सध्या
FB च्या अनेक साईटवर वर होळीला पाण्याची नासाडी, उधळपट्टी म्हणून होळी खेळू नका असे
आवाहन केल्या जात आहे.... त्याच बरोबर आम्ही होळी नाही खेळली तर दुष्काळग्रस्ताना पाणी
मिळणार आहे का?? आमच्या धार्मिक उत्सवावर बंदी घालणारे तुम्ही कोण ??? आमचा पैसा खर्च करून आम्ही पाणी,रंग
उडवले तर इतरांना विरोध करण्याचा हक्क नाही इत्यादी इत्यादी .......
एक दिवस होळी खेळून पाणी वाचावा हा संदेश सल्ला चांगला
आहे. पण आपण जेंव्हा असा सल्ला देतो किंवा पाण्याच्या उधळपट्टी बद्दल बोलतो दुसऱ्यावर
आरोप करतो तेंव्हा आरोप करणाऱ्याची तीन बोटे त्याच्या स्वतः कडे त्या आरोपांचे निर्देश
करत असतात हे आपण सोयीस्कररीत्या विसरतो. ……. मुंबई मधील ३६५ दिवस दिवसच्या २४ तास
पाण्याच्या गैरवापराचे , अपव्यया चे कांही फोटो जोडत आहे. . १९८०च्या जागतिक बाजारीकरणाच्या
नावाखाली या देशाचा विकास म्हणण्या पेक्षा विद्रूप भकास करण्यात आला . सामाजिक बांधिलकी
कश्याला म्हणतात याचे कांहीही सोयरेसुतक या अर्थतज्ञाना, विकासकाना नाही. मुंबई पुणे
अश्या मोठ्या शहरांचा , मनोरंजनांचा अविवेकी विकास करण्यात आला.