http://www.youtube.com/watch?v=oYWJGdZG-wg&feature=fvwrel
रामदेव बाबा ........जेव्हढे समर्थक तेव्हढेच दुश्मन...ज्ञानेश्वर यांनी
८०० वर्षापूर्वी गीता सामान्य माणसाच्या भाषेत मराठीत लिहून क्रांती केली
अनेक कर्मठ सनातनी वर्गाचा रोष ओढवून घेतला......पण सामान्य माणसाचे हित
रक्षण केले.
तेच रामदेव बाबांच्या योगांच्या प्रसार कार्याचे
महत्व आहे......आज पर्यंत मुठभर लोकांची मक्तेदारी असलेला योगा रामदेव
बाबांनी आम आदमी करता सहज सोप्पा करून सांगितला ......जग भर लोक योगा करू
लागले ....या मुळे योगाची मक्तेदारी असलेला वर्ग बाबांवर टीका करू
लागला......योगा असा शिकत नसतात ....त्यातील गांभीर्य पावित्र्य बाबांनी
घालवले........त्यास सडक छाप बनविले.....वगैरे वगैरे......पण या टीकेचा आम
जनतेवर फारसा परिणाम झाला नाही.....आणि योगाचे वर्ग हजारो जनतेच्या
साक्षीने भरू लागलेत....ज्यांना या शिबिरात भरती होणे परवडणारे नव्हते ते
लोक .......... भल्या पहाटे उठून TV समोर बसून योगा करणे चालू
केले......याला पुरातन योग गुरुनी नाके मुरडली........पण जनता मात्र योगाचा
फायदा घेवू लागली......या पुरातन योग गुरु च्या मतां कडे जनतेने चक्क
दुर्लक्ष केले........जो योग हस्तीदंती मनोऱ्यात कैद होता विशिष्ट वर्गाची
मक्तेदारी होता तो योगा आता झोपडपट्टीत सुद्धा सर्वांगानी
फुलला........रामदेवबाबांनी एक इतिहास रचला एव्हढे मात्र त्यांच्या
टीकाकारांना मान्य करावेच लागेल.....
No comments:
Post a Comment