Translate

Saturday, July 28, 2012

छे छे DNA FNA हा सगळा फालतूपणा आहे......


आम आदमी की तीखी आलोचना  के साथ ही राजकीय नेतावों ने भी इस फैसले पर अपनी अपनी राय अपने हिसाब से दी.

स्वर्गात बापू जवाहर ला म्हणाले, पहा जवाहर पक्ष कार्यकर्त्यान चे नैतिक अधपतन......केलेल्या पापांची जबाबदारी स्वीकारण्याची माझ्या सारखी यांची नैतिक हिम्मत नाही....या मुळेच  मी तुम्हा सर्वांना कॉंग्रेस पक्ष बरखास्त करण्याचे आवाहन केले होते पण माझे कोणी ऐकले नाही....भोगा आता आपल्या कार्यकर्त्यांच्या पापाची फळे.....

thanks god !!! माझ्या वेळी हे DNA चाचणी प्रकरण नव्हते नाही तर माझी कीती पंचाईत झाली असती एव्हढेच चाचा नेहरू बापूला ऐकु जाईल न जाईल अश्या तऱ्हेने पुटपुटले...

स्वर्गात मराठा मध्ये आचार्य अत्रे गरजले , गेल्या दहा हज्जार वर्षात असे पाप कोणी केले नाही चाबकाने फोडून काढा त्या तिवारीची पाठ म्हणजे पुढच्या दहा हजार वर्षात असले पाप करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही.



छे छे DNA FNA हा सगळा फालतूपणा आहे......अशी तीव्र प्रतिक्रया देत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब  म्हणाले......माझ्या शिवसैनिकावर असा आरोप कोण्या सोम्या-गोम्याने बाई ने केला तर, एक काय माझे हजारो लाखो शिवसैनिक मीच मुलाचा बाप म्हणत सामोरे येतील........मग पहा त्या बाईला कशी पळता भुई थोडी होईल ....... जय शिवाजी!! जय भवानी!!

राज ,  माझ्या  माझ्या मनसे कार्यकर्त्यावर असा घाणेरडा आरोप कोणी केला तर मी मुळीच खपवून घेणार नाही .आताच सांगून ठेवतो..... आणि असा आरोप करणारीच्या  काना खाली खळ्ळ खट्याक !!! आवाज काढेन ..... माझा मनसे सैनिक  म्हणजे काय काँग्रेसी  कार्यकर्ता  आहे???

आर. आर. आबा,  लहान-मोठ्या सर्वच  पक्षात असे सेक्स कांड होतच असतात...त्या कडे जास्त लक्ष देण्याचे कारण नाही...असे सेक्स-कांड घडू  नये म्हणून प्रत्येक पक्ष कार्यालयात सी सी TV कॅमेरे लावण्यात येणार असून सांस्कृतिक साधन सुचिता या खात्यातून  हा खर्च केल्या जाईल....त्याच बरोबर कुटुंब कल्याण योजने अंतर्गत प्रत्येक पक्षाला कंडोम , गर्भ निरोधक गोळ्यांचा मोफत पुरवठा केला जाईल...... याचा उपयोग कसा करावा याचे सर्व पक्ष कार्यकर्त्यांना मोफत प्रशिक्षण सरकारी खर्चाने दीले जाईल.....त्याच बरोबर पक्ष कार्यकर्ता कार्यकर्ती यांच्या कडून मी खरे-खोटे आरोप करणार नाही म्हणुन शपथ पत्र लीहून घेतले जाईल....त्याच प्रमाणे या प्रकरणातील आरोपीला सर्व प्रकारची कायदेशीर मदत करण्याचे पक्षाला बंधनकारक केले जाईल..... अश्या प्रकरणात परदेशातील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्ठमंडळ लवकरच परदेशात बिल क्लींटन आणि इतर नेत्यांच्या भेटीस सरकारी खर्चाने पाठविले जाईल...

कॉंग्रेस :- गेल्या अनेक वर्षा पासून कॉंग्रेसला बदनाम करून सत्ता हस्तगत करण्याच्या प्रयत्नाला अपयश आल्याने विरोधकांनी आता कॉंग्रेस च्या  नेत्यांच्या चारीत्र्य हनना चा   हा अश्लाघ्य प्रकार सुरु केला आहे. इंडिया आणि पाकिस्तान मधील न्यायालया च्या माध्यमाचा दुरुपयोग करून जनतेने निवडून दीलेल्या लोकप्रतिनिधीला कारभार करू न देण्याचा कटाचे धागेदोरे परदेशात आहेत .त्याचे पुरावे देण्यास आमचे नेते लवकरच   अमेरिकेस जात आहेत.

राष्ट्रवादीच्या नेत्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटी वर आतील खास माहिती दीली......आमच्या पक्षात असे आरोप कोणी करत नाही....सर्व खुषीचा मामला असतो.... कांही तरी मिळविण्यासाठी, यशासाठी , वर्चस्वा साठी त्याग हा करावाच लागतो. असे आमच्या कार्यकर्त्यांना, महीला कार्यकर्तीला चांगलेच माहीत आहे...त्या मुळे आळी मिळी गुप चिळी हे आमचे धोरण आहे... 

पार्टी विथ डिफरन्स म्हणुन मिरवणाऱ्या भाजपाने कॉंग्रेस पक्षावर कडाडून हल्ला चढवत तिवारीच्या पापाची जबाबदारी  केंद्र सरकारने थेट स्वीकारून  त्वरित राजीनामा द्यावा. अशी मागणी केली . आमचा पक्ष सत्तेवर आला तर रामराज्या  सारखा कारभार करुत. कोण्या धोब्याच्या आरोपावरून स्वतः च्या धर्मपत्नी चा सुद्धा त्याग करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही....असे  जाहीरनाम्यात वचन देण्याचे पक्षाने जाहीर केले.........आण्णानी  बाबांनी या प्रकरणी रामलीला मैदानावर उपोषण करण्याचे ठरविले तर सर्व प्रकारच्या मदतीचे , मिडीयाच्या लाइव्ह प्रसारणाची हामी पक्षाने देण्याची तय्यारी दाखविली .

महेश भट्ट,  आमच्या सिनेदृष्ठीत हे पाप वगैरे कांही नाही. सिनेमा सृष्टीत येणाऱ्या प्रत्येक बाईला अभिनेत्री होण्या साठी Casting couch यातून जावेच लागते . मी लवकरच या कांडा वर वो मे नही हा जिस्म २ चा पुढचा भाग कॅनडाची पॉर्न स्टार सनी लियॉन याला घेवून  लवकरच काढणार आहे.

राहुल गांधी ,  अगर तिवारीजी रोहित के पिता है तो इसमे क्या बुरी बात है???..... ये तो निसर्ग के  नियम से ही हुवा है....हम पर इतने आरोप हुवे कुछ साबित हुवा क्या??   अब सावधानी बरतने के लिये हम खुद्द युवक कॉंग्रेस को संयम बरतने  एवं अफवाहों से बचने की शिक्षा संबोधित करेंगे.

राजकीय और सामाजिक महीला कार्यकर्ता ने रोहित और उसकी माँ  उज्जवला शर्मा की जमकर आलोचना की और राजकीय नेता को बदनाम करने के वास्ते उसे कोसा.  अब जनता हमारे संतान के बारे मे भी शक से देख रही ऐसा दर्द उन्होने जताया.

ब्रेकिंग न्यूज ........ अभी अभी इंडिया सरकार ने किसी भी राजकीय नेता के DNA जाँच पर रोक लगाने का अध्यादेश जारी किया है....प्रणब मुखर्जी राष्ट्रपति बनाने के ४८ घंटे के अन्दर ही सरकार ने ये नया अध्यादेश जारी  किया है...राष्ट्रपति की मुहर इस अध्यादेश पर लग चुकी है...ये अध्यादेश लागु होते की देश के तमाम नेता ने चैन की सांस ली है.......भ्रष्ट्राचार के आरोपों से ऐसे चारीत्र्य हनन के आरोप नेता पर करके उसका राजकीय सामजिक जीवन ख़त्म करने के साजिश को इस कानून से रोक लगेगी और नेता लोग चैन से आराम से काम काम काम कर सकेंगे.............जय हो जय हो 


No comments: