पाणी !! पाणी!! पाणी !! खेड्या पासून भारताची राजधानी दिल्ही पर्यंत सामान्य माणसाचा एकच आक्रोश पाणी द्या! पण जगातील महासत्तेची मुंगेरीलाल स्वप्ने पाहणाऱ्या भारतीय राजकारण्यांच्या कानात हा आवाज पोहचत नाही. अन्न-पाणी, वस्त्र, निवारा,वीज रस्ते या प्राथमिक आवश्यक गरजा गेल्या साठ वर्षात पूर्ण न करता राज्यकर्ते जनतेला रोज नवनवीन स्वप्ने दाखवण्यात दंग आहेत. ही स्वप्ने ही लहानसहान असत नाही.कधी कोकणचा कॅलिफोर्निया , कधी मुंबईचे सिंगापूर,तर कधी शांघाय , होगंकोंग तर कधी जगाची आर्थिक आण्विक महासत्ता, आणि या महासत्तेची राजधानी मुंबई. झोपडपट्टी,गरिबी मुक्त , गगनचुंबी इमारती मोल्ल्स , भव्य शॉपिंग सेंटर मल्टी फ्लेक्स सिनेमा असलेली आनंदी आनद गडे इकडे तिकडे चोही कडे अशी नगरी. http://www.ndtv.com/news/ videos/video_player.php?id= 145226
या मुळे आजच्या भयानक वास्तवा कडे डोळाझाक करणे सोप्पे जाते. प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असणारी नवी दृष्टी व विचार कोणत्या राजकीय पक्षाकडे आहे? आणि असला तरी तो अमलात आणण्यासाठी हितसंबंध कठोरपणे मोडून पारदर्शी, प्रामाणिक व कार्यक्षम कारभार करण्याची कोणत्या राजकीय पक्षाची तयारी आहे? आजच्या घडीचे सर्वांत महत्त्वाचे प्रश्न कोणते? शेती क्षेत्राची दुरवस्था, पाण्याची टंचाई, दुष्काळाचं सावट, वाढती महागाई अशी यादी अगदी सहज करता येऊ शकते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही चालूच आहेत. पाण्याची टंचाई तर राज्याच्या पाचवीलाच पुजलेली आहे. आजही महाराष्ट्रातील शेकडो गावं टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत आणि अनेक छोट्या शहरांना आठवड्यातून एकदा पाणी मिळतं. पावसानं ओढ दिली, तर लोकांच्या तोंडचं पाणी पळतं. दुष्काळाचं सावट, ही तर आता नित्याचीच बाब बनली आहे. दर दोन-तीन वर्षांनंतर राज्यातील काही जिल्हे अवर्षणग्रस्त बनत असतात. महागाईला तर काही मर्यादाच उरलेली नाही. देशाचे असे हाल झालेले आहेत.
जमुना सुखी, नर्मदा सुखी, सुखी सुवर्णरेखा, गंगा बनी गन्दी नाली, कृष्णा काली रेखा,
तुम पियोगे पेप्सी कोला, बिस्लरी का पानी, हम कैसे अपना प्यास बुझाए, पीकर कचरा पानी? ॥
मंत्री बने ... वर्दी के दलाल हम से जमीन छीनी, उनको बचाने लेकर आए साथ मे ...
अफसर बने है राजाजी के दार बने धनी, गाँव हमारे बन गई है उनकी कोलोनी ॥
दिल्ली मधील पाणी संकटावर NDTV च्या रवीश कुमार यांनी एक रिपोर्ट तय्यार केला तो फक्त दिल्ली चा नसून संपूर्ण भारताला लागू होतो. दिल्ली,मुंबई, खानापूर, झरी, बेळगाव, कोल्हापूर सावंतवाडी सर्व भारतभर हाच पाण्याचा नव्हे तर विचाराचा,कामाचा दुष्काळ आहे हे जाणवते. आपण आवश्य हा VIDEO पाहणे तुम पियोगे पेप्सी कोला, बिस्लरी का पानी, हम कैसे अपना प्यास बुझाए, पीकर कचरा पानी? ॥
मंत्री बने ... वर्दी के दलाल हम से जमीन छीनी, उनको बचाने लेकर आए साथ मे ...
अफसर बने है राजाजी के दार बने धनी, गाँव हमारे बन गई है उनकी कोलोनी ॥
http://content.indiainfoline.
http://www.ndtv.com/news/
रवीश की रिपोर्ट : दिल्ली में जल संकट
दिल्ली पानी की समस्या विकराल रूप धारण करती जा रही है।
यहां अधिकांश हिस्से पानी की समस्या से जूझ रहे हैं।
इसके लिए कौन जिम्मेदार है?
--
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.
No comments:
Post a Comment