आमच्या गुरुजीना आख्ख गाव लंगड्या मास्तर म्हणूनच ओळखायचे.
आमच्या
गुरुजीना आख्ख गाव लंगड्या मास्तर म्हणूनच ओळखायचे. आणि लंगड्या
मास्तराच्या शाळेत पोरग एकदा टाकल कि बाप कींवा माय शाळे कडे परत ढुंकून ही
पाहत नसत.........एव्हढा विश्वास शाळेच्या शिवणकर लंगडे सर, कुलकर्णी आणि
बारबिंड या शाळेच्या त्रिमूर्ती संस्थापक गुरुजींनी कमावला होता.
सणासुदीला मुलाची/मुलीची माय माउली आठवणीने लंगड्या सरांन करता घरून गोड जेवणाचा डब्बा
पाठवत असे ........... तर कधी धपाटे कींवा साधी तिखट मिठाची पोळी सुद्धा वेळप्रसंगी अगत्याने सरांना दे म्हणून देत असे......कारण
शाळेच्या संसारालाच लंगड्या सरांनी आपला संसार
मानले होते.....सरांचे स्वच्छ धुतलेले पांढरे शुभ्र कपडे, विध्यार्थ्याना
बसल्या जागे वरूनच मारण्या साठी खास बनवलेली लांब वेताची छडी अजून ही
डोळ्या समोर उभी राहते. सगळ्या सरांनी आम्हाला भरपूर मारले पण आम्हाला
कींवा आमच्या मायबापाना कधी राग आला नाहीं .उलट आम्ही तक्रार केली कि
मायबाप सरळ म्हणत तुझीच चूक असेल मास्तर उगीच तुला कश्याला मारतील . आजच्या
शिक्षण पद्धतीचे धिंधवडे पाहीले की नशीब आपण या काळात शिकत
नाही म्हणत देवाचे आभार मानतो. शिक्षकांनी माझ्या मुलाना मारले तरी मी
कधीही शाळेत तक्रार करण्यास गेलो नाही.....आणि आज सगळेच बदलले
आहे....बालमनाचा गुरुजींनी मारण्याच्या
आधीच पालक शाळेत तक्रार नाही तर भांडणाच्या आवेशात जातात. जर गुरुजींनी
मुलाला मारलेले पालकांस पटत नसेल तर त्यांनी घरी खाजगी शिकवणी ठेऊन सरां
बरोबर स्वतः बसावे .........
No comments:
Post a Comment