टीम आण्णा यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला
या बद्दल अभिनंदन....निवडणूक म्हंटल की बाई, बाटली पैसा ही प्रलोभन
आलीच......कोणी कीती ही लोकशाहीच्या गप्पा मारो भ्रष्ट्राचार, जात, धर्म
याच्या शिवाय निवडून येणे अश्यक्य कोटीतील गोष्ट.... .....आज प्रत्यक्ष
महात्मा गांधीजी जरी इंडियाच्या लोकशाहीच्या निवडणूक मैदानात उतरले तरी भ्रष्ट्राचार
केल्या शिवाय निवडून येणार नाहीत.......त्यांची अनामत रक्कम देखील जप्त
होईल ... हे सांगण्यास कोण्या जोतीष्याची गरज नाही...... हे माहीत
असल्यामुळेच भ्रष्ट्र कॉंग्रेस भाजपा सहीत मिडीयाला हर्ष वायू , आनंद
झाला. त्याना माहीत आहे या भ्रष्ट्र व्यवस्थेत टीम आण्णा ला आपण साम दाम,
भेद, दंड त्याच बरोबर धर्म , जात , प्रादेशिकता वाद यांचा दुरुपयोग करुत
पूर्णपणे पराभूत करुत .
लोकसभेत ९ सभासद असलेला पवारांचा राष्ट्रवादी, २२ जण असलेला मुल्ला मुलायम
समाजवादी , जयललीताचा AIADMK , करुनानिधीचा राजाचा १८ जणाचा DMK असे छोटे
छोटे भ्रष्ट्र प्रादेशिक पक्ष सरकारला ब्लैक मेल करत हजारो करोडोचा घोटाळा
सत्तारूढ पक्षाच्याच सहकार्याने करत असेल तर टीम आण्णा ५० स्वच्छ
सभासदाच्या दाबाबाने सरकारला जनताभिमुख स्वच्छ कारभार करण्यास नक्कीच भाग
पाडेल....
या करता टीम आण्णाने सर्वच मतदार संघात उमेदवार उभे न करता ठराविक मतदार
संघातच लक्ष केंद्रित करत ५०-६० उमेदवार निवडून येतील.. अशीच रणनीती आखावी
यामुळे भले इतर राजकीय पक्ष भ्रष्ट्र मिडिया सर्व उमेदवार उभे केले नाही
म्हणुन कीतीही बोंब मारो...दबाब गट निर्माण करावाच .....
No comments:
Post a Comment