसे दुर्लक्ष करावे, राज्याचा कारभार करताना जनते कडे दुर्लक्ष करून हिरो-हिरोईनच्या सिनेमा जगात कसे रमावे, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा,घराणेशाही ईत्यादी अनेक विषयात गाढा अभ्यास असल्यामुळे त्यांना .....कदाचित हि डिग्री दिली असावी....
44) आंतरराष्ट्रीय म्हणू म्हणून संपूर्ण महाराष्ट्राची वीज चोरून खेड्या तील जनतेला अंधारात ठेऊन मुंबई ला चमकवले आता शेती करता असलेले पाणी चोरून शेती उजाडून मुंबईची तहान तुम्ही भागवणार खेडे शेती उजाडून मुंबई चे लाड बंद करा समानतेचे तत्वत: लागू करा राजकारण्यांच्या, नोकरशाहीच्या अपयशाचे नियोजन शून्य कारभाराचे ऑडीट करून त्यांना सजा करा पाणी वीज कपात मुंबईला लागू करा कोंबड कितीही झाकले तरी महाराष्ट्र भकास झाला हे कटू सत्य दडवता येणार नाही. मुंबईलाआलेली सूज मुंबई लाच धोक्यात आणणार आहे नंतर मुंबई वाचणार नाहि
43) सरकार, राजकारणी नोकरशहा ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळत आहेत त्या मुळे यांना खेळात राजकारण आणावयाचे आहे हे स्पष्ट होते खेळाडूना मानधन भेटत नाही हि शरमेची बाब आहे. त्यांना कोणी भडकून देत आहे हा मुद्दा चुकोचा आहे मुळात तुम्ही वेळेवर पैसे दिले असत तर हा वाद उदभवला नसता आपल्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्या पेक्षा त्यांना आधी पैसे द्या. यांना पगार वेळेवर भेटला नाही तर हे संप ,भ्रष्टाचार करतात हिंसेच्या मार्गाने न जाता जाता उलट गांधीजीच्या महान सत्याग्रहाच्या मार्गाने खेळाडू जात असल्या मुळे अभिनंदन
41) महाराष्ट्रात ज्यां राजकारण्यांच्या अकार्यक्षमते मुळे पाणी वीज संकट कोसळले ते मात्र दोऱ्यावर आले कि वीज चालू असते. लोडशेडिंग होत नाही हा जनतेवर अन्याय आहे. मंत्री नाही तर राष्ट्रपती , अमेरिकेचा अध्यक्ष येवो ठरल्यावेळी वीज बंदच झाली पाहिजे यामुळे या संकटाची यांना कल्पना येईल या संकटास जबाबदार असणार्या नोकरशहा , राजकारणी यांना हत्तीच्या पाया खाली देहांताची सजा चोकशी आयोग न नेमता द्या. मग पहा हे सगळे सुता सारखे सरळ होऊन काम करतील नाही तर जनता उठाव करेल मग यात इंद्राय स्वाह!
तक्षाय स्वाह! जळतील
40) दोष चीन चा नाही पाकीस्थान चा नाही आणि आपल्या महान गांधीवादी राजकारण्यांचा तर नाहीच नाही. नेहरू नि लोकसभेत बयान दिलेच होते कि ती जागा ओसाड आहे .तेथे गवताचे पातेही उगवत नाही , यामुळे आम्ही त्याकडे लक्ष देत नाही आणि अभी दिल्ली बहोत दूर है काळजी करण्याचे काही कारण नाही आम्ही चीन पाकीस्थान या दोघा बरोबर एकाच वेळी युद्ध करण्यास सामर्थ्यवान आहोत हे संरक्षण मंत्र्याचे बडे बोल आपण वाचलेच आहे आणि हो आपले महान पंतप्रधान सर्व कारस्थानाचे पुरावे घेऊन लवकरच अमेरिकेस जात आहे आता हि समस्या अमेरिकेची आहे जय
39) झोपडपट्टीत भूमिगत वीजवाहिन्यां. आधी तारेवर आकडे टाकून चोरलेली वीज चोरी लक्षात तरी येत होते आत तर राजकारणी नेत्या मुळे वीज चोरी उघड होण्याचा धोका निर्माणच होणार नाही ALL IS WELL चे नवीन पर्व सुरु होईल. झोपडपट्टीत हे विकासाचे महान काम केल्या बद्दल खासदारांचा सरकारी अधिकार्यांचा सत्कार समारंभ होईल यामुळे एक गठ्ठा मतांची सोय होऊन नेते प्रचंड मतांनी निवडून येतील. जागतिक बँकेच्या सहकार्याने सर्व झोपडपट्टीत हा प्रकल्प राबवला जाईल नेत्यांच्या बचत गटांना हे काम दिले जाईल फक्त एक अडचण होईल वीज मिळणार नाही
38) नाटक-चित्रपट ही कलाकाराची अभिव्यक्ती आहे पण याचा त्याना स्वातंत्र्य आहे हे मान्य केले तरी याचा अर्थ तुम्ही दाखवाल तो स्वेराचार, पिवळी संहिता असलेली नाटक समाजाने बिनविरोध पाहणे असा होत नाही. आपले स्वातंत्र्य किती मर्यादे पर्यंत वापराव याला मात्र बंधन आहे खालच्या दर्जाच्या प्रसिद्धी साठी हे नाव दिले गेले यात शंका नाही.स्वातंत्र्य म्हणजे स्वेरचार नाही हे लक्षात ठेवावे आपल्या लाईनी मधे स्वेरचारालाच स्वातंत्र्य म्हणतात ही गोष्ट वेगळी
37) हे चूक आहे बिविरोध निवडणूक म्हणजे फक्त एकानेच फार्म भरल्यावर दुसऱ्या कोणी उमेदवाराने फार्म नाही भरला तर त्यास बिनविरोध म्हणतात. इतरांनी अर्ज करूच नये अशी ३.५% व्यवस्था केली आणि हे निवडून आल्याचे जाहीर केले हे चूक आहे.३.५% चीच मक्तेदारी राहावी आणि बहुजन समाजातील साहित्यिक अध्यक्ष होऊ नये म्हणून हा सारा बनव आहे. जर तुम्हाला मताचा जोगवा मागवायचा नसेल तर बिनविरोध सुद्धा निवड मान्य करू नये. आणि देवाच्या दारी जोगवा मागणे म्हणजे कमीपणाचे नाही हे महत्वाचे रसिक नसले तर त्याच त्याच कविता कोण ऐकणार हो !!!!
36) तुम्ही अगदीच उपाशी तडफडत असल्याशिवाय देव दिसत नाही हे आपण लक्षात घ्या उगीचः देवा वर टीका करू नका तुम्ही "गिधाडे' आहात म्हणून गिधाड साठी भांडलात संपूर्ण समाज म्हणजे गिधाडे हा विचार मनातून काढून टाका पण नाटक-चित्रपट ही कलाकाराची अभिव्यक्ती आहे पण याचा अर्थ तुम्ही दाखवाल तो स्वेराचार, पिवळी संहिता असलेली नाटक समाजाने बिनविरोध पाहणे असा होत नाही. वैद्यकीय व्यवसाय सोडून दिला.'' एका विद्यार्थ्या चे नुकसान का केले? तुमची निर्णय घेण्याची क्षमता नाही हेच सिद्ध होते. यामुळे देवाच्या नावाने बरळत असतात
35) लोका सांगे ब्रह्म ज्ञान आपण कोरडे पाषाण अशी या राजकार्त्याची अवस्था झाली आहे. जनतेने तुम्हाला निवडून दिले तुम्ही धोरणे ठरविणारे आहात जगातील मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा ध्यास तुम्ही बाळगा त्या प्रमाणे नियोजन करा निर्णय घ्या. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अमेरिकेच्या भाडवलदाराच्या फायद्या करता आपले धोरण न राबवता आम भारतीयाचा फायदा होईल असे धोरण राबवा. उत्तुंग भरारीचे स्वप्न प्रत्येक विद्यार्थी पाहत असतो पण त्याला बेकारीच देतात आधी स्वताला सुधारा भ्रष्टाचार कमी करा अमेरिकेच्या बंधना तून मुक्त व्हा !!
34) संमेलनाच्या निमित्ताने साहित्य, कला, संस्कृती या सगळ्यावर पोषक चर्चा होत असते.पण आपण आपल्या लेखात या बद्दल काहीं सांगितले नाही. आजकाल संमेलन उपस्थित मंडळी
सांस्कृतिक कार्यक्रमा पेक्षा खाण्या-पिण्या वरच जास्त लक्ष देताना दिसतात. पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे हि आमची संस्कृतीच आहे. पण त्या पेक्षा जास्त सांस्कृतिक परंपरा अनेक क्षेत्रात आहे आणि त्या आम्ही पाळतो फक्त आपण ह्या परंपरेला विसरून पाशिमात्य चमकोगिरीला भुललात म्हणून आपल्याला हे सर्व नवीन भासते पण हा केवळ भास नाही तो इतिहास आहे
33) आपल्याला विनंती केल्यामुळे आणि मतांसाठी हात जोडावे लागणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानेच आपण दुबईचे संमेलनाध्यक्षपद स्वीकारले आहे हा दांभिकपणा आहे. लोकशाही मान्य केल्यावर मताचा जोगवा मागणे असे म्हणणे चूक आहे. मला बिविरोध निवडणून द्या असे म्हणणे हुकुमशाही झाली आहे.केवळ ३.५% चीच मक्तेदारी राहावी आणि बहुजन समाजातील साहित्यिक अध्यक्ष होऊ नये म्हणून हा सारा बनव आहे. जर तुम्हाला मताचा जोगवा मागवायचा नसेल तर बिनविरोध सुद्धा निवड मान्य करू नये. आणि देवाच्या दारी जोगवा मागणे म्हणजे कमीपणाचे नाही हे महत्वाच
32) कारण हा प्रश्न कांग्रेस नेच निर्माण केला फोडा आणि तोडा या अनित्तीने गेली ६० वर्ष कांग्रेस भारतावर राज्य करत आली आहे. स्वताच्या स्वार्था साठी भिंदरवाल्याचे भूत पंजाब मध्ये निर्माण केले. काश्मीर जळत असताना दुर्लक्ष केले , दक्षिणेत तर हिंदी बातमी सुद्धा दाखवली जात नाही. कधी जयललिता, कधी करुणानिधी, मायावती,मुल्ला मुलायम यांना वापरून देश अराजकतेच्या उंबरठ्या वर नेऊन ठेवला गांधी नि कांग्रेस बरखास्त करण्याचे ठरविले होते पण स्वार्था साठी मानले नाही प्रत्येक पक्ष फक्त स्वतःचा विचार करतोय ना देशाचा
31) चोराच्या उलट्या बोंबा यालाच म्हणतात मुक्त अर्थ व्यवस्था , अन्नधान्याचा सट्टाबझार अमेरिका धार्जीन व्यापार धोरण या पापावर पांघरून घालण्या करता राज्य सरकारवर खापर फोडणे म्हणजे स्वत:च्या राज्य सरकारांची बदनामी करणे होय याच बरोबर आपण राज्य करण्याच्या लायकीचे नाही हे मान्य करणे होय. पंतप्रधान जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ आहे याची शंका येते या मातीत शिकलेला या मातीशी प्रामाणिक असणारा INDIA नव्हे तर भारताचा आम आदमीचा विचार करणारा पंतप्रधान जो पर्यंत देशाला मिळत नाही तो पर्यंत हे असे चालणार आहे फक्त जयहो
30) महात्मा गांधींची गरज आहे. अहिन्सेतूनच सगळे प्रश्न सुटतात. हा भारतीयांच्या मेंदूतील केमिकल लोच्चा आहे.स्वतःच्या स्वार्था साठी भांडवलदार देशांनी ईतके दिवस जग हे ग्लोबल खेडे असल्याचा प्रचार केला आपण यात अडकलो गेलो हे कोणालाच समजले नाही आणि आता अविकसित देश प्रगती करत आहे तर हे असे हल्ले करत आहे हा भूमिपुत्र विरुद्ध उपरे असा संघर्ष आहे तो होणारच कधी महाराष्ट्रीय विरुद्ध बिमारू उत्तरेतील राज्ये रात कधी भारत विरुद्ध आस्ट्रेलिया अमेरिका अखेर स्वार्थ मोठा
29) भारत एकाच वेळी पाकिस्तान व चीनशी लढा देऊ शकतो याला म्हणतात मुंगेरीलाल, के सपने किंवा शेख चिल्ली के खाब्ब . भारताला कोणत्याही प्रकारचे युद्ध नको आहे. हि वृत्तीच शत्रू ला आक्रमण करण्याची हिम्मत वाढवत असते कांही केले तरी भारतीय राजकारणी हे आपले कांहीच वाकडे करू शकत नाही एवढा संसदेवर हल्ला झाला मुंबई वर हल्ला झाला आता पलीकडून राकेटचा मारा चालू आहे तरी आपले अहिंसेचे तुणतुने चालूच आहे महात्माजीच्या या अहिंसेने भारतीय नेत्याची अशी नसबंदी केली आहे कि एक दिवस हे नेतेच दुष्मनाला आपला देश देऊन टाकतील जयहो
28)पुण्याच्या बँकेने जालन्याच्या खातेदारास कर्ज कोणत्या नियमाने दिले हे कर्ज संशयी आहे एरवी सामान्य माणसास बेरोजगार विद्यार्थायाना कर्जच काय DRAFT हि बँका गावातल्या गावात देत नाही. तुमच्या गल्लीतील बँके मधून बँकिग सेवा घ्या,तुमचे खाते नाही.RBI हि आमचे कांही वाकडे करू शकत नाही असे मस्तवाल उत्तर देतात. RBI कडे तक्रार करूनही यांना RBI काहीच करू शकत हे सत्य आहे बँका या फक्त घोटाळे करणाऱ्या करताच काम करत आहेत RBI गाईडलाईन आणि कायदा असा संभ्रम निर्माण करून खातेदारास रस्त्यावर आणण्याची भाषा करतात
27) बेकायदेशीर घुसखोराना कायदेशीर रित्या भारताच्या अंतर्गत कारभार करण्याचा मुक्त परवाना देशातआलेले कोट्यावधी घुसखोर हूडकण्यास यंत्रणा नापास झाली आहे आता तर अनिवासी मतदानाच्या नावाखाली हे घुसखोर दहशदवाद करण्यास मोकळे झाले. या सवलतीचा गेर वापरच जास्त होणार आहे प्रथम भारतीय नागरिकास भारतात इंटरनेट द्धारे मतदानाचा अधिकार द्या देशतील मतदान कसे वाढेल ते पहा निवासी भारतीयांच्या मागण्या कडे लक्ष द्या उगीचच हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या मागे अशी आपली गत कधी होईल आणि देश भांडवलदारांच्या पंजा खाली येईल
26) आर्थिक विकास दर नऊ ते दहा टक्के राहील, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला. मात्र, याकडे बाजाराने दुर्लक्ष केले. कारण जनता मनमोहन, प्रणव मुखर्जी चीदामबारण सारखी मुंगेरीलाल के सपने पाहत नाही. जनता रोटी, कपडा मकान च्या विवंचनेत आहे. सरकारी पैशाने ५ स्टार हॉटेल मंत्र्या प्रमाणे ती राहत नाही. आणि common man चे प्रश्न या त्रिमुर्तीला काय माहित. common man पेक्षा अमेरिकन अणु कंपनी चा माल भारतात कसा विकला जाईल याची याची यांना चिंता असते
जय हो भारत भाग्य विधाता जय हो
25) मुंगेरीलाल के हसीन सपने आणि मनमोहंजी के आर्थिक विकास के सपने सारखेच आहेत. मनमोहंजी ये कॉंग्रेस का इमानदारिका मुखवटा आहेत. जसे मुंगेरीलाल ची स्वप्ने तुटत असतात आणि तो नवीन स्वप्ने पाहत असतो तसेच मनमोहंजी अमेरिकेच्या नीतीतून भारताच्या विकासाची स्वप्ने पाहत असतात ती मग महागाई च्या रूपाने तुटत असतात . तरी हे स्वप्ने पाहत राहतात अमेरिकन लोंब्बी ला ठोकर मारून भारतीयांच्या मातीचा विचार करणारा वित्तमंत्री,पंतप्रधान भारताला मिळत नाही तो पर्यंत फक्त इंडिया चाच विकास होईल आणि भारत उजाड होत राहील.
२४) 34 कोटी रुपये स्टॅनचार्ट बॅंक व सिंगापूर स्पोर्टस असोसिएशन यांना मिळतील. तरीही यांनी मुंबई महापालिकेचे २ कोटी रुपये थकविले आणि सरकारही हि हि थकबाकी माफ करा म्हणून महापालिकेवर दडपण आणत आहे हे अजबच आहे सिंगापूर स्पोर्टस असोसिएशन वर सरकार एवढे का मेहरबान आहे ? It's Happen Only in India !
