महागाई ........यांच्या डॉगीचे अन्न सुद्धा घेणे परवडत नाही
देशाच्या बरबादी ला देशाचे सरकार जबाबदार आहे......... उगीच
....देशाचे सरकार आणि त्याचे घटक पक्ष जबाबदार आहेत म्हणत आपण नागरीक आपली
स्वतः ची जबाबदारी टाळत असतो. दर ५ वर्षांनी आपणास सरकार बदलण्याची संधी
असते. त्यावेळी आपण काय करतो.....बाई,बाटली, पैसा, धर्म , जात, एखादे आपले
स्वतः चे गैरकानुनी काम याच्या बदल्यात मत अयोग्य व्यक्तीला देतो....तर कधी
भावनेच्या लाटेवर स्वार होवून एक गठ्ठा एकतर्फी मतदान करतो......मग अयोग्य
उमेदवार निवडून येतो.....तो मग आपल्यावर मत खरेदी करता केलेल्या पैश्याच्या
वसुली साठी भ्रष्ट्र मार्गाने संपत्ती गोळा करणे सुरु करतो......आपले
हितसंबंध जो पर्यंत जोपासले जातात तो पर्यंत आपण गप्प बसतो......आपणाला
सहावा सातवा वेतन आयोगा प्रमाणे वाढीव पगार पाहिजे महागाई भत्ता
पाहिजे........पण वस्तूंची भाववाढ झाली कि लगेच आपण जीवन जगणे अशक्य झाले
म्हणून बोंब मारणे सुरु करतो......मिडिया नामक राक्षस लगेच हातात दंडुका
घेवून या महागाईने त्रस्त न झालेल्या सुखवस्तू महिलांचे चारचाकी
गाड्यांच्या मालकांचे तेचतेच रडगाणे दाखवत बसतात. काय तर म्हणे यांच्या
डॉगीचे अन्न सुद्धा घेणे परवडत नाही हि यांची तक्रार.......तर १५-२० लाखाची
गाडी फिरवणारा ५ रुपयांनी पेट्रोल महाग झाल्याची आणि गाडी परवडत नसल्याची
तक्रार करत सरकारला दोष देणार......पण एखादे स्वतःचे गैर कानुनी काम करायचे
असेल तर याच सरकारला नौकरशाहीला हाताशी धरून बिनधास्त करणार त्या वेळी
त्याला भ्रष्ट्राचार बद्दल सरकार बद्दल, पक्षान बद्दल तक्रार असत नाही .
हे आपले स्वार्थी वागणेच मग आपल्या मुळावर येते.....असे झाले कि मग आपण याच
घटक पक्षांना दोष देत आपली कातडी वाचविण्याचा प्रयत्न करत स्वतःचीच फसवणूक
करण्यात समाधान मानतो.
No comments:
Post a Comment