आम्हाला तुम्ही पुरणपोळी उत्सव करतात म्हणून राग नाही राग आहे तो तुमच्या दुपट्टी वागण्याचा राग आहे. उभ्या महाराष्ट्रात आज वीज नाही पिण्यास पाणी नाही.आणि मुंबईत तुम्ही दीवस रात लाईट च्या प्रकाशात भ्रष्ट क्रिकेटचे सामने जल्लोषात भरवतात. हाच सामना दिवसा उजेडात ठेवून कांही खेड्यांच्या घरातील एक मिणमिणता दिवा उजळावा असे वाटले नाही. रक्तदानाचा विक्रम केलात अभिमान आहे.पण सामान्य जनतेला त्याचा काय फायदा झाला याचा अंतर्मुख होवून विचार करा. राजाचे धोरण जनतेच्या हिताचे पाहिजे पण येथे फक्त नेत्याच्या मोठेपणाचा विचार केला जातो.
स्वताच्या नाकर्तेपणाची जगभरात बदनामी होवू नये म्हणून आंतरराष्ट्रीय शहर म्हणून सर्व राज्याची वीज चोरून मुंबईत रोज दिवाळी साजरी करतात. हा अन्याय काय म्हणून आम्ही सहन करावा? आता शेतीला पाणी कापून तुम्हाला रेन डान्स करण्याकरता पाणी पुरवठा केला जातो. जरा कोठे गेरसोय झाली की मिडिया समोर तुमचा धिंगाणा चालू चालू असतो.आमच्या रोज मरणावर तुम्ही शेतकऱ्यात हिम्मत नाही म्हणून आत्महत्या करतात असे अकलेचे तारे तोडतात. जरा मुंबईच्या बाहेरचे जगात फक्त ८ दीवस वीज पाण्या शिवाय राहून दाखवा तुमचे पाय धरतो. अखंड महाराष्ट्राच्या गोष्टी करतात पण तुमचे वागणे मात्र दुर्योधना सारखे आहे. सुई च्या अग्रावर राहील एव्हढीही वीज पाणी बाकी महाराष्ट्राला देण्याची तय्यारी नाही.
आपण बेळगावच्या नावाने गळे काढून रडतात पण विदर्भ गडचिरोली येथील आदिवासी यांची दुखे: दिसत नाही. आत्महत्या दिसत नाही. आधी घर नीट सांभाळा नंतर बेळगाव चा विचार करा. या हरलेल्या लढाईचा बहाणा करून जनतेला मूर्ख किती दिवस बनवणार? आणि मुख्य बात बेळगाव हे कांही पाकिस्थानात नाही ते भारतातच आहे तेथे बेळगाव सुखी आहे.फक्त कांही लोकांच्या राजकारणा करता पोटापाण्या करता हा प्रश्न तेल ओतून सतत ज्वलंत कसा राहील असे पाहीले जाते. मी बेळगाव ला हमेशा जातो महाराष्ट्राच्या कोणत्याही बकाल शहरा पेक्षा बेळगाव चांगले विस्तारले आहे. अजूनही शांत आहे. पश्चिम महाराष्ट्रा सारखी गुंडगिरी नाही.
लोकसत्ता रविवारचा सुवर्ण महोत्सव अंक दिनाक २५/०४/२०१० पहा प्रत्येक क्षेत्रात तुमच्या नाकर्तेपणाचा पुरावा सर्व पुराव्यानिशी वाचा. पण महोत्सव साजरा करण्या पासून तुम्हाला वेळ मिळाला तर पाहिजे?
स्वताच्या शोकां करता वाटेल तसा खर्च करता येतो.मल्टिफ्लेक्स मध्ये ५० रुपयाचे २० ग्राम पोपकोर्न आरामात खाता ,कॉकाकोलाचा टिन पक्क १०० ला आरामात पितात पण तेच शेतमालाचे भाव जरा वाढले की मिडिया आणि तुमचा महागाई वर तमाशा सुरु असतो. घोड्यांच्या शर्यती चालतात, कब्रे डान्स जोरात चालतो, पण खेड्यातील बैलांच्या शर्यती, तमाशा चालत नाही. कोर्टातून मूर्ख मानवतावादी,पांढरपेशे समाजसेवक,ढोंगी प्राणी प्रेमी बंदी आणतात.बालकामगारांचा हिडीस डान्स चालतो पण पोट भरण्यासाठी काम करणारा बालकामगार चालत नाही. घाशीराम कोतवाल, गिधाडे, सखाराम बाईंडर चालतात पण दादा कोंडकेचे सिनेमे चालत नाही.पण हे लोक शहरातील बदमाशी बद्दल तोंडाला गांधीछाप चिकट टेप लावून गप्प बसतात. लाचलुचपत,भ्रष्ट्राचारा विरुद्ध अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा करा. त्यांना तुरुंगात टाका त्याची वेध अवेधे मालमत्ता जप्त करण्या करता कोर्टात जात नाहीत.कारण ही व्यवस्था त्यांच्या फायद्याची आहे, त्या व्यवस्थेचे ते स्वतः: एक कडी आहे. हे मान्य करण्याची हिम्मत नाही.
आता तुम्ही मराठीच्या भावने शिवाय दुसरे एक तरी कारण आम्ही महाराष्ट्रात का राहावे या करता सांगाल का? आणि बेळगाव महाराष्ट्रात का पाहिजे.
--
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.
1 comment:
अगदी खरे आहे. कोणत्याही राजकारण्याला फक्त प्रसिद्धी पाहिजे असते. आत्ता कोणता 'विषय' जास्त चालेल हे पाहूनच त्यात उडी घेतली जाते. खरोखर गरज असलेले आणि जनतेच्या अडचणींकडे राजकारण्यांची 'तुंबडी' भरत असल्याशिवाय पहिले जात नाही. सगळे एकाच माळेचे मणी!
Post a Comment