सरकारच बरोबर असेल तर ......पिढ्या घडविणारी मंडळी वेडी आहेत काय ?
सरकारच बरोबर असेल तर ......पिढ्या घडविणारी मंडळी वेडी आहेत काय ?... PRABHAKAR HARKAL SIR................
सर,
सरकार म्हणजे तरी वेगळी अशी कोणती मानस आहेत........ जात,धर्म, पैसा बाX
बाXX देऊन आपलीच मत विकत घेऊन निवडून आलेल्या नेत्यांचे
मंडळ........आणि..... सर माफ करा, स्पष्ट बोलतो,.......निवडणुकीत आपण
प्राध्यापक मंडळी बहुत करून मतदान करतच नाही......तर अश्या प्रकारे आपल्या
मता शिवाय निवडून आलेले सरकार प्राध्यापकांची आणि पुढच्या पिढीची काळजी
कश्याला करेल......आणि आजचे सरकार तर शिक्षण,वाळू ,तेल,
दुध,दारू,भेसळ,खिचडी भोजन माफियांचे आहे.....त्यांचे हित संबंध तुमच्या आणि
भावी पिढीच्या हिता पेक्षा जास्त महत्वाचे आहेत का???? त्या मुळे या
माफिया सरकार कडून भावी पिढीच्या भविष्याची अपेक्षा करणेच चूक
आहे........शाळा महाविद्यालये जरी शिक्षण माफियांच्या असल्या तरी
........तुम्ही तर माफिया नाही आहात...... संप करून सर्वांचा रोष ओढवून
घेण्य पेक्षा ज्ञान , लेखणी, खडू, पुस्तक, फळा ही प्रभावी अस्त्रे
तुमच्या हातात आहेत.....त्याचा योग्य वापर विद्यार्थ्यांना ज्ञान देताना
करा......मतदान जरूर करा.......मग भावी पिढीतील प्राध्यापकांना संप
करण्याची वेळच येणार नाही. आपणच आम्हास शिकविले आहे एक वर्षाची बिदागी हवी असल्यास धान्य पेरा..शंभर वर्षाची बिदागी हवी असल्यास माणसे व पांच हजार वर्षाची बिदागी हवी असल्यास विचार पेरा........
आपला विश्वासू
माजी विद्यार्थी
No comments:
Post a Comment