नवी दिल्ली- सुमारे 17 वर्षांपूर्वी शासकीय रुग्णालयात एका
व्यक्तीकडून 100 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रुग्णालयाच्या दोन
कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविले असून एका वर्षाची शिक्षा
सुनावली आहे....................मुकुट बिहारी आणि कल्याण लाल अशी शिक्षा
झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत दोघांना कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची
शिक्षा सुनावली होती. त्यावर राजस्थान उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले
होते. याप्रकरणी गेल्या दोन दशकांपासून दोघे मानसिक आघात सहन करीत असल्याने
सर्वोच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा थोडी कमी करून एक वर्ष केली
आहे......दयाळू न्यायधीश ............
....आणि लाखो करोडो हजारोंची लाच घेणारयाणा भ्रष्ट्राचार करणाऱ्यांना या
इंडिया देशाचे पंतप्रधान , गृहमंत्री , अर्थमंत्री ,दूरसंचार , खेळ , विदेश
मंत्री , कृषी मंत्री पदे बक्षीस म्हणून देण्यात आली आहेत . तरी जनतेने लाच
मोठ्या प्रमाणत खावी असे सरकारी प्रव्रक्त्याने आपले नाव जाहीर न
करण्याच्या अटीवर सांगितले. असेच दयाळू न्यायधीश राजा कलमाडी आणि चोरांच्या
टोळीला मिळतील आणि हे सर्वजण निर्दोष मुक्त होतील . अशी खात्री सरकारला
वाटते असे ही त्याने स्पष्ट केले.
http://www.esakal.com/esakal/20120527/4735253090415637962.htm
http://www.esakal.com/esakal/20120527/4735253090415637962.htm
No comments:
Post a Comment