Translate

Saturday, August 28, 2010

या मंत्र्याचे डोके ठिकाणावर आहे का?

 भगवा दहाषदवाद आज भारतात पसरत आहे असे वक्तव्य करणाऱ्या पी .चिदंबरम  यांना, या मंत्र्याचे डोके ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल करत आज लोकमान्य  टिळक यांनी स्वतः निवडून दिलेल्या लोकशाही सरकारची हजेरी घेतली असती. पण आजच्या बाजारू वर्तमान पत्राच्या संपादकाची असे लिहिण्याची हिम्मत नाही. गडद भगवा रंग हा त्यागाचं प्रतीक म्हणून वापरला गेला आहे. पांढरा रंग प्रकाश, सत्येची वाट दर्शवण्यासाठी वापरला आहे. तर हिरवा रंग हरित झाडे व शेती दर्शवतो. याच शेतीवर कोट्यवधी हिंदुस्थानींंचे जीवन अवलंबून आहे. तसेच अशोकचक्र हे या ध्वजाखाली राहणार्‍या हिंदुस्थानींनी सत्येची कास धरावी यासाठी वापरले आहे. 

Sunday, August 22, 2010

THINK ABOUT IT !

वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून देशभरात एकच सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) होणार आहे.
ग्रामीण भारतातील  विद्यार्थ्यांना जाणून बुजून स्पर्धेतून बाद करण्या साठी INDIA च्या नोकरशाही आणि राजकारण्यांनी हि खेळी रचली आहे. . आज ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधांची बोंबाबोंब आहे. बऱ्याच खेड्यात शाळात गुरुजी नाहीत, शैक्षणिक साधने नाहीत . उलट शहरी भागात शाळांपासून खाजगी शिकवणीचे गलोगल्ली कारखाने आहेत,बालवाडी पासूनच खाजगी शिकवण्या लावल्या जातात. त्यात CBSE च्या विध्यार्थ्यांना पडणारे भरमसाठ गुण. या गुणांमुळे खुद्द महाराष्ट्रातातील नव्हे तर भारतातील नावाजलेल्या शैक्षणिक सुविधा असलेल्या मुंबई शहरातील दहावीच्या  विद्यार्थ्यांची गेल्या ३ वर्षा पासून ससेहोलपट चालू आहे. प्रत्येक वर्षी कोर्टात प्रकरण गेल्या शिवाय प्रवेश होत नाही . आज आगस्ट संपत आला तरी प्रवेश झाले नाही. हा सर्व वाईट अनुभव असूनही सर्व भारतभर एकच  सीएटी घेण्याचा अट्टाहास का? 
राज्यापुरता विचार केल्यास सामाईक परीक्षेत "एनसीईआरटी'ने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमांतून प्रश्‍न विचारले जाणार आहेत. मात्र राज्य प्रशिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात त्या मानाने मोठी तफावत आहे. त्यातून राज्यातील "सीबीएसई'चे विद्यार्थी वगळता उर्वरित विद्यार्थ्यांना किमान 20 टक्‍के गुण कमी मिळण्याची शक्‍यता आहे. तसेच हा निर्णय आता जाहीर झाला असल्याने बारावीतील विद्यार्थ्यांची मानसिकता विचलित होऊ शकते. राज्याराज्यात घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा त्या त्या राज्याच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात तर ही देशभर घेण्यात येणारी परीक्षा CBSC च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल . यामुळे ग्रामीणभागातीलच नव्हे तर सरकारी शाळातून शिकणारी , बहुसंख्य मुले यास्पधेतून बाद होतील . केवळ कांही %(टक्के) विद्यार्थ्यांना अनेक परीक्षा द्याव्या लागतात म्हणून बाकी बहूसंख्य विद्यार्थ्यांना वेठीस धरणे चूक आहे.
शहरात असलेल्या शैक्षणिक सोयी जो पर्यंत खेडे गावी पोहचत नाही तो पर्यंत अशी परीक्षा घेणेच चूक आहे. ग्रामीण शिक्षण तज्ञांनी आताच  या विरुद्ध आवाज उठवून हाय कोर्टात जनहित याचिका  दाखल करावी उशीर झाला तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. शहरात शिकणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांनी या विरुद्ध आवाज उठवावा शहरी संघटना कांही करणार नाही त्यांचा फायदा आहे कृपया आपल्या प्रतिक्रिया आवश्य कळवाव्यात ही विनंती.

Saturday, August 21, 2010

मी २०६० पर्यंत जगणारच आहे इति thanthanpal उवाच

मी २०६० पर्यंत जगणारच आहे इति thanthanpal उवाच . यात शंका घेण्या सारखे काय आहे.. बरोबर आहे , याला ओळखणारे शंका येणारच. हा ६० वर्षाचा नास्तिक माणूस भविष्याची,भविष्यकारची थट्टा उडविणारा त्यांना थोतांड म्हणणारा आज अचानक छातीठोकपणे मी अजून ५० वर्ष जगणार आहे असे भविष्य सांगतो . जगणार असेल बुवा आपल्याला काय घेणेदेणे त्याच्याशी. जेथे सेकंद नंतर आपले काय होणार याची या व्यवस्थेत खात्री नाही, पुढच्या क्षणी बॉम्बस्फोट होवून मरणार का पाक दहाषदवादी अतिरेक्यांच्या गोळीला बळी पडणार याची धास्ती असणाऱ्या आम्हा मुंबईकरना या छातीठोकपणाचे कोतूक वाटते.अखेर त्याला विचारले तुम्ही भविष्य मानत नाही, नास्तिक आहात तर अजून ६० वर्ष जगणार या भविष्यावर कसा विश्वास ठेवण्यास तुम्ही तय्यार झालात. आहो मीच नाही अजून अनेक उद्योजक, तसेच सेलिब्रेटीं, भक्त ज्यांनी लाखो रुपये मोजून आंध्र प्रदेशात तिरुमल्ला तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्‍वराच्या विशेष सेवेसाठी 2060 पर्यंत आगाऊ नोंदणी केली आहे. ते सर्व भक्त तोपर्यंत जिवंत राहणारच आहे.आम्ही पूजा केल्या शिवाय मरणारच नाही हा गाढा विश्वास असल्याशिवाय का भक्तांनी एव्हढे ५० वर्षा पुढचे दर्शनाची आगावू नोंदणी केली का? आज वर्तमान पत्रातील बातम्या तुम्ही वाचल्या नाही का असे विचारात त्यांनी पेपर्स चा गठ्ठा आमच्या पुढे टाकला. ज्यात देवाच्या दर्शनाचे पुढील ५० वर्षाचे अगाऊ नोंदणीची बातमी होती. हैदराबाद - आंध्र प्रदेशात तिरुमल्ला तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्‍वराच्या सेवा तिकिटांची कोट्यवधी रुपयांना विक्री करण्यात आल्याचे समोर आले आहे. अनेक उद्योजक, तसेच सेलिब्रेटींनी लाखो रुपये मोजून व्यंकटेश्‍वराच्या विशेष सेवेसाठी 2060 पर्यंत आगाऊ नोंदणी केली आहे. यातून देवस्थानच्या काही सदस्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे मिळाले आहेत. भाविकांसाठीच्या तिकीट विक्रीतील गैरव्यवहार आणि भगवान वेंकटेश्वराला वाहिलेले प्राचीन दागिने गायब झाल्यामुळे तिरुमलाचे जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी देवस्थान नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. जगातील श्रीमंत देवस्थानांमध्ये गणना होणाऱ्या तिरुपती मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टकडे आहे. मंदिरातील तिकीट विक्रीत झालेल्या गैरव्यवहारानंतरही आंध्र प्रदेश सरकारने याविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. देवस्थानच्या दानपेटीत भाविकांनी अर्पण केलेल्या प्राचीन दागिन्यांचे सेट काही दिवसांपासून बेपत्ता आहेत.
मी ठणठणपाळ यांना छेडले आहो ही तर देव आणि भक्ता मधील दलालांच्या भ्रष्ट्राचाराची बातमी आहे. आणि तुम्ही तंर एकदिवस आड भ्रष्ट्राचारा विरुद्ध लिहून जाल वरील ब्लोगेर्स हा परेशान करत असतात. मग ह्या भ्रष्ट व्यवहारात आपण कसे सामील झालात असे विचारले. असता ठणठणपाळ आपल्या भल्या मोठ्या मिशी आड जोरात हसत म्हणाले, ही किमया माझ्या जाल वरील मित्रांनी केली आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा आधार घेत खासदारांनी व्यक्तिगतस्वैराचार करणे हा फार कांही गुन्हा नाही . याच हिशोबाने घोडेबाजार न करणे, आयाराम-गयारामला परवानगी नाकारणे हा लोकशाहीचा खुन आहे, तीचा गळा दाबणे असा प्रकार आहे ,वगेरे वगेरे .इति लोकशाही पुरण संपवून ठणठणपाळ पुढे बोलू लागणार तोच त्यांना मध्येच अडवून मी म्हणालो आहो त्या दलालांनी देवाला भक्तांनी दान दिलेले दागिने विकून भक्तांच्या भावनेला ठेस पोहंचविली आहे. तिकिटाचा काळाबाजार केला. आहो तो देवाचा दलाल आहे. जो तळे राखील तो पाणी पियीलच या न्यायाने मी या भ्रष्ट्राचारा कडे दुर्लक्ष करण्याचे ठरविले आहे. असे दुर्लक्ष केले की आपणास मानसिक त्रास होत नाही. आणि हो आपल्या लाडक्याला इंग्रजी शाळेत घालण्या साठी आपण DONATION देतोच की , ती देणगी आपण आणि शाळा सरकारला दाखवतो का? इथूनच आपण आपल्या मुलाला भ्रष्ट्राचाराचे बाळकडू पाजवत असतो, यामुळे पुढच्या पिढीला आमच्या सारखा मानसिक त्रास होणार नाही. तुम्ही ही खा! आम्हाला ही खावू द्या !! असे ठणठणपाळ यांनी आपल्या मिश्या आड हसत सांगितले.
ठणठणपाळ असे हसत बोलत असले तरी ह्या माणसाने कांही तिरुमल्ला तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्‍वराच्या सेवा तिकिटांची खरेदी केली नसल्याची माझी पक्की खात्री नव्हे विश्वास आहे. तुम्ही
तिकीट खरेदी खरेदी करून २०६० पर्यंत जिवंत राहण्याची तरतूद केली का?

Thursday, August 19, 2010

यांचा पगार वाढवा .पण जेंव्हा अधिकार येतात तेंव्हा कर्तव्य ही पर पाडावे लागतात ,

यांचा पगार वाढवा .पण जेंव्हा अधिकार येतात तेंव्हा कर्तव्य ही पर पाडावे लागतात ,


आज संसदेत खासदार यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.संसदेत एका महत्वाची चर्चा होती. मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती याचा अर्थ जनतेच्या फार मोठ्या समस्येवर, महागाईवर चर्चा असेल या करता हे सर्व जण हजर असतील असे समजून आपण खुश होताल पण थांबा हर्ष वायू होवू देवू नका. हे सर्व जण जनते साठी नाही तर स्वतः च्या पगारवाढी साठी विधयक मंजूर करून घेण्या साठी आले होते. पण कॉमनवेल्थ घोटाळा, महागाई वरून जनतेचा असंतोष या बाबी लक्षात घेवून कॉंग्रेस चे चाणक्य प्रणब मुखर्जी यांनी हा प्रश्न थंड बस्त्यात टाकला. पण एक आश्वासन दिले. हा पगार जुन्या तारखे पासून दिले जातील .  
इंग्लंड मध्ये खासदारा पगार जास्त आहेत हे सांगतानाच तेथे घर,व इतर सुविधा मिळत नाही हे दुर्लक्ष केले जाते. नोकरशाही पेक्षा कमी पगार मिळतो म्हणून हे रडतात . ठीक आहे यांचा पगार वाढवा .पण जेंव्हा अधिकार येतात तेंव्हा कर्तव्य ही पर पाडावे लागतात , ती कायद्याने बंधनकारक करा

