Translate

Saturday, June 26, 2010

आजच्या काळातच नाही तर काका-पुतण्याचे नाते पेशवाई पासूनच बदनाम झालेले आहे

सुप्रिया ताई पवार सुळे या भारताच्या नागरिक नाही.आणि त्या बद्दल चालू असलेलेली कोर्टबाजी चे प्रकरण वाचून,  मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो या म्हणीची परत एकदा जाणीव झाली. जेथे आपणास सोनिया ही परकीय सून राजकारणात चालते, तर सुप्रिया का नको? ही गोष्ट वेगळी आपल्या साहेबांनी सोनियाच्या परकीय पणाला विरोध केला होता. पण साखर,शिक्षण सम्राटांच्या तमाम बारामतीकरांच्या sorry महाराष्ट्राच्या भलेपणा साठी बेरजेचे राजकारण करत त्यांनी सोनियांना पवित्र करून घेतलं. आणि भारताचे कृषी मंत्री झालेत. काय म्हणता यांच्याच  काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जास्त आत्महत्या झाल्यात. साहेबाना बदनाम करण्यासाठी विदर्भाच्या,मराठवाड्याच्या  राजकारण्यांनी टाकलेले हा डाव आहे. बारामती, पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी कोठे आत्महत्या केल्या का? मग साहेबाना का बदनाम करता .
 तेथे सुप्रिया ताई तर आमच्या जनतेच्या शेतकऱ्याच्या जाणत्या राजाची एकुलती एक लाडकी अनिवासी भारतीय कन्या आहे. घार हिंडती आकाशी पर नजर तिची पिल्ला पाशी या न्यायाने जरी सुप्रिया ताई सिंगापूरच्या नागरिक झाल्या असल्या तरी बारामतीच्या पिल्लान वरील त्यांची माया कांही  कमी झालेली नाही.या मायेच्या माये पोटी आणि पिताश्री ला मदत करण्या पोटी त्या बिचाऱ्या स्वतःचे आलिशान सिंगापूर मधील घरदार संसार पतीदेव  सोडून महाराष्ट्राच्या रखरखीत उन्हात, वीज पाणी याची टंचाई असलेल्या  भारतातील महाराष्ट्रातील  बारामती करांच्या सेवे साठी निवडणूक लढवतात .आता या लढाईत त्या  भारतीय नागरिकत्वाचा शुल्लक विचार कशाला करतील? आदनन सामी सारखे पाक कलाकार आपल्या देशात येवून मानसन्मान पैसा  मिळवताच ना . बांगला देशी, पाकीस्थान  घुसखोर तुम्हाला चालतात ना . मग साहेबाच्या  लेकीने INCOME TAX चुकवण्या साठी दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर काय बिघडले. आता जाणता राजा जागतिक क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष झाला आहे.त्याच्या माघारी भारतीय क्रिकेट बोर्डाचा ,IPL  (उगाच भलता विचार करू नका) चा कारभार पाहण्यासाठी कोणी तरी विश्वासू पाहिजे ना? आजच्या काळातच नाही तर  काका-पुतण्याचे नाते पेशवाई पासूनच बदनाम झालेले आहे , त्यामुळे   ताई पेक्षा अधिक विश्वासू साहेबाना कोण मिळेल. मराठी मानसं सारखे त्यांचे पाय ओढू नका. तीला कोर्ट कचेरीत अडकवून समाजसेवे पासून रोखू नका. हीच कळकळीचे विनंती. जय मराठी !!
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com



No comments: