पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे
खरे म्हणजे आंबेडकर इतके मोठे होते की ते किती महान होते हे आता नव्याने सांगण्याची गरजच नाही.आंबेडकरी जनता इतकी पिचलेली आहे की,...... फडके सर आज आंबेडकरी जनताच नव्हे तर सर्व भारतीय जनता तुम्ही आम्ही सर्व सामान्य माणस COMMON MAN पिचलेली आहोत असे मला वाटते. त्यास सर्व पक्षातील भ्रष्ट्र राजकीय नेते जबाबदार आहेत. साधा विचार करा आज पिचलेल्या जनतेने डॉक्टर,मिडीयावर राग काढून हल्ला केला तर त्यास अजामीनपात्र गुन्हा ठरवून जेल मध्ये टाकण्याची सरकार तयारी करत आहे. पण भ्रष्ट्राच्रार
नेहरू पासून राहुल गांधी पर्यंत सर्व नेते भ्रष्ट्राच्रारा विरुद्ध बोलतात पण एकानेही हा कायदा करायची हिम्मत केली नाही. का? हा कायदा केला तर आपण सर्वजण जेल मध्ये असू असे या भ्रष्ट्र नेत्यांना भीती वाटते का?
ज्या मुळे देशाचा सत्यानाश झाला त्या विरुद्ध अजामीनपात्र कायदा सरकार करत नाही.आपण ही गप्प बसतो हीच आमची शोकांतीका आहे भारतात लोकशाही म्हणजे भ्रष्ट्र नेत्यांची, नेत्यांच्या भ्रष्ट्राच्रारा साठी फक्त जनतेच्या मतदाना द्वारे चालवली जाणारी शासन प्रणाली झाली आहे. लिंकन ला असे अभिप्रेत नव्हते.
सामान्य जनतेला लहानसाहन कारणामुळे अजामीनपात्र गुन्हा नोंदवून तुरुंगात टाकणारे कायदे करणारे सरकार भ्रष्ट्राचारा विरुद्ध अजामीनपात्र गुन्हा का नोंदवत नाही असा कायदा का करत नाही हा प्रश्न मला नेहमी पडतो. नेत्यांना जाब विचारण्याची ताकद त्यांच्यात नाही. इतकी अज्ञानी आहे की ती या नेत्यांमागे फरफटली जात आहे. अडाणीच नव्हे तर जी शहाणी शिकलेली बुद्धिवादी जनता सुद्धा एक तर या नेत्यांच्या मागे फरफटत जाते किंवा घरात बसून राहते. ज्या वेळी मत द्यावयाचे तेंव्हा टी.व्ही.पाहत बसते.माझ्या एक मताने काय होणार म्हणून. नंतर मात्र तावातावाने सिस्टीम कशी चूक आहे या वर मात्र मीच सर्वज्ञ आहे, मलाच अक्कल आहे अश्या थाटात बहस,चर्चा करत असते. राखीव जागांचा उपयोग खरच गरजवंताला होत नाही. ज्या प्रमाणे सगळ्या योजनांचा गेरफायदा उच्च वर्णातील भष्ट्र नेतेच उचलतात तसेच दलित समाजाचे भष्ट्र नेतेच गेरफायदा उचलतात या मुळे काळे गोरे असा भेद कारणे चूक आहे. राजकीय , सामाजिक, आर्थिक भ्रष्ट्र समाज व्यवस्था टिकून राहावी या करता आपण लोकांनीच या हिमालया एवढ्या मोठ्या मानवांना जात-पात , मराठा, ब्राम्हण,माळी,कोळी बहुजन उच्च-नीच वर्ण काँग्रेसी, संघीय , डावे, उजवे परत प्रांतीय धार्मिक अश्या कप्प्यात बंद केले आहे. पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे .
या कायद्या करता पाठपुरावा कारणे आणि हा कायदा लागू कारणे आवश्यक वाटते. आपण सर्वांनी या करता सतत प्रयत्न कारणे ही काळाची गरज आहे. तर? आपले विचार अवश्य कळवा
पटलं तर पुढे सांगा चूक असेल तर माझा कान पकडा
जाता जाता बातम्या चालू आहेत ऐकु येतात शरद पवारांनी गृह-निर्माण सोसायटीत मुसलमानांना घरे द्यावी असा प्रस्ताव मांडला आहे त्याच बरोबर आपल्या income tax विभागाचे वरती मागून घोडे असा प्रकार करत IPL आणि मोदी वर छापे टाकले म्हणे सामान्य माणसाने थोडा खर्च केला तर त्यास परेशान करणारा हा विभाग काय, IPL चा तमाशा चालू झाल्या पासून चीअर गर्ल्स चा नाच पाहत गप्प बसला होता काय? का आत्ता his masters voice च्या इमानी श्वाना प्रमाणे ( माफ करा ही तुलना करून मी श्वानांचे मन दुखावले .त्यांचा अपमान मी करू शकत नाही. बाकी नंतरच्या लेखात.
No comments:
Post a Comment