Translate

Wednesday, August 1, 2012

इंदिरा इज इंडिया...... & इंडिया इज इंदिरा

आसाम मधील हिंसाचार हा राष्ट्रा वरील मोठा डाग आहे. मनमोहन सिंग अगदी बरोबर आहे. या कठपुतळीचे HERMASTARNIJ VOICE चे म्हणणे...चाळीस वर्षा पूर्वी  १९७१ च्या पाकिस्तान युद्धानंतर इंदिरा गांधीवर स्तुती सुमनांचा वर्षाव झाला. त्या वेळी वाजपेयी देखील मागे नव्हते....याच वेळी इंदिरा कॉंग्रेस चे अध्यक्ष देविकांत बारुआ यांनी कुप्रसिद्ध घोषणा केली होती. इंडिया इज इंदिरा AND इंदिरा इज इंडिया........या चापलुसीपणाची परंपरा कॉंग्रेस कार्यकर्त्ये आज ही प्रामाणिकपणे पाळतात हेच मनमोहनसिंग यांच्या वक्तव्या वरून दिसून येते........काल महाराष्ट्र विधान परिषदेच्या शपथ विधी प्रसंगी शपथ घेताना संजय दत्त या आमदार महाशयांनी तर बेशरामपणाचा कळस गाठला.आणि जय महाराष्ट्रा सोबतच जय सोनिया गांधीजी घोषणा केली आणि सर्व उपस्थित
 बेशरमा सारखे हसू लागले.....मी स्वतः TV वर डोळ्याने हे पहिले आणि ऐकले....डीडीच्या दुनियेत FOTO
इंडिया इस इंदिरा म्हणणाऱ्या कॉंग्रेस च्या दृष्टी ने इंदिरा गांधी यांचे पाप म्हणजेच इंडिया देशाचे पाप कलंक आहे कारण आसामच्या या कलंकास  खुद्द इंदिरा गांधीच जबाबदार आहेत. १९८३ मध्ये इंदिरा गांधी काळात आसामसाठी ILLEGAL MIGRANTS DETERMINATION बी TRIBUNALS ACT हा घातक कायदा मंजूर करण्यात आला. त्यानुसार एखादा घुसखोर बंगलादेशी आहे का, हे सिद्ध करण्याची जबाबदारी तक्रार करणाऱ्यावर पडली. देशभरच्या अन्य राज्यांत ‘फॉरेनर्स अ‍ॅक्ट’खाली घुसखोराला आपण या देशाचे नागरिक आहोत हे सिद्ध करावे लागते. यामुळे आसाममधील बांगलादेशी घुसखोर वाढू लागले. नेहरूंनी ज्याप्रमाणे फक्त काश्मीरसाठी घटनेत ३७० कलम टाकून काश्मीरमध्ये पाकिस्तानी शक्ती वाढू दिली त्याचेच अनुकरण इंदिरा गांधी यांनी आसाममध्ये केले. नेहरूंमुळे तीन लाख काश्मिरी पंडितांना आपली जन्मभूमी काश्मीर सोडावे लागले, तसे आज आसाममधून दोन लाख मूळनिवासी (बोडो आदिवासी) भारतीय लोकांना आपली जन्मभूमी सोडावी लागते आहे. दुर्दैवाची बाब ही की, दंगलग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जी घरकुल योजना अंमलात आणावयाची आहे तिला ‘इंदिरा आवास योजना’ असे नाव देण्यात आले आहे! दंगलग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. ‘आसाममधील दंगल हा देशावरील कलंक आहे’, असे पंतप्रधान मनमोहन सिंग आसामच्या दौऱ्यात म्हणाले. त्यांनी या कलंकाचे जनक आपलाच पक्ष आहे हे मान्य करावे आणि घुसखोरांविरुद्ध कडक कारवाई करावी. सर्वोच्च न्यायालयाने तसे आदेश केव्हाच दिले आहेत. परंतु सत्तालोलुप काँग्रेस राष्ट्रहितकारक आदेशही पक्षाच्या सोयीचे असले तरच पाळते. म्हणूनच इंदिरा  वरील कलंक हा देशावरील कलंक असा खोटा प्रचार मनमोहन करत आहे...

No comments: