अकरावीच्या प्रवेशाचा गेल्या अनेक वर्षा पासून सरकार,नोकरशाही , शिक्षण तंज्ञानी घातलेला सावळा गोंधळ पाहून हा घोळ कायमस्वरूपी मिटावण्या साठी मी पुढील एक वर्षीय योजना तय्यार केली आहे.कारण सरकारी काम योजनाबद्धरित्या झालेच पाहिजे हा शासनाचा नियम आहे.आपणा कडे कांही योजना असल्यास आपण ही सादर कराव्यात .
माननीय महाराष्ट्र शासन ,
हल्ली मुक्काम मंत्रालय , चूकभूल देणे-घेणे
मुंबई
सप्रेम नमस्कार,
विषय :- शिक्षण क्षेत्रा तील आणीबाणी जाहीर करणे बाबत.
सरकारने एक वर्ष शैक्षणिक आणीबाणी जाहीर करून एक वर्ष शाळांना सुट्टी देवून टाकावी. शिक्षणा बाबत, विषयाबाबत, प्रवेश बाबत, जे कांही निर्णय घ्यायचे ते घ्यावेत.या काळात या कायद्याच्या विरोधात CBSC <ICI आणि इतर संस्थांनी, पालकांनी जी कांही कोर्टबाजी करावयाची ती करावी. न्यायालयाने हि सर्व प्रकरणे गतिमान न्यायालय स्थापन करून त्वरित सुनावणी करून निर्णय द्यावा . आणि हा निर्णय सर्वाना बंधनकारक करावा. या कायद्याची अंमलबजावणी १० वर्ष सर्वाना सक्तीची करावी.कोणालाही या नंतर या पटर्ण मध्ये बदल करता येवू नये.
आणि हो शिक्षण खात्यातील भ्रष्ट्राचारा चा सुद्धा कायदा करून प्रत्येक खाते मान्यते साठी किती लाच द्यावी लागेल ते सुद्धा प्रसिद्ध करावे. या मुळे शाळांना फी विरुद्ध ओरडणाऱ्या पालकांना हा खर्च किती होतो हे दाखवता येईल. यामुळे भ्रष्ट्राचारात पारदर्शीपणा येईल. या माझ्या अल्प ज्ञाना प्रमाणे मी या सूचना मांडल्यात.माझ्या पेक्षा शिक्षण तंज्ञाना , सरकारी अधिकाऱ्यांना , शिक्षण मंत्र्यांना, या क्षेत्राचे अधिक चांगल्या प्रकारचे वाटोळे कसे करावयाचे ते गेल्या तीन चार वर्षा पासून चांगले माहित झाले त्या मुळे यांच्या अनुभवाचा फायदा करून घेत अधिक नियम, कायदे करावेत.
हीच अपेक्षा. कळावे लोभ असावा. ही विनंती
Thanks & regard,
आपला त्रासलेला सामान्य पालक ,
Thanthanpal, date :- 25/06/2010
No comments:
Post a Comment