भारतातील घरगुती डॉक्टर ही कल्पना पाशिमात्यांचे अंधानुकरून करून आपण बरखास्त करण्याच्या प्रयत्नात असताना ऑगस्टा मधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल मधे गेली ६३ वर्ष काम करणारे पपा डॉक यांच्या संबंधी माहितीचा हा मेल आला. आपणास पाठवत आहे.
खरच माझ्या लहानपणी आमचे डॉक्टर हे नुसते डॉक्टर नव्हते तर आमच्या घरचे एक नातेवाईक च होते. घरातील प्रत्येक निर्णय हे डॉक्टरांच्या संमतीनेच घेतले जात होते.
खरच माझ्या लहानपणी आमचे डॉक्टर हे नुसते डॉक्टर नव्हते तर आमच्या घरचे एक नातेवाईक च होते. घरातील प्रत्येक निर्णय हे डॉक्टरांच्या संमतीनेच घेतले जात होते.
मग घरातील विवाह असो किंवा आर्थिक निर्णय असो डॉक्टर म्हणतील तेच जवळपास ठरत होते. नुसती जीभ आ करून दाखवली तर डॉक्टर डोक्यावर टपली मारून पळ कांही झाले नाही म्हणत कागदाच्या लहान पुडीत २ गोळ्या बांधून देत होते .आणि आश्यर्याची बाब दोन- चार घंट्यात धिगाना करण्यास मोकळे होत असू. फीस देण्यास गेलो तर लग्नात लाडू खाण्यास येतो म्हणत. एव्हडेच नव्हे तर घरच्यां स्त्रियांची बाळंतपणे ( जि आज सिझेरियन शिवाय होत नाहीत ) ती कधी होत असत हे समजत सुद्धा नसे.डॉक्टरांच्या हातात बळेबळे १०० रुपये कोंबून द्यावे लागे. डॉक्टर आणि देव हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे समजल्या जात असे. आणि आता दैत्य आणि डॉक्टर एकच नाण्याच्या बाजू समजल्या जातात.
यात डॉक्टरांना दोष देण्याचा उद्देश नाही तर हा दोष आजच्या समाजव्यवस्थेचा जास्त आहे. पळा पळा कोण पुढे तो या प्रवृतीचा आहे. त्याच बरोबर नर्सरी पासून ते M S M D पर्यंत चा अवाढव्य होणारा खर्च. आणि त्या नंतर दवाखाना टाकण्या साठी लागणारा खर्च पाहूनच डोळे पांढरे होतात. यामुळे डॉक्टर यांनीही अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. यातच वैद्यकीय व्यवसाय हा डॉक्टरांच्या हातात ना राहता औषध उत्पादक कंपनी, विविध तपासण्या करणाऱ्या लब्ज आणि विमा कंपन्यांच्या हातात गेल्या मुळे ते सुद्धा मनात नसताना या चक्रात अडकले आहेत. कालाय: तस्मे नम! म्हणून दुर्लक्ष करावे . हेच आपल्या हातात आहे.

chandrashekhara | जून 1, 2010 at 1:38 pm | Tags: augusta, अमेरिका, ऑगस्टा, जॉर्जिया, डॉ. वॉल्टर वॉटसमम, युनिव्हर्सिटी हॉस्पिटल, शताब्दी, centurian, Dr. Walter Watson, Georgia state, University hospital, USA | Categories: People व्यक्ती | URL: http://wp.me/ppIjE-ly |
(माझ्या ब्लॉगचे एक नियमित वाचक व माझे मित्र श्री. सहज यांनी मला या ब्लॉगपोस्टचा दुवा पाठवला आहे. त्याबद्दल प्रथम त्यांचे आभार. )
या वर्षीच्या 25 फेब्रुवारीला, पपा डॉक किंवा डॉक्टर वॉल्टर वॉटसन यांनी वयाची शताब्दी पूर्ण केली. म्हणजे हा दिवस काही फार निराळ्या पद्धतीने पपा डॉक यांनी घालवला असे मुळीच नाही. नेहमी प्रमाणेच ते सकाळी पावणे सात वाजता उठले, त्यांनी न्याहरी केली व साडे आठ वाजता ते रोजच्या प्रमाणे हॉस्पिटल मधल्या आपल्या कामावर हजर झाले.
विश्वास नाही ना बसत? पण ही सत्य परिस्थिती आहे की हा शतक वीर डॉक्टर अजुनही रोज आपल्या हॉस्पिटलमधे जातो आणि पेशंट्सना सल्ला देतो. अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातल्या ऑगस्टा येथील युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधल्या स्त्रियांच्या विभागात, पपा डॉक गेली 63 वर्षे प्रसूतितज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ते आज पृथ्वीतलावरचे सर्वात वयोवृद्ध प्रसूतितज्ञ आहेत. या 63 वर्षात पपा डॉक यांनी 18000 बालकांची डिलिव्हरी केली आहे.
पपा डॉक यांच्या पेशंट्सची यादी बघितली तर खूप गंमतीदार वैशिष्ट्ये बघायला मिळतात. पपा डॉक यांचे नातू शोभतील अशा वयाचे असलेले, त्यांचे सध्याचे सहकारी डॉक्टर, मायकेल मॅकडॉनो, यांची डिलिव्हरी पपा डॉक यांनीच केली आहे. ते पपा डॉक यांच्याबदल गौरवोद्गार काढताना म्हणतात की पपा डॉक यांचे कामाचे एथिक्स इतके परिपूर्ण आहे की त्यापेक्षा काही जास्त चांगले असूच शकत नाही. 77 वर्षाच्या व याच हॉस्पिटलमधून कार्याधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या मिसेस सॅब्रा ऍलन या महिला, पपा डॉक यांच्या गेली 59 वर्षे पेशंट आहेत. त्यांची 5 मुले आणि 12 नातवंडे या सर्वांची डिलिव्हरी पपा डॉक यांनीच केली आहे. त्या म्हणतात की पपा डॉक सारखा दुसरा डॉक्टर जगात मिळणारच नाही. ते सर्वोत्तम डॉक्टर आहेत.
