Translate

Saturday, November 17, 2012

महामृत्युंजय जपाची दुरावस्था चटा वरील श्राद्ध उरकण्या सारखी झाली आहे.

मरण अटळ आहे. राम-कृष्ण सारख्या देवतांना ही  मरण चुकले नाही..........आपण तर सामान्य माणसच..... असे असताना कोण्या मनुष्य प्राण्याने या महामृत्युंजय जपाची रचना करून मानवाला न मरण्याच्या खोट्या आशेवर झुलवत ठेवले देव जाणे.......   तो खरोखरच महान आहे. बर ज्याने कोणी हा मंत्र रचला तो सुद्धा मृत्यु  वर विजय मिळवू शकला नाही...तरी  असा जप वर्षानुवर्षे विश्वासाने जपुन मानव मृत्यूला    चुकविण्याचा का बर प्रयत्न करतो हेच समजत नाही????......आणि आता तर मिडीयाच जन्म-मृत्यु चा ठेकेदार झाल्या मुळे अश्या अमानवी उपचारांचे अतिस्तोम माजणे साहजिकच आहे. 
एखाद्या गंभीर आजारातून बरे होण्यासाठी. महामारीच्या प्रकोपापासून रक्षण करण्यासाठी. वात(वायू) पित्त(ताप) आणि कफ या दोषांमुळे झालेल्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी. एखाद्या दुर्घटनेमुळे किंवा आजारामुळे जीवनावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा जन्म कुंडलीतील ग्रह दोष, ग्रहांची महादशा, अंतर्दशा यांच्या अशुभ प्रभावाच्या शांतीसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा..दरिद्रता दूर करण्यासाठी, धन प्राप्तीसाठी, सुखी आयुष्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.मानसिक अशांतता आणि क्रोध यामुळे धर्म आणि अध्यात्माप्रती निर्माण झालेली कटुता नष्ट करण्यासाठी. परिवार, समाज, आणि नात्यांमधील कलह दूर करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.संपत्तीचे वाद मिटवण्यासाठी. शासकीय कामातील अडचणी दूर करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. लग्न जमण्यात येणाऱ्या अडचणी नाडी दोष किंवा इतर बाधा दूर करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. दिव्य मराठी. http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-mahamritunjay-mantra-chanting-3515952.html?seq=7 
थोडक्यात जन्मा पासून मृत्यु पर्यंतच्या सर्व प्रवासात हर बीमारी का एक ही शर्तिया  ईलाज असे या जपाचे महात्म्य आहे. शर्त एकच हा जप पवित्र शुद्ध मनाने कोणत्याही प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक पापच्या वर्तना शिवाय पूर्ण करावा. ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम्पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीय मामृतात।।  इस मंत्र को संपुटयुक्त बनाने के लिए इसका उच्चारण इस प्रकार किया जाता है  ॐ हौं जूं स: ॐ भूर्भुवः स्वः  ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम्पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीय मामृतात।। ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ  असा हा  देव भाषेतील  मंत्र  आजच्या काळात  प्रत्यक्ष देवाला सुद्धा शुद्ध  भाषेत उच्चारता येणार नाही तेथे  मृत्य  मानवाचे काय ???
आजच्या बाजारीकरणाच्या काळात या मंत्रौपचाराचे, मंत्र म्हणणारयांचे सुद्धा बाजारीकरण झाले असल्या मुळे  या  महामृत्युंजय जपाची दुरावस्था चटा वरील श्राद्ध  उरकण्या सारखी झाली आहे. या  मुळेच  मरणावर  मृत्यु  वर मानव विजय मिळवू  शकला नाही...निव्वळ मंत्र उच्चारून संकटावर मात करता येत नाही..तर संकटाना हिमंतीने सामोरे जावे लागते.... हेच खरे.

No comments: