Translate

Wednesday, April 7, 2010

शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात होतात पण त्यांचा अभ्यास करणाऱ्या कमिशनर चे कार्यालय नोकरशहाच्या बायको मुलांच्या सोयी साठी पुण्यात उघडले जाते.

सह्याची मोहीम घेण्या पेक्षा विदर्भ मराठवाडा हे प्रदेश महाराष्ट्रातून वेगळे का होण्याचा प्रयत्न करतात याचा विचार कारणे आवश्यक आहे. आज महा.महणजे मुंबई,पुणे आणि पच्शिम महाराष्ट्रा यापुढे विकासाचा विचार कोणी नेता किंवा त्या विभागातील नागरिक सुद्धा करत नाही.
कोणतीही नवीन योजना,कॉलेज, शासकीय संस्था या महा. उघडण्याचे ठरले तर फक्त वरील भागाचाच विचार होतो. विदर्भ मराठवाड्यात मुलभूत सुविधा नाही म्हणून डावलले जाते.
विकसित भाग अधिकाधिक निधी स्वत; ओरबाडून घेतात. पुण्यात असंख्य शैक्षणिक संस्था असताना नवीन सरकारी शैषणिक प्रकल्पा करता मराठवाडा विदर्भाचा विचार न करता प्रकल्प पुण्यास टाकणे कसे सोयीचे आहे किंवा मागसभागात टाकणे कसे गैरसोयीचे आहे याचाच जास्त विचार नोकरशाह,राजकारणी करतात . आणि मागास भाग मागासच राहतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात होतात पण त्यांचा अभ्यास करणाऱ्या कमिशनर चे कार्यालय  नोकरशहाच्या बायको मुलांच्या सोयी साठी पुण्यात उघडले जाते. हा उंटावरून शेळ्या हाकण्याचा उद्योग आम्ही का सहन करावयाचा ?  

राज्याचा मुख्यमंत्री मान्य करतो की मागास भागात सरकारी अधिकारी, डॉक्टर्स जाण्यास तय्यार नाहीत. आम्ही मजबूर आहोत. आता त्या करता कायदा करणार आहेत म्हणे? मग तुमच्या बरोबर लंगडी करत संसार आम्ही का म्हणून करायचा .
रस्ते,पाणी,वीज याबाबत सुद्धा हेच होते. हा भाग ११-१२ तास अंधारात असतो पण मुंबई पुण्यात मात्र दिपौत्सव चालू असतो. आंतरराष्ट्रीय नावाखाली मुंबई चे  चोचले आम्हाला अंधारात तेवून तहानलेले  जर पुरवत असाल तर आम्ही वेगळा विचार तर करणारच ना. आम्हाल पाणी ८/१० मैलां वरून आणावे लागते,याचा तुम्ही कधी विचार केलात. एक दिवस नळ नाही आला तर आपला टी.व्ही  समोर धिंगाणा चालू असतो. तुम्हाला फक्त तुमचेच पश्न अडचणी महत्वाच्या वाटतात मग आम्ही  वेगळे होण्याचा विचार केल की अखंड एकसंघ महाराष्ट्रा ची आठवण येते. गेल्या चाळीस वर्षात मराठीचे राजकारण करून देखील मुंबई तरी कोठे महाराष्ट्राची राहिली. मुंबई ही ना मराठी माणसाची ना बिहारी,ना गुजराथी ना मद्रास च्या लोकांची राहिली आहे. ती तर  अवैध बांधकाम करणारे बिल्डर, झोपडपट्टी दादा,गुंड मवाली गुत्तेदार नगरसेवक यांची झाली आहे हे कटू सत्य तुम्ही का स्वीकारत नाही.आम्ही  तुमच्या स्वार्था साठी आमचा, आमच्या विकासाचा बळी  का द्यावा? याला एकाधे कारण तुम्ही सांगू शकाल का?
शहरातील या हावरटपणा मुळे आमच्या तोंडाचा घास जर कोणी हिरावून घेत असेल तर तुमच्या अखंड महा. जबरदस्ती चे आम्ही ओझे का उचालावयाचे . पंजाब पासून हरियाना वेगळा झाल्यावर त्या राज्याचा विकास झपाट्याने झाला. आज आंध्रात आणि इतर राज्यात सुद्धा मागास भागात सुद्धा वेगळेपणाची वाढीस लागत आहे, हे आपणास मिडिया मार्फत समजलेच असेल.
तुमची वृत्ती म्हणजे जुन्या जुनाट विचाराच्या  एकत्र कुटुंब प्रमुखा सारखीच आहे. कोणी वेगळ राहण्याचा निर्णय घेवू पाहणाऱ्या तरुणास बंडखोर ठरवून त्याच्या मार्गात अडथळे आणावयाचे , भावनिक नात्याच्या आधार घेत black मेल कारणे , त्यास त्रास देणे, एकत्र राहणाचे काल्पनिक फायदे सांगणे असा प्रकार करत आहात. काळा बरोबर मुंबईत तुम्ही सख्खे भाऊ भाऊ एकत्र राहत नाही तर one room kitchen flat घेवून जन्मदात्यास वाऱ्यावर सोडून राजाराणीच्या संसारात मग्न असतात. पण म्हातारपणी तुमची मुले जेंव्हा तुम्हाला सोडून जातील तेंव्हा तुम्हास मायबापाचे दुख: समजेल. स्वतः; ला एक न्याय आणि आम्हाला दुसरा न्याय असे दुप्पटी वागणे झाले
कोणी बाबा आमटे,डॉ. अभय बंग राणी बंग यांच्या करता काम करत असतात तर तुम्ही तुमची नोकरशाही त्यांनाच खोटे पाडण्याचा उद्योग करतात. साहित्य संमेलना करता तंबाखूची जाहिरात घेण्या एव्हढे तुम्ही संवेदनाहीन झालात. या विरुद्ध डॉ. अभय बंग यांनाच आवाज उठवावा लागला. पुण्या मुंबईतील लोकांना बाबा आमटे अभय  बंग फक्त स्वत:ची समाजसेवेची नसलेली  तळमळ मिरवण्या पुरता लागतात. कधी मुंबई बाहेर पडलात तर फक्त मोज्जमाज कारणे शिर्डी दर्शन या पुढे जात नाही.
आजच मिडिया द्वारे नक्षलवाद्यांनी छत्तीसगढ मध्ये जवानांना मारल्याची बातमी जेवण करत पाहत असाल आणि देशात अंतकवाद कसा फेलावला सरकारने कठोर कारवाई करावी म्हणून लोकल ट्रेन मध्ये  वांझोट्या चर्चा जोरजोरात  करत  असाल. पण हा नक्षलवाद का निर्माण झाला याचे आपल्याला कांही देणे घेणे नाही. कारण तुमची पोटे भरलेली आहेत. त्या प्रांतात आपलेच देश बांधव  कुपोषणाने भुके पोटी मरत आहेत याची तुम्हाला कल्पना तरी आहे. गेल्या साठ वर्षाचा विकास फक्त तुमच्या INDIA  पुरता झाला बाकी भारत कोणत्या भयाण अवस्थेत जगत आहे याची तुम्ही कधी काळजी केली आहे का?
जावू द्या तुमच्या वागण्याचा कोळसा उगाळावा तेव्हढा काळा आहे . आम्ही सुसंकृत पणे आमच्या वेगळ्या राज्या ची मागणी करत आहोत आपण समजूतदार पाने एकली तर ठीक . नाही तर आम्हास सुद्धा इतर मार्ग अंमलात आणावे लागतील. आणि हो ! वेगळे झालो तरी आम्ही कांही उर्दू, कन्नड तमिळ बोलणार नाही मराठीच बोलणार. मुंबईच्या मराठीच्या पोकळ राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला. गेल्या चाळीस वर्षात स्वत: ची करोडो रुपयांची मालमत्ता जमा करण्या पलीकडे काय केले? मराठीच्या विकासा साठी मराठीच्या शब्द संग्रह वाढविण्या साठी काय केले. आधुनिक शाखां करता बँक, मेडिकल, संगणक विद्याना साठी लागणारा शब्द साठा आहे कोठे तुमच्या कडे?
तर दूसरीकडे बेळगाव आपल्यापासून तोडण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. आपण कोणत्या जगात वावरत आहात बेळगाव कधीच महाराष्ट्रा पासून वेगळे झाले बेळगाव चे घोंगडे बीजात ठेवण्यात राजकारणी लोकांचा स्वार्थ: आहे त्याचे कांही होणार नाही उगीच अश्रू ढाळू नका, बेळगाव आहे त्या राज्यात विकास करू द्या ते कांही काश्मीर सारखे भारताचे राज्य नाही. आणि आहेत त्या भागाचा विकास करा .नाही तर लवकरच मुंबई चंदीगढ प्रमाणे केंद्रशासित होईल नंतर हाती कांहीच उरणार नाही. 
तेरी हवससे जल गई धरती, लुट गई हरियाली, तुम पियोगे पेप्सी कोला, बिस्लरी का पानी,
हम कैसे अपना प्यास बुझाए, पीकर कचरा पानी? ॥ मचली मर गई, पंछी उड गई जाने किस दिशाए हो खेत खाली हान से जागो  नगाडा बजाओ,लडाई छोडी चारा नही सुनो देस वासी

1 comment:

प्रकाश बा. पिंपळे said...

Raje hech tar badalayche ahe apalya sagalyana. Samajatil pandhar peshanchya soyi sathi sarkar ani shetakari, majdur he gulama rat din mehanat karat ahet. tyanchya ghamachi kimat karne tar durach pan tyanacha manus mhanun jagana hi manya karayal he tayar nahit. shasanala yanchi parwa nahi ani pandharpeshyana dene ghene.
Hi ladhai ani sangharsha kadhi akramak howun tar kadhi chtrapatinchya ganimi kawayanech ladhawi lagel. tuamchya sarkhyanche ya ladhait far mol ahe. amhi tumachya sobat ahot!
Jai Maharashtra!