२३) गुरु शिष्य वगेरे काही नाही .लोण्याच्या गोळ्या करता हे लबाड बोक्या प्रमाणे भांडत आहेत. एकमेकाचे पाय खेचतच यांचे राजकारण चालते. मुह मी राम बगल मी छुरी असे यांचे वागणे असते. गळाभेट करून पाठीत वार करण्याचा यांचा प्रयत्न असतो. पण शिवाजी सारखे वाघ नखे वापरायची यांची हिम्मत नसते
22) GOD SAVE NATION दहशतवादी हल्ल्या नंतर हेच कलाकार, खेळाडू, सो काल समाजसेवक,बुद्धिवादी, मेणबत्त्या हातात घेऊन, मानवी साखळी उभारून ( याने काय होते कोणी सांगेल का?) मिडिया समोर येऊन मगरीचे खोटे अश्रू ढळतात. जीवन कोणत्याही लढाई मुळे थांबत नसते हे सत्य माहित असून हि हीच मंडळी परत मिडिया समोर येऊन मुंबई जिंकली असा उन्माद करतात जसे यांनी लडाई जिंकली . मुंबैकराला मात्र ९ ची लोकॅल पकडून पोटापाण्याच्या करता नाईलाजणे रोजची कसरत सुरु करावी त्याच्या या मजबुरी कडे जाणून बुजून दुर्लक्ष्य करून चमकोगिरी चालू होते
21) कोणतीही नवीन व्यवस्था अमलात आनावायाची असेल तर थोड्या बहूत अडचणी येणार . मागासालेल्या विभागातजेथे संगणक नाही तेथे अग्री का ले ज चे प्रवेश सुरळीत झाले फक्त जुन्या सिस्टिम ला नुकसान होत आहे यामुळे विरोधकेला जात आहे आणि सन्गणकामुळे मार्क नुसार का ले ज मिळत असल्या मुळे मोठया शाळे मनमानी पणाला आळाबसला आहे .म्हणून ही ओरड चालू आहे.सर्व्हर मोठा बसवला तर सर्व अडचणी दूर होतील. आज लाखो नोकर्याMKCL PUNE यांच्या मार्फत 0% सुद्धा चुका न होता यशस्वी पणे भरल्या जातात यामुळे प्रवेश संगणका नेच करावे. यामुळे पारदर्शिपणा ऐईल . मक्तेदारी ला लगाम बसेल
20) पालक बरोबर शाळांना सुद्धा समुपदेशनाची गरज जास्त आहे. शाळा या शिक्षण सोडून बाकी उपक्रमालाच तबला,नाच,गाणे ,पोहणे स्नेह-संमेलन याला नको इतके महत्व देत आहे . डिसेंबर ते फ्रेबवारी हे ३ महिने स्नेह-संमेलन नाच,गाणे यातच जातात. आणि हे उपक्रम व्यापारी तत्वावर चालवले जातात यामुळे शाळांना आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणात होतो.यामुळे प्रत्येक शाळा आंम्ही मुलांचा सर्वांगीण विकास करतो याची जाहिरात करत असतात शालेय सहली या शेक्षणिक न राहता ४ दिवस मोजमजा या स्वरूपाच्या झाल्या आहेत. या अषेक्षणिक बाबीवर नियंत्रण नाही
19)
|
17) दहशतवादी हल्ल्याचे ३ पेज वरील उथळ बातम्या प्रमाणे चर्चा केली जाते याचे कारण हा हल्ला सिलीब्रेटीसज च्या टिकणा वर झाला होता आणि २४ घटे बातमी द्यावयाची, सर्वात आधी, च्या जीव घेणाऱ्या स्पर्धेत टिकून राहण्या साठी या पेक्षा खमंग बातमी दुसरी असू शकत नाही यातच राजकारणी आणि नोकरशाहीची बेकायदेशीर बेताल वक्तव्य याची भर पडली याची तुलना सवत विधवा होते म्हणून स्वत: च्या नवऱ्याला मारणाऱ्या कृती शी करता
येईल यामुळे आधीच माकड त्यात दारू प्यायला अशी मीडियाची अवस्था झाली व प्रसंगाचे
गांभीर्य कमी झाले उत्सव झाला
16) आपण चर्चा करून काही उपयोग नाही. कारण प्लास्टिक थेल्या उत्पादनासाठी जो कच्चा माल प्लास्टिक दाने लागतात त्या उत्पादक लोंबी चे हातात भारत सरकार आहे आणि त्यांचे नुकसान करण्याची हिम्मत करू शकत नाही एकाच उपाय आहे दिल्ली प्रमाणे कागदी थेल्या तून सामान देण्याचा कायदा करणे या थेल्या हाताने कराव्या लागतात यामुळे अनेक बेकारांना महिलांना हाताला काम मिळेल रद्दीचा चांगला उपयोग होईल .सर्वात महत्वाचे म्हणजे प्रदुषणाला आला बसेल नकारात्मक कायदे करण्या पेक्षा सकारात्मक कायदे करा. या विषया वर सकाळच काम करू शकेल
15) आम आदमी ला बँकेत जाने नको झाले आहे. आज प्रत्येक नोकर भरती व इतर कामा साठी १०० ते ५०० रुपया पर्यंत ड्राफ्ट लागतो पण बँका विविध करणे सांगत ड्राफ्ट नाकारतात या सुशिशिक्षित बेरोजगारांना बँकेच्या दारोदार चक्कर माराव्या लागतात याबद्दल आर बी आय हि हात वर करते. माकडाच्या म्हणी सारखे बँक इज आल्वेज राईट इफ नो सी रुल नंबर वन .हि अवस्था झाली आहे. आणि लघु उद्योग तर बंद करण्याचे आणि उद्योजकास रस्त्यावर आणण्याचा ठेका यांनी घेतला आहे जरा हे बँकिंग क्षेत्र आम आदमी करता काम करेल तर बघा इंदरा गांधी ला शांती मिळेल
14) असे प्रवचन देणे हे आजच्या राजकारण्याची पद्धत झाली आहे. मनमोहनसिंग जी आपल्या हातात सत्ता आहे देशतील सर्वोच पदावर आपण आहात तेंव्हा आपण कृती करा केवळ टाळया घेणारे भाषण करू नका अमेरिके बरोबर अणु करार करताना आपण जी तत्परता दाखविली ती देशातील लालफितीचा कारभार बदलण्या साठी दाखवली तर बरे होईल त्याच बरोबर आपण बँकिग सुधारणा केल्यात पण आज बँकेचा कारभार सुद्धा लालफितीत अडकला आहे आमचे कोणी वाकडे करू शकत नाही आणि आम्ही कोणाला हि रस्त्यावर आणू शकतो हि बँक कर्मचार्याची वृत्ती झाली आहे. आम आदमी ला बँकेत जाने नको
13) सरकारने हि कामे आधीच केली असती तर हि युवा नक्षलवादी,माओवादी झालीच नसती आता तरी सरकारने यांच्याच सहकार्याने विकास कामे करावीत आणि यांना समाजाच्या प्रवाहात आणावे . आपण एवढ्या दहशतवादी कारवाया नंतरही पाकीस्थान शी चर्चा वाटाघाटी करतोच ना मग हे तर आपलेच नागरिक आहे आणि हि समस्या आपणच(राजकारण्यांनी) विकास कामे न केल्या मुळे निर्माण झाली आहे. सुबह का भुला शाम को घर आया तो तो भुला नही कहा जाता माफ कर देना
12) सिस्टीम बदलत आहे .लवकरच या सर्व गोष्टी रेल्वे रिझर्वेशन प्रमाणे ऑन- लाईन संगणीकृत होत आहे याची दिल्ली पासून गाव पातळी पर्यंत तयारी झाली आहे. जन्म प्रमाणपत्र ते वारसाहक्क जात प्रमाणपत्र राहवाशी दाखला या आणि इतर सर्व गोष्टी ई-महासेवा या सरकारी संगणीकृत उपक्रमा मार्फत आपल्याला आपल्याच गावात उपलब्ध होतील.सरकार हजारो केद्रे खेड्यापाड्यात सुरु करत आहे, बरीच चालू झाली आहेत यामुळे जुन्या व्यवस्थेला (सरकारी)आर्थिक नुकसान खालं पासून ते वर पर्यंत होणार आहे यामुळे अडथळे आणले जात आहे. पण लवकरच हे सुरु होईल
