
मार्मिक मराठी व्यंगचित्र साप्ताहिक हे बाळासाहेबांचे लढाईचे हक्काचे शस्त्र होते.ऑगस्ट, इ.स. १९६०मध्ये
मार्मिक साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकाचे
मार्मिक हे नाव ठाकर्यांना त्यांचे वडील
केशव सीताराम ठाकर्यांनी सुचविले. व्यंगचित्रात्मक असलेले हे मराठीतील पहिले साप्ताहिक ठरले. साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री
यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. प्रकाशनसमारंभास
अनंत काणेकरही उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना यशवंतराव म्हणाले,“आज मी येथे रसिक म्हणून उपस्थित आहे. बाळ ठाकरे यांची
व्यंगचित्रं मी नेहमीच आवडीने पहातो. अनेकदा मीही त्यांच्या कुंचल्याचा
विषय ठरत असतो. त्यांच्या कुंचल्याचे बोचरे फटकारे ते त्यांच्या
व्यंगचित्रातून मारत असतात, पण तो सगळा आनंददायी भाग असतो. त्यांच्या
व्यंगचित्रांमुळे आम्हाला अंतर्मुख होण्याची संधी मिळते. जनतेची
प्रतिक्रिया कळू शकते. त्यांच्या या नव्या साप्ताहिकाला माझ्या शुभेच्छा.” शिवसेना साभार
या पहिल्या अंकाची किमंत फक्त पंचवीस पैसे (चार आणे) एव्हढीच होती.....आजच्या
महागाईच्या वणव्यात शासनाला पंचवीस पैश्याचे नाणे रद्द करावे ....... पण
त्या काळी एव्हढ्या पैशात महाराष्ट्राला हादरवून सोडणारे साप्ताहिक मिळत होते हे आपल्या नातवांना सांगितले तर ते विश्वास ठेवत नाहीत .
No comments:
Post a Comment