Translate

Tuesday, June 29, 2010

अभियान्त्रिक आणि हो मेडिकल अभ्यासक्रम सुद्धा तमिळ भाषेत सुरु केला ,

आजच्या लोकमत आणि लोकसत्ता मध्ये तामिळनाडू संबंधी दोन  बातम्या आल्या आहेत बातम्या जरी दोन असल्यातरी त्यांच्या मातृभाषे संबंधी हे राज्य , तेथील जनता साहित्यिक, विचारवंत आणि हो नेते देखील किती स्वाभिमानी ,जागृत आहेत  हे दिसून येते. केवळ भाषे च्या  नावाने राजकारण करत स्वतः च्या तुंबड्या भरत,  कोटुंबिक भांडणाची राज्याच्या वेशीवर लक्तरे धुवत न  बसता, अभियान्त्रिक आणि हो मेडिकल अभ्यासक्रम  सुद्धा तमिळ भाषेत सुरु केला , नुसताच अभ्यासक्रम सुरु केला नाही तर या साठी आवश्यक असणारी ग्रंथ संपदा सुद्धा तेथील विद्यापीठांनी तय्यार करून प्रकाशित केली आहे.  हिंदीच्या  नावाने देश की  एकात्मिका की एकमात्र भाषा हिंदी ही है असे धेडगुजरी हिंदीत  ढोल पिटणाऱ्या   भारत  सरकारला सुद्धा गेल्या ६० वर्षात हिंदी भाषेत हे अभ्यासक्रम सुरु करण्याची हिम्मत झाली नाही , व्यवस्था करता आली नाही.  हे देशाचे दुर्देव आहे.
महाराष्ट्रात  मराठीचे नुसते  नाव जरी काढले  तरी डोळे  वाटरनारे केंद्रीय सरकार , बिमारू राज्याचे भ्रष्ट्र  राजकारणी, उटपटांग बातम्या देणारा, वटवट करणारा  मिडिया, विचारवंत,साहित्यिक   लगेच   देशाचे तुकडे होतील म्हणून बोमबाबोम सुरु करतात आणि महाराष्ट्रीय नेते शेपूट घालून पुरणपोळी किंवा इतर उत्सव साजरे करण्यात मश्गुल होतात. आंदोलने अर्ध्यावर सोडून आम्हीच कसे हुशार म्हणत भाषणबाजी सुरु करतात. गेल्या साठ वर्षातील साहित्यिकांनी मराठी भाषे करता फक्त भाषण बाजी करत सरकारच्या फेकलेल्या अनुदान, शिष्यवृत्ती,परदेशी अकेडमीत भरती होत मराठीला अपमानित करण्याचेच काम केले . नेत्यांनी गळ्यात हात टाकताच हे त्यांचे भाट झाले . या नेत्यांनी तमिळ नेत्यांची शिकवणी स्वभाषेचा मान कसा राखावा या साठी आवश्य लावावी. उगीच नाही, केंद्र आणि हिंदीचे मुजोर नेते दक्षिणे समोर  शेपूट हलवत गप्प बसून राहतात. तमिळ भाषेत शिक्षण दिल्या मुळे शैक्षणिक दर्जा खालावेल , देशाचे तुकडे होतील म्हणून बोंबा मारण्याची यांची हिम्मत झाली नाही. आणि मिडिया  भुंकायचे सोडून पेकटात लाथ बसलेल्या कुत्र्यावाणी कोपऱ्यात गप्प पडून राहिला.
तामिळनाडू जे केले ते १००% बरोबर केले.याचा चांगला परिणाम स्थानिक पातळीवरील जनतेला होईल
आपल्या मातृ भाषेत डॉक्टर शिकल्या मुळे सामान्य जनतेशी  रुग्णांशी  आजार पणा बद्दल  तो त्यांच्याच भाषेत संवाद साधू शकेल रुग्णानाही डॉक्टर काय उपचार करत आहे हे समजेल.  संपूर्ण युरोपातील देश, चीन जपान  स्वतःच्या मातृ भाषेत ( इंग्रजी नव्हे ) व्यवहार करतात भाषा अभिमान बाळगतात पण आपण अजून इंग्रजाची गुलामगिरी सोडत नाही.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

1 comment:

Anonymous said...

On 6/30/2010 4:34 PM स्पष्टवक्ता. said:
स्पष्टवक्ता. ठनठनपालच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. महारष्ट्रातील कॉंग्रेस नेते गेली ५० वर्षे दिल्लीपुढे नुसती वाकत नाही तर त्यांचे पायसुद्धा धुतात म्हणूनच ते माय मराठीचे धोरण ठरवण्याच्या समित्या काढतात आणि स्वताचे कधीही नसलेले कर्तुत्व दिल्लीला दाखवतात. अशोकराव पुढच्या खेपेला दिल्लीत कॅबिनेट घेणार