पपा डॉक हे दुसर्या महायुद्धाच्या अखेरीस डॉक्टर बनले. त्यानंतर 1947 पर्यंत त्यांनी कोरिया देशात काम केले होते. तेंव्हापासून आजपर्यंत पपा डॉक यांनी ऑगस्टा मधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल मधेच काम केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, या हॉस्पिटलच्या स्त्री विभागाला, डॉक्टर वॉल्टर वॉटसन यांचे नांव दिलेले आहे व या विभागाच्या प्रवेशद्वारापाशी एका नवजात अर्भकाला हातात घेतलेला पपा डॉक यांचा पूर्णाकृती ब्रॉन्झचा पुतळा उभारलेला आहे.
वयाची शताब्दी पूर्ण झाल्यावर पपा डॉकना कोणीतरी निवृत्त कधी होणार? म्हणून विचारले. पण आपला तसा काहीच विचार नसल्याचे त्यांनी लगेच सांगितले. दृष्टी अधू झाल्यावर त्यांनी प्रत्यक्ष डिलिव्हरी करण्याचे बंद केले असले तरी सल्ला देण्याचे काम ते करतच राहणार आहेत. आज पपा डॉक यांना थोडा सांधेदुखीचा त्रास आहे व त्यांची दृष्टी व श्रवणशक्तीही अधू झालेली आहे. परंतु आपली ही कमजोरी आपल्या कामाच्या आड ते कधीच येऊ देत नाहीत. ते म्हणतात की " मला वैद्यकीय शास्त्र अतिशय प्रिय आहे व माझ्या या कामामुळे माझा लोकांशी जो संबंध येतो त्यामुळे मला काम करत रहावेसे वाटते. मी काम बंद केले तर सकाळी अंथरुणातून उठायला मला काही प्रयोजनच उरणार नाही."
63 वर्षे नवजात अर्भकांच्या जन्माचे साक्षीदार असलेले पपा डॉक आजही म्हणतात की " अर्भकाच्या जन्मासारखी दुसरी कोणतीही आश्चर्यजनक गोष्ट या जगात नाही. जीवनाचा हा चमत्कार बघून मी आजही तितकाच आश्चर्यचकित होतो.” पपा डॉकना खेद फक्त एवढाच होतो की आता त्यांना फक्त ज्या केसेसमधे कॉम्लिकेशन्स झाली होती अशाच केसेस चांगल्या आठवतात. बाकी सर्व केसेस आता स्पष्ट आठवत नाहीत.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal. blogspot.com
भारतातील घरगुती डॉक्टर ही कल्पना पाशिमात्यांचे अंधानुकरून करून आपण बरखास्त करण्याच्या प्रयत्नात असताना ऑगस्टा मधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल मधे गेली ६३ वर्ष काम करणारे पपा डॉक यांच्या संबंधी माहितीचा हा मेल आला. आपणास पाठवत आहे.Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.
खरच माझ्या लहानपणी आमचे डॉक्टर हे नुसते डॉक्टर नव्हते तर आमच्या घरचे एक नातेवाईक च होते. घरातील प्रत्येक निर्णय हे डॉक्टरांच्या संमतीनेच घेतले जात होते. मग घरातील विवाह असो किंवा आर्थिक निर्णय असो डॉक्टर म्हणतील तेच जवळपास ठरत होते. नुसती जीभ आ करून दाखवली तर डॉक्टर डोक्यावर टपली मारून पळ कांही झाले नाही म्हणत कागदाच्या लहान पुडीत २ गोळ्या बांधून देत होते .आणि आश्यर्याची बाब दोन- चार घंट्यात धिगाना करण्यास मोकळे होत असू. फीस देण्यास गेलो तर लग्नात लाडू खाण्यास येतो म्हणत. एव्हडेच नव्हे तर घरच्यां स्त्रियांची बाळंतपणे ( जि आज सिझेरियन शिवाय होत नाहीत ) ती कधी होत असत हे समजत सुद्धा नसे.डॉक्टरांच्या हातात बळेबळे १०० रुपये कोंबून द्यावे लागे. डॉक्टर आणि देव हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे समजल्या जात असे. आणि आता दैत्य आणि डॉक्टर एकच नाण्याच्या बाजू समजल्या जातात.
यात डॉक्टरांना दोष देण्याचा उद्देश नाही तर हा दोष आजच्या समाजव्यवस्थेचा जास्त आहे. पळा पळा कोण पुढे तो या प्रवृतीचा आहे. त्याच बरोबर नर्सरी पासून ते M S M D पर्यंत चा अवाढव्य होणारा खर्च. आणि त्या नंतर दवाखाना टाकण्या साठी लागणारा खर्च पाहूनच डोळे पांढरे होतात. यामुळे डॉक्टर यांनीही अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. यातच वैद्यकीय व्यवसाय हा डॉक्टरांच्या हातात ना राहता औषध उत्पादक कंपनी, विविध तपासण्या करणाऱ्या लब्ज आणि विमा कंपन्यांच्या हातात गेल्या मुळे ते सुद्धा मनात नसताना या चक्रात अडकले आहेत. कालाय: तस्मे नम! म्हणून दुर्लक्ष करावे . हेच आपल्या हातात आहे.
Thanks & regard, Thanthanpal, Always visit:- http://www.thanthanpal. |
No comments:
Post a Comment