11) शिवाजी महाराजांनी दुसऱ्या धर्मात गेलेल्यांना परत आणले १००% बरोबर आहे. पण सामाजिक व्यवस्थेने वर्षो न वर्ष अन्याय केला म्हणून ते दुसऱ्या धर्मात गेले होते. यांची व केवळ पैशा साठी परदेशात गेलेल्या डॉक्टर ची तुलना होऊ शकत नाही. माझ्या भारतात कांही गोष्टी वाईट असतील, खेड्यात सुविधा नसतील, भ्रष्टाचार आहे पण याचा अर्थ डिग्री मिळाली की देश विसरावा असे नाही. एका डॉक्टर करता देश किती पैसा खर्च करतो याचा आपण कधी विचार केला का? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सिस्टीम आपणच बदलावयाची असते. युद्धाला घाबरून पळू न
10) माझ्या प्रतिक्रिये वर इंग्रजाळले ल्या डॉक्टर ची खूपच तिखट वैयक्तिक रागाची क्रिया उमटली. मुळात ८०% आजार हे साध्या उपचाराने दुरुस्त होतात . मी या आधी लिहिल्या प्रमाणे आज संपूर्ण वैद्यकीय व्यवसाय हा रुग्णांच्या करता नसून मेडीसीन उत्पादक, विमा कंपन्या डॉक्टर यांच्या नफेखोरी साठी चालवला जातो हे कटुसत्य आहे. पण हे सत्य लपवले जाते.सरकार खेड्या साठी कमी कालावधीचा डिप्लोमा कोर्स सुरु करणार आहे. मी तर म्हणतो असे डॉक्टर केवळ खेड्यातच नव्हे तर शहरात सुद्धा आवश्यक आहेत पण हि भ्रष्ट साखळी मोडण्याची ताकद नाही
9) "एम्स'सारख्या संस्थ्या मध्ये काम करण्यास भारतात का तज्ञ डॉक्टर्स नाही का . या डॉक्टर्स लोकांना जरा खेड्या-पाड्यात पाठवा. या देशात शिक्षण घेऊन येथे दवाखाना न टाकता पैश्या करता हि मंडळी तेथे गेली .आता त्यांची गरज संपल्या मुळे आणि तेथेही भूमी पुत्र विरुद्ध परके हा संघर्ष सुरु झाल्या मुळे यांना माय भूमी आठवली . पण आपल्या सरकारला स्वदेशी पेक्षा परकीयांचेच जास्त कुतुक. यांना जर देश प्रेम असते तर पैश्या करता हे परदेशात परदेशात गेलेच नसते . यांना सरळ स्वताची व्यवस्था स्वतः करा म्हणाव
8) आयुष्य भर गुन्हेगारांच्या संगतीत राहिल्याचा परिणाम आणि कायदा कसा वाकवायचा याचा ईतक्या वर्षात अभ्यास झाला असेल . निर्वूत झाल्या मुळे वरची आमदनी बंद झाली मग पैसा कमावण्याचा जगातील सर्वात जुना मार्ग वापरला पण न्याय देवता आंधळी असली तरी न्याय आंधळा नसतो हे यांना माहित नसेल
7 )करीनाला अमीर देव म्हणजे बॉलीवूड मधील देवानंद अभिप्रेत असेल आणि अशी मुलाकात देऊन या सिनेमा मध्ये मी नायिका आहे हे जगाला सांगावयाचे आहे. आमिरच्या सिनेमात नायिका ह्या असून नसल्या सारख्या असतात . जश्या देवानंद च्या सिनेमा मध्ये त्याच्या भोवती फिरणाऱ्या नायिका असतात तश्या . गेल्या ४-५ सिनेमातील आमिरच्या नायिका आठवा आणि १००० रुपये बक्षीस मिळावा. अशी परिस्थिती करीनाची कांही दिवसांनी होईल
6) जगात आमची कोठेही शाखा नाही. आमच्या मालाला भरपूर ओर्डेर्स आहेत. आमचाच माल जगात उत्तम आहे. पसंत असेल तर घ्या वगेरे वगेरे असे महाराष्ट्रायीन माणसा चे व्यापार धोरण असते . १०- १० वेळेस फोन लाऊन उचलत नाही. ई- मेल उत्तर देत नाही मालकास निरोप देतो म्हणतात पण तो पण नाही. कुठेतरी कांही आमचेच चुकले आपणास आपल्या बहुमोली माला बद्दल विचारले.
एक महाराष्ट्रायीन ......जय महाराष्ट्र !!! एका ग्राहकाचा सत्य अनुभव आहे, जास्त काय सांगावे
5) पिढ्या न पिढ्या मालक असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार एका झटक्यात काढून घेऊन विकासाच्या नावाखाली त्यांना देशोधडीस लावते आणि उद्योगपतीच्या घशात घालते कालांतराने हे उद्योग हे कारखानदार बंद करतात, कामगारांना देशोधडीस लावतात व या जमिनीवर ईमारती बांधून करोडो रुपये कमावतात . या जमिनी त्यांना कारखान्या साठी दिलेल्या असताना तो बंद झाला तर सरकार सरळ त्या जमिनी ताब्यात का घेत नाही. शेतकर्यांना एक कायदा व कारखानदारांना वेगळा कायदा असे का? इंडिया आणि भारत या दोन विभागात भारतावर अन्याय का केला जातो .
4) यावर प्रतिक्रिया देताना उच्च स्तरीय सरकारी अधिकार्याने आपले नाव न सांगता , या प्रकरणाची उच्चस्तरीय चोकशी सुरु करण्यात येईल आणि दोषी आढळणाऱ्या अधिकार्या विरुद्ध कोणतीही दयामाया न दाखवता कडक कारवाई करण्यात येईल . तसेच हाय अलर्ट जारी करण्यात आला असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे, तसेच मंत्री मंडळाची बैठक बोलावली असून त्यात या परिस्थिती वर चर्चा करण्यात येईल, अमेरिकेला यात पाकीस्थान चा हात असल्याचे पुरावे पंतप्रधान सादर करतील .दरम्यान विरोधी पक्षाने या प्रकरणी सरकारचा राजीनामा मागितला आहे
3) हा! हा! हा ! २०१० मधील पहिला विनोद , पहिला अव्यहार्य , पहिला सवंग प्रसिद्धी साठी , काहींच काम न करता किती काम करतो हा देखावा करणारा असा हा राजकीय तमाशा मधील वग आहे या निर्णया वरून शोले मधील हम नही सुधरेंगे च्या असरानीची आठवण झाली .या राजकारण्यांचे वागणे तसेच आहे. यांची सवंग प्रसिद्धी ची हाव कधी जाईल देव जाने. सरळ प्लास्टिक पिशव्या उत्पादनाला बंदी घाला कि. पण आर्थिक हितसंबंध ला बाधा येते. अश्या निर्णयाचे दोन फायदे होतात काहींच न करता जनता खुश दुसरी कडे उत्पादक गाठी भेटी
2)देव न मानणे व दुसऱ्यास बळजबरीने देव नका मानू हे सागणे हि देखील एक आधुनिक अंध श्रद्धा च आहे. आपण नाटक सुरु करण्या आधी नटराजाची पूजा करतात, नारळ फोडतात, ते चालते जगात फक्त आपणच शहाणे हा या निर्मुलन अंध संस्थे च्या कार्यकर्त्यांचा गेरसमज आहे. समाजाला सांगे ब्रम्हा द्यान आपण कोरडे पाषाण . घरी सत्यनारायण करतील पण बाहेर ढोंगीपणाचा बुरखा घालून मी नाही त्यातली म्हणतील. आम्ही देव मानत नाही हि सुद्धा मानसिक विकृती आहे tuj sagun mhano ki nirgun रे हेच खरे आहे. तुम्ही माना न माना कांही फरक पडत नाही
1)२/०१/२०१० भारत आणि इंडिया या मध्ये हा फरक आहे. इंडियात तुम्हाला घोड्याच्या रेस चालतात, घोड्यना उतेजक दिलीली चालतात,त्या वरील जुगार चालतो.दुसर्याचा घोडा हरावा म्हणून केलेले अपराध चालतात, या रेस मध्ये पेटा या प्राणी मात्रावर भूत दया दाखवा म्हणणारेच सहभागी असतात. मात्र यांना भारतातील खेड्या पाड्यात जनतेच्या आनंद करता निर्भेळ करमणुकी चालत नाही. मुक्या प्राण्यावर अन्याय होतो म्हणून हे मगरीचे अश्रू ढाळतात लगेच कोर्टात जातात आधी रेसकोर्स चा जुगार बंद करा यांना डब्बा बंद मांस चालते पण भाविकांनी कापलेली चालत नाही
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.
1 comment:
खुपच उस्त्फुर्त प्रतिक्रिया..
Post a Comment