बाळासाहेबांचे
दुखद निधन. त्यानंतर कसाब फासी या बातम्यांच्या गदारोळात एका महत्वाच्या बातमी
कडे दुर्लक्ष झाले. पंडित नेहरूंनी हिमालया पेक्षा जास्त मोठ्या चुका करून
भारताताचे प्रचंड नुकसान केले पण नेहरू अंधभक्त आज ही नेहरूंच्या या चुका
मान्य करण्यास तयार नाहीत , हे भारताचे दुर्देव .
नवी दिल्ली। दि. २0 (लोकमत न्यूज नेटवर्क)
सन १९६२च्या भारत-चीन युद्धादरम्यान भारताने हवाईदलाचा वापर का केला नाही,
हा वादाचा मुद्दा असताना या युद्धातील भारताच्या पराभवाला तत्कालीन
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जबाबदार होते, असा ठपका भारतीय हवाईदलाचे माजी
प्रमुख (एअर चीफ मार्शल) ए.वाय. टिपणीस यांनी ठेवला आहे. हवाई दलाचा वापर
केला असता तर 1962 च्या युद्धाचे परिणाम वेगळे दिसले असते, असे मत विद्यमान
हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल एन. ए. के. ब्राउन यांनी नुकतेच व्यक्त केले
आहे. त्या पार्श्वभूमीवर एअर चीफ मार्शल टिपणीस यांनी ही टीका केली आहे.
जागतिक पातळीवरचा नेता बनण्याची पंडित नेहरु यांची महत्त्वाकांक्षा होती.
यासाठी त्यांनी देशाच्या सुरक्षा हितांकडे दुर्लक्ष केले. चीन युध्दातील
भारताच्या दारुण पराभवामध्ये नेहरुंचा वाटा मोठा होता.‘युद्धाच्या पाच
दशकांनंतर भारत व चीन’ या विषयावरील एका चर्चासत्रात टिपणीस बोलत होते.
जागतिक नेता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी नेहरूंनी देशाच्या सुरक्षा
हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप टिपणीस यांनी या वेळी केला.http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-21-11-2012-7cc10&ndate=2012-11-21&editionname=mainhttp://online1.esakal.com/esakal/20121120/4639284476902441226.htmhttp://navshakti.co.in/featured/95602/
No comments:
Post a Comment