FDI ची जादूची छडी आली की शेतकऱ्यांचे सर्वच प्रश्न चुटकी सरशी संपतील
अश्या मुंगेरीलाल के हसीन सपने किंवा शेख चिल्ली ख्वाब या सारखी भारतीयांची
अवस्था झाली आहे......आपल्या देशातील मुलभूत समस्यांचा भ्रष्ट्राचाराचा
विचार न करताच आपण आपले नशीब FDI च्या हातात देवून आपल्या ६५ वर्षाच्या
अकार्यक्षमतेवर कफन घालू पाहत आहोत.....रोजच्या रोज नवीन घोटाळे समोर येत
आहे..त्या करता शेठजीच्या पेपर वाचण्याची गरज नही...ते ही यात अखंड बरबटले
आहेत...त्यांचे हाथ सुद्धा काळे झाले आहेत..............
तुमच्या-आमच्या शेतात जाणारे रस्ते, खेड्यापाड्यातील रस्ते, तालुका जिल्हा
जोडणारे रस्ते या मुलभूत सोयी चा वाजलेला बोजवारा आणि या बिकट खड्यांच्या
रस्त्या मुळे शेतमालाची वाहतुकीला येणारी अडचण....... शेतीतील सिंचन
सुविधा, धनदांड्ग्यानी गरीब शेतकऱ्यांच्या शेतात येणारे पाणी अडवलेले पाणी,
पाणी पळवापळवी चे राजकारण अर्थकारण , ठिबक
सिंचनातील घोटाळे यावर बड्यांची असलेली मक्तेदारी, अर्थ शास्त्रात
वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले की वस्तूंच्या किंमती कमी होतात या
नियमाला अपवाद असणाऱ्या आकाशाला टेकणाऱ्या ठिबक सिंचनाच्या किंमती, याच्या
अनुदानातील बड्या राजकारण्यांचे वर्चस्व , फळबाग अनुदान योजनांचा होणारा
दुरुपयोग, पुन्हा या योजनांवर असलेले सत्ताधार्यांचे वर्चस्व , हंगामाच्या
काळात साधे बियाणे मिळत नाही....खता करता दरवर्षी शेतकर्याना लाठ्या
खाव्या लागतात .......या समस्या
सोडवण्याचा कधी आपण गंभीरतेने विचार केला का?? का FDI च ह्या सर्व
समस्या
सोडवणार ....आहे.....
दुसरा बँकिग हा प्रकार .....आज ही शेतकर्याना वेळेवर आणि योग्य दारात
कर्जाचा पुरवठा होत नाही,,,शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या सहकारी बँका या
पुढारी आणि धनदांड्ग्यानी अक्षरश लुटल्या आहेत.....बड्या उद्यौगाना लाखो
करोडोची माफी देणारे सरकार शेतकर्याना मात्र वाऱ्यावर सोडते... तीच
दुरवस्था सहकारी
साखर कारखाने सुत गिरण्यांची झाली आहे....या नेत्यांनी स्थापन केलेल्या
सहकारी बँका तर नेत्यांच्या नातेवाईकांचे भले करण्यातच नामशेष
झाल्यात........पैसा
शेतकऱ्यांचा, शेतमाल शेतकऱ्यांचा, सहकारच्या गोंडस नावा खाली मालक शेतकरी
आणि
फायदा या नेत्यांचा त्यांच्या नातेवाईकांचा ...........तोटा
शेतकऱ्यांचा.......तोच प्रकार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणाचा या
कृषी समितीच्या कारभारा बद्दल न बोललेलेच बरे......बाजार समेत्या ह्या
शेतकर्याना लुटण्यासाठीच निर्माण झाल्या आहेत असा संशय येतो......... हा
प्रश्न FDI सोडवणार आहे का??????
तिसरा महत्वाचा प्रश्न शहरे सोडली तर खेड्यापाड्यात शेती क्षेत्रात लागू
असलेले विजेचे भारनियमन .........शहरातील मॉल, सिनेमागृहे पंचतारांकित हॉटेल्स
वेजेचा लखलखाट असला तरी शेतीतील उभी पिके डोळ्या समोर वीज पाण्या अभावी
जळून जात असलेली पाहण्या शिवाय हतबल शेतकरी कांही करू शकत नाही......
एकीकडे शेतीची हि दुरवस्था झालेली असतानाच दुसरीकडे शेतजमिनीच्या प्रचंड
वाढलेल्या किंमती.......गेल्या ५-१० वर्षात या जमिनीला शहरातील खोऱ्याने
पैसा कमावणारे डॉक्टर वकील व्यापारी यांच्या काळ्या पैश्या चा फास विळखा
बसला आहे.....या लाखो रुपये एकर किंमतीची शेत विकत घेतली, त्यावर महागडी
बियाणे , कीटक नाशक खते वापरली तर इंद्राच्या दरबारातील संपत्तीच्या
देवाला कुबेराला ही शेती करणे नुकसानीत जाईल आणि तो भिखारी बनेल
आत्महत्त्या करेल......
हा सगळा तमाशा पाहून आपण फसवले जात आहोत लुटले जात आहोत हे शेतकर्यांना
त्यांच्या शिकलेल्या तरुण पिढीच्या लक्षात येवू लागले....हा वाढत्या
असंतोषात इंद्राय स्वाह ! तक्षाय स्वाह!
नित्तीने आपला बळी जाईल हे राज्यकर्त्यांच्या लक्षात आले हे होवू नये
म्हणून आपले अपयश लपवण्या साठी FDI चे मायाजाल फेकण्यात आले.....आणि एकदा
FDI आले की शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटतील असे शेख चिल्ली स्वप्ने
शेतकरयांना दाखविण्यास सुरुवात झाली.....आणि शेतकरी आपल्या सर्व मुलभूत
समस्या विसरून या मुंगेरीलाल च्या हसीन स्वप्नात गुंग झाला ....रोग कडे
दुर्लक्ष्य करून FDI चा उपचार करणे म्हणजे रोग पेक्षा इलाज भयंकर किंवा आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा प्रकार म्हणावा लागेल.......