Sunday, August 15, 2010

मी तर १५ ऑगस्ट काळी फीत बांधून साजरा करायच्या विचारात आहे,

आज सकाळ मध्ये आता बस्सं...freedom हवंच :) या बद्दल वाचकांना कुठल्या गोष्टींपासून तुम्हाला हवेय 'स्वातंत्र्य'? असा विचार करावयास लावणारा प्रश्न विचारला. हे वाचून वाचकांच्या असंख्य प्रतिक्रिया आल्या .त्या वाचावयास पाहिजेत. visit http://72.78.249.107/esakal/
20100812/4729459394379485399.
htm . त्यातील ९०% च्या वर वाचकांनी भ्रष्ट्राचार,आणि भ्रष्ट्र राजकारणी नेत्या पासून देशाला स्वातंत्र्य हवे असे स्पष्ट सांगितले आहे. मी तर १५ ऑगस्ट काळी फीत बांधून साजरा करायच्या विचारात आहे, मला आता भारतापासूनच स्वतंत्र हवे आहे. महाराष्ट्राचा एक वेगळा देश तयार करा, आणि आम्हाला गांधी घराणे, उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर घाणी पासून स्वातंत्र्य द्या. ,"लाज वाटते मी भारतीय असल्याची!!!" , मला वाटत कि नक्षलवादी हे चांगले आहेत मग त्यांच्याच हातात सत्ता द्या ह्या राजकारणी लोकांपासून तरी सुटका होईल.त्याला हाच एक पर्याय आहे. इंग्रज बरे होते असे वाटते... येथे पर्यंत सामान्य जनतेच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. ह्या उद्रेकाचे रुपांतर क्रांतीत कधी होवू शकते हे सांगण्या साठी कोण्या ज्योतिष्याची गरज नाही. फक्त एक ठिणगी पडण्याचा अवकाश आहे.
चला, तर मग करू या सुरूवात 'स्वातंत्र्या'साठी !

Friday, August 13, 2010

संसद सुद्धा मेरा देश महान म्हणत लिलावाने विक्री केल्या जाईल जय हो जय हो .


 भारतीय जनता मुळातच उत्सव प्रिय आहे. भारतात प्रत्येक दिवशी कोणता ना कोणता हिंदू,मुस्लीम,बोद्ध,जैन धार्मिक उत्सव साजरे होत असतात.हे कमी की काय म्हणून गावोगावच्या यात्रा,उरूस, स्थानिक पातळीवर साजरा होत असतात .हे लक्षात घेवून शासनाने जिल्हाधिकारयाना  हे उत्सव जनतेला साजरे करता यावेत म्हणून वर्षभरात तीन स्थानिक सुट्या देण्याचा अधिकार दिला आहे. वेळ प्रसंगी कर्ज काढून हे सण उत्सव साजरे केले जातात.
  

Monday, August 9, 2010

भ्रष्ट्राचाराचा देशभावनेशी संबंध जोडणे योग्य आहे का?

राष्ट्रकुल खेळा च्या भ्रष्ट्राचारा ची धुणी धुवत देशाच्या इज्जतीची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली जात असताना, इतके दीवस ७ वर्ष खेळाची तय्यारी होत असताना आपला कांही संबंध नाही अश्या तोऱ्यात गप्प बसणाऱ्या सरकारला आता वाईट परीस्थीतिची जाणीव झाली. प्रकरण आपल्या अंगावर शेकणार आहे हे लक्षात आल्यावर तडकाफडकी संयोजन समितीच्या ४ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. आता मोठे शार्क मासे वाचवण्याची damage control An effort to minimize or curtail damage or loss. मोहीम जनतेच्या देशभावनेस आवाहन करत सुरु झाली आहे. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा आणि याकरता पहेली जाहिरात सहारा उद्योग या बदनाम उद्योग समूहास हाताशी धरून सरकारनेच सुरु केली हे लहान मुलगा ही सांगील.

बारात घर के द्वार पर आयी है, पहले बारातीयोका का स्वागत करो , शादी धूमधाम से हो जाने दो , फिर आपकी जो भी शिकायत है घरके अंदर बेठ कर सुल्झायेगे अब देश के इज्जत का सवाल है अशी भाषा करत आपल्या पापा वर पांघरून घालण्याचा प्रयत्न जोमदारपणे केला जात आहे पण यावेळी दुलहन के घर वालोका चारित्र्य या बाबत मात्र सोयीस्कर रीत्या दुर्लक्ष करा म्हणून सूचित केले जात आहे. याच वेळी १९८२ च्या asiad game 1982. च्या खर्चाचा हिशोब आज १९१० मध्ये २८ वर्षानंतरही पूर्ण झाला नाही अशी धक्कादायक माहिती खुद्द सरकारी प्रव्रक्त्यानेच सांगितली आणि ये तो होता ही राहता अशी बेजबाबदार विधाने ही केली.
देशभावना आणि भ्रष्ट्राचाराची सांगड घालून भारतीय जनतेला मूर्ख बनवता येते हे या मतलबी नेत्यांना चांगलेच अवगत झाले आहे. याचे उत्तम उदाहरण IPL चे भ्रष्ट्र आयोजन . आणि जेंव्हा हा भ्रष्ट्र क्रिकेटचा भोपळा फुटला तेंव्हा ललित मोदींचा बळी देवून आपले राजकारणी नेते सही सलामत सुटले नाही तोच हा नवा घोटाळा उजेडात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या दृष्टी ने समाधानाची बाब म्हणजे सोनिया कॉंग्रेस यात अडकली आहे. यामुळे राष्ट्रवादी नेते गालातल्या गालात हसत ख़ुशी जाहीर करत आहे. आपला नवरा मेला तरी हरकत नाही सवत रंडकी झाली या प्रकारे हे वागणे आहे.देशाच्या बदनामीचे सोयरे सुतक कोणाला नाही.
परकीय देशात अश्या स्पर्धा आयोजित करताना खेळ खेळाडू यांना मध्यभागी ठेवून स्पर्धेचे आयोजन केले जाते, खेळ खेळाडूंच्या विकासास सर्वोच्च प्राधान्य देवून ५-७ वर्ष आधी संभाव्य खेळाडूंची निवड करून अत्यंत कठोर सराव सुरु केला जातो. जात,प्रांत,धर्म राजकारण दूर ठेवत हे प्रशिक्षण कोणतीही दयामाया न दाखवता सुरु होते. स्पर्धा सुरु होण्याच्या ८-९ महिने सर्व क्रीडांगणे तय्यार होवून देशातील स्पर्धकांना तेथे सराव करून घेतल्या जातो . तेंव्हा कोठे पदकांची लयलूट यजमान देशाचे खेळाडू करतात. आणि आपण स्पर्धा महिन्यावर आल्या तरी अजून खेळाडूंची संभाव्य यादी सुद्धा जाहीर करू शकत नाही. क्रीडांगणे धड पणे बांधू शकत नाही. तरी पण अर्धा प्याला भरलेला आहे हे पहा म्हणत जनतेलाच शहाणपणा शिकवला जात आहे , आणि भ्रष्ट्राचारावर पांघरून घातल्या जात आहे.
काल-परवा भारताच्या अर्थमंत्र्यांनी भारतीय संसदेत इमानदारीपणाच्या,प्रामाणिकपणाच्या चिंधड्या उडवत बँकांचे हजारो करोडो रुपये बुडवून देशाच्या प्रगतीच्या गप्पा मारणाऱ्या मोठ्या उद्योजकांची नावे जाहीर करण्यास नकार दिला. यावरूनच भ्रष्ट्राचार किती खोलवर रुजला आहे याची कल्पना येते. जेंव्हा सामान्य माणूस अडचणीत येतो आणि बँकाचे पैसे भरण्यास वेळ मागतो तेंव्हा मात्र हेच सरकार , बँका त्या माणसास रस्त्यावर आणण्याची भाषा करत त्यास आत्महत्त्या करण्यास मजबूर करतात. DRT च्या माध्यमातून अश्या कर्जदाराच्या करोडोच्या मालमत्ता केवळ १०-१२ लाखात विकून परत त्यास परेशान करत बसतात, या मालमत्ता विक्रीत प्रचंड भ्रष्ट्राचार होतो बँका पासून सर्व जण यात सामील असतात.पण सरकार या कडे सोयीस्कर दुर्लक्ष करते. ह्याच मालमत्ता विकत घेणारे त्या मालमत्ता ७०-८० लाखाला विकून मालामाल होतात. याच मालमत्ता प्रामाणिकपणे विक्री केल्या तर कर्ज संपूर्ण फिटून , कर्जदारास लाखो रक्कम मिळेल पण लक्षात कोण घेतो. लहान कर्जदाराची ,शेतकऱ्यांची नावे वर्तमान पेपरात जाहीर करून तयान आत्म्हत्त्यास प्रवृत करणारे सरकार, संसदेत मात्र निर्लज्जपणे मोठ्या उद्योगपतींनी किती कर्ज बुडवले आणि त्यांची नावे सांगण्यास निर्लज्जपणे नकार दिला. ह्या बुडवलेल्या पैशाचा कांही % वाटा नक्कीच यांना मिळत असणार या मुळे नावे जाहीर करत नाही एकीकडे माहिती अधिकाराच्या गप्पा मारावायाच्या आणि दुसरीकडे संसदेतच भ्रष्ट्राचारी , बँक पैसा बुडवणाऱ्या उद्योगपतींना पाठीशी घालावयाचे हे फक्त भ्रष्ट्र इंडिया राजकारणीच करू शकतात. अ‍ॅनिमल फार्म (मला कळलेले) प्रेषक लॉजिकल यांच्या लेखात म्हंटल्या प्रमाणे .....
"all animal ara equal but some are more qual than others" . आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने आणि भाषणांनी सर्व सामान्य प्राण्यांच्या मनावर हा नियम कोरला जातो. मग त्यांच्या कष्टावर हे मोजके प्राणी गब्बर होतात आणि बाहेरच्या जगाला 'आम्ही किती प्रगती केलीय' याचा देखावा निर्माण करतात. हा सर्व सुखाचा देखावा तयार झाला म्हणजे "ऑल इज वेल अ‍ॅण्ड वी लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर" याचाच अर्थ परीकथा संपली.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Friday, August 6, 2010

एक राष्ट्रकुल स्पर्धा १२ भानगडी

              एक राष्ट्रकुल स्पर्धा १२ भानगडी
एक गाव बारा भानगडी ह्या ग्रामीण राजकारणावर आधारित मराठी सिनेमाची अखिल भारतीय आवृत्ती "एक भारतीय राष्ट्रकुल स्पर्धा आणि १२00 भानगडी" या नावाने जोरदार सांग्रसंगीत रीत्या जागतिक पातळीवर भारताच्या इभ्रतीची लक्तरे मांडत चालू आहे. कोण जास्तीत जास्त देशाची बदनामी करतो याची जणू स्पर्धा लागली आहे अश्या थाटात या स्पर्धेची सुरुवात स्पर्धा अधिकृत रीत्या सुरु व्हायच्या ७५ दीवस aadhich TVमिडिया, वर्तमान पत्रे, भारतीय

Thursday, August 5, 2010

नेहरूंच्या हिमालय एव्हड्या महाकाय चुकी मुळे

किंवा रोग्यास वाचवायचे असेल तर विषबाधे मुळे सडलेला निकामी झालेला भाग दयामाया न दाखवता सरळ शस्त्रक्रिया करून कापून टाकणे 

नेहरूंच्या हिमालय एव्हड्या महाकाय चुकी मुळे भारताच्या जन्मा पासून देशाला रक्तबंबाळ करणारी जखम आता गंग्रीन प्रमाणे भारताच्या शरीरात पसरली आहे. आणि मतांच्या राजकारण्याच्या मिठास ,गोड वाणीने, षंढ वृतीने यात भर पडून गोड वागण्याचे विष वेगाने पसरत असल्या मुळे भारताचा हा काश्मीर भाग कधीही दुरुस्त होणार नाही अश्या बिमारीच्या शेवटच्या टोकाला पोहंचला आहे. अश्या अंतिम अवस्थेत दोनच उपाय राहतात . एक वेगाने शरीरात विष पसरवणारा रोग शरीरात पसरू देवून रोग्यास मृत्युच्या दाढेत ढकलणे, किंवा रोग्यास वाचवायचे असेल तर विषबाधे मुळे सडलेला निकामी झालेला भाग दयामाया न दाखवता सरळ शस्त्रक्रिया करून कापून टाकणे. या मुळे रोगी मात्र वाचेल हे नक्की. आणि ही अवघड शस्त्रक्रिया करणार शल्यचिकित्सक मात्र तेव्हढी जोखीम पत्करणारा दयामाया न दाखवारा पाहिजे. मुन्ना भाई मधील डीन डॉक्टर अस्थाना सारखा मै बिमार पर कभी प्यार नाही करता म्हणणारा .