पाव मिळत नसेल तर केक खा
पाव मिळत नसेल तर केक खा असे उद्दाम उत्तर जेंव्हा फ्रान्सच्या राणीने
भुकेल्या फ्रांस च्या जनतेला दिले तेंव्हाच लोकशाहीच्या क्रांतीची ठिणगी
जनतेच्या मनात पेटली आणि मग जगभर जुलमी
राजेशाही विरुद्ध उठाव होत लोकशाही स्थापन झाली. आणि लिंकन यांनी म्हटल्या
प्रमाणे government of the people, by the people, for the people” जनतेची
जनते कडून जनते करता चालवली जाणारी शासन प्रणाली म्हणजे लोकशाही. लोकशाही
तर आली.....
आज भारतीय जनता अन्न वस्त्र निवारा आणि पाण्या साठी तरसत आहे.....दुष्काळ
ने जनता बेजार आहे.....शेतकरी आत्महत्त्या करत आहे....महागाईने कळस गाठला
आहे....अश्या वेळी इंडिया शासनाने....... मॅरेथॉन घोटाळे आणि ढिम्म
कारभारामुळे बदनाम झालेल्या केंद्रातील यूपीए सरकारने आतापासूनच 'इमेज'
बदलास सुरुवात केली आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून
सरकारने बोनान्झा ऑफरच आणली असून त्याअंतर्गत देशातील दारिद्र्य रेषेखालील
(बीपीएल) प्रत्येक कुटुंबाला मोबाइल देण्याचा विचार आहे. येत्या १५ ऑगस्टला
पंतप्रधान मनमोहन सिंग घोषणा करणार आहेत...
जय हो !!! जय हो !!! जय हो !!!
1 comment:
बहोत बढ़िया , अब सर्कार बदल्नेका वक्त आ गया है |
Tablet flop गया , इसलिए Government औकात पर आ गयी , अब मोबाइल बाटेगी ,
" इज्जत लगी घटने, तो खैरात लगी बटने "
Post a Comment