Translate

Tuesday, November 24, 2009

                                            


गेले दशकभर जगात सगळीकडे ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाने ओरड चालली आहे. विशेषत: मुंबईत २६ जुलै २००५ च्या न भूतो अशा प्रलयानंतर न भविष्यती करता काय करता येईल असा विचार व्यक्तिगत पातळीवर होऊ लागला, हा एक स्तुत्य बदल समाजात अनुभवायला येऊ लागला आहे.  पाणी वाचवा, वीज वाचवा, इंधन वाचवा, पर्यावरण वाचवा पर्यायाने वसुंधरेला वाचवा तरच आपण वाचू अश्या मागण्या सुशिक्षित समाजात जोर धरू लागल्या आहेत.

अनेक छोटे छोटे बदल आपल्या राहाणीमानात करायला आपण आपल्यापासून सुरूवात केली तर आपणच ओरबाडलेल्या या वसुंधरेला पुन्हा सुजलाम सुफलाम करता येईल

No comments: