फक्त उत्सव साजरे करा बाकी कांही केले नाही तरी चालते असा या मुंबईतील मराठी नेत्यांचा समज झालेला आहे.उभा महाराष्ट्र पाणी आणि वीजे अभावी जळत आहे पण या नेत्यांना याची फिकीर नाही. यांना फक्त मिडिया समोर चमकायचे आहे. लोकांना एक वेळचे जेवण मिळत नसताना हे पुरणपोळी खाण्याच्या स्पर्धा आयोजित करत आहेत. जनाची नाही तरी मन से ची लाज वाटायला पाहिजे. गेल्या ४० वर्षात मराठी च्या भल्यासाठी यांनी फक्त घोषणा बाजी केली भार्ष्टचार कमी पडला आता जनतेचे रक्त जमवून गिनीज बुक मध्ये नाव येण्यासाठी तर पुरण पोळीचा विक्रम थेरे करत आहेत.
Translate
Thursday, April 29, 2010
Friday, April 16, 2010
पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे
पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे
खरे म्हणजे आंबेडकर इतके मोठे होते की ते किती महान होते हे आता नव्याने सांगण्याची गरजच नाही.आंबेडकरी जनता इतकी पिचलेली आहे की,...... फडके सर आज आंबेडकरी जनताच नव्हे तर सर्व भारतीय जनता तुम्ही आम्ही सर्व सामान्य माणस COMMON MAN पिचलेली आहोत असे मला वाटते. त्यास सर्व पक्षातील भ्रष्ट्र राजकीय नेते जबाबदार आहेत. साधा विचार करा आज पिचलेल्या जनतेने डॉक्टर,मिडीयावर राग काढून हल्ला केला तर त्यास अजामीनपात्र गुन्हा ठरवून जेल मध्ये टाकण्याची सरकार तयारी करत आहे. पण भ्रष्ट्राच्रार
नेहरू पासून राहुल गांधी पर्यंत सर्व नेते भ्रष्ट्राच्रारा विरुद्ध बोलतात पण एकानेही हा कायदा करायची हिम्मत केली नाही. का? हा कायदा केला तर आपण सर्वजण जेल मध्ये असू असे या भ्रष्ट्र नेत्यांना भीती वाटते का?
ज्या मुळे देशाचा सत्यानाश झाला त्या विरुद्ध अजामीनपात्र कायदा सरकार करत नाही.आपण ही गप्प बसतो हीच आमची शोकांतीका आहे भारतात लोकशाही म्हणजे भ्रष्ट्र नेत्यांची, नेत्यांच्या भ्रष्ट्राच्रारा साठी फक्त जनतेच्या मतदाना द्वारे चालवली जाणारी शासन प्रणाली झाली आहे. लिंकन ला असे अभिप्रेत नव्हते.
सामान्य जनतेला लहानसाहन कारणामुळे अजामीनपात्र गुन्हा नोंदवून तुरुंगात टाकणारे कायदे करणारे सरकार भ्रष्ट्राचारा विरुद्ध अजामीनपात्र गुन्हा का नोंदवत नाही असा कायदा का करत नाही हा प्रश्न मला नेहमी पडतो. नेत्यांना जाब विचारण्याची ताकद त्यांच्यात नाही. इतकी अज्ञानी आहे की ती या नेत्यांमागे फरफटली जात आहे. अडाणीच नव्हे तर जी शहाणी शिकलेली बुद्धिवादी जनता सुद्धा एक तर या नेत्यांच्या मागे फरफटत जाते किंवा घरात बसून राहते. ज्या वेळी मत द्यावयाचे तेंव्हा टी.व्ही.पाहत बसते.माझ्या एक मताने काय होणार म्हणून. नंतर मात्र तावातावाने सिस्टीम कशी चूक आहे या वर मात्र मीच सर्वज्ञ आहे, मलाच अक्कल आहे अश्या थाटात बहस,चर्चा करत असते. राखीव जागांचा उपयोग खरच गरजवंताला होत नाही. ज्या प्रमाणे सगळ्या योजनांचा गेरफायदा उच्च वर्णातील भष्ट्र नेतेच उचलतात तसेच दलित समाजाचे भष्ट्र नेतेच गेरफायदा उचलतात या मुळे काळे गोरे असा भेद कारणे चूक आहे. राजकीय , सामाजिक, आर्थिक भ्रष्ट्र समाज व्यवस्था टिकून राहावी या करता आपण लोकांनीच या हिमालया एवढ्या मोठ्या मानवांना जात-पात , मराठा, ब्राम्हण,माळी,कोळी बहुजन उच्च-नीच वर्ण काँग्रेसी, संघीय , डावे, उजवे परत प्रांतीय धार्मिक अश्या कप्प्यात बंद केले आहे. पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे .
या कायद्या करता पाठपुरावा कारणे आणि हा कायदा लागू कारणे आवश्यक वाटते. आपण सर्वांनी या करता सतत प्रयत्न कारणे ही काळाची गरज आहे. तर? आपले विचार अवश्य कळवा
पटलं तर पुढे सांगा चूक असेल तर माझा कान पकडा
जाता जाता बातम्या चालू आहेत ऐकु येतात शरद पवारांनी गृह-निर्माण सोसायटीत मुसलमानांना घरे द्यावी असा प्रस्ताव मांडला आहे त्याच बरोबर आपल्या income tax विभागाचे वरती मागून घोडे असा प्रकार करत IPL आणि मोदी वर छापे टाकले म्हणे सामान्य माणसाने थोडा खर्च केला तर त्यास परेशान करणारा हा विभाग काय, IPL चा तमाशा चालू झाल्या पासून चीअर गर्ल्स चा नाच पाहत गप्प बसला होता काय? का आत्ता his masters voice च्या इमानी श्वाना प्रमाणे ( माफ करा ही तुलना करून मी श्वानांचे मन दुखावले .त्यांचा अपमान मी करू शकत नाही. बाकी नंतरच्या लेखात.
Thursday, April 15, 2010
. विध्यार्थ्याच्या आत्महत्या नी सुद्धा यांच्या काळजावर साधा ओरखडा ही उमटत नव्हता.
BAMU University SITE hacked
NO COMMENTS!! प्रतिक्रिया नाही!! प्रतिक्रिया नही!! પ્રતિક્રિયા नही!! ፕራትክሪያ ናህ
براتيكرييا نهي!! , প্রতিক্রিয়া নাহি!!, πρατικριυα νάχη!!, ಪ್ರತಿಕ್ರಿಯ ನಹಿ!!, പ്രതിക്രിയ നഹി!!,प्रतिक्रिया नही!!ਪ੍ਰਤਿਕ੍ਰਿਯਾ ਨਹੀ!! пратикрия нахи!!, प्रतिक्रिया नहि!! پرتیکریہ نہیں!!
Monday, April 12, 2010
यह खौफ नक्सलियों का नहीं था। बल्कि उस मीडिया का था। जिनका कैमरा उनके आंसू कैद कर मार्मिक स्टोरी पेश कर उन्हें अपना हथियार बना रहा था।
हा नक्षलवाद केंद्र सरकारच्या घाणरेड्या राजकारणाचा परिणाम आहे. एका भागात विकास आणि बाकी भाग भकास या मुळे जनता शस्त्रे हाती घेत आहे तर त्यांचे काय चुकले.दरोरोज सरकारी अधिकाऱ्यांची राजकारणी नेत्यांची उघड होणारी भ्रष्ट्राचाराची प्रकरणे त्यांची सालामतीने होणारी सुटका पण सरकार ढिम्म.इतर वेळी सामान्य माणसास जेल मध्ये टाकण्यासाठी अजामीनपात्र कायदा करणारे सरकार यांच्या विरुद्ध कायदा का करत नाही हा प्रश्न आपणास कधी पाडला का? नाही कारण तुमची पोटे भरलेली आहेत.
Wednesday, April 7, 2010
शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात होतात पण त्यांचा अभ्यास करणाऱ्या कमिशनर चे कार्यालय नोकरशहाच्या बायको मुलांच्या सोयी साठी पुण्यात उघडले जाते.
सह्याची मोहीम घेण्या पेक्षा विदर्भ मराठवाडा हे प्रदेश महाराष्ट्रातून वेगळे का होण्याचा प्रयत्न करतात याचा विचार कारणे आवश्यक आहे. आज महा.महणजे मुंबई,पुणे आणि पच्शिम महाराष्ट्रा यापुढे विकासाचा विचार कोणी नेता किंवा त्या विभागातील नागरिक सुद्धा करत नाही.
कोणतीही नवीन योजना,कॉलेज, शासकीय संस्था या महा. उघडण्याचे ठरले तर फक्त वरील भागाचाच विचार होतो. विदर्भ मराठवाड्यात मुलभूत सुविधा नाही म्हणून डावलले जाते.
विकसित भाग अधिकाधिक निधी स्वत; ओरबाडून घेतात. पुण्यात असंख्य शैक्षणिक संस्था असताना नवीन सरकारी शैषणिक प्रकल्पा करता मराठवाडा विदर्भाचा विचार न करता प्रकल्प पुण्यास टाकणे कसे सोयीचे आहