आज घर बांधणीवर आर्किटेक्ट इंजिनिअर यांच्या पेक्षा वास्तुशास्त्राचा, जोतिष्याचा दशदिशांचा खूप अतिरेक परिणाम झाला
आहे...प्लॉट घेण्या पासून ते नवराबायाकोने पलंगावर कसे झोपावे , पूजा घरात
देवाची पूजा कशी करावी दगडी मूर्तीच्या देवाचे तोंड कोणत्या दिशेला असावे,
स्वयंपाक घरात जेवण कसे तय्यार करावे..... आणि कोणत्या दिशेला तोंड करून जेवावे.... हे सुद्धा हेच कुडमुडे लोक ठरवत असतात. आता तर संडासाचे भांड सुद्धा कसे बसवायचे, कोणत्या दिशेला बसवायचे हे सुद्धा हेच वस्तूतज्ञ दिशा तज्ञ ठरवितात......पण या मुळे घरमालकाची कशी गोची होते, आपल्या सोयीसुविधा प्रमाणे घर न बांधता कोण्या मूर्ख वास्तुतज्ञा च्या
सल्ल्या प्रमाणे घर बांधल्यास काय अतिरेक दुष्परिणाम होतात, हे या व्यंग
चित्रकाराने एकदम प्रभावीपणे चित्रात दाखवले आहे.....१०० ओळीचा लेख लिहून
ही जो प्रभाव पडला नसता तो या चित्रा वरून पडला ....आता तरी जनता शहाणी
होईल ....
No comments:
Post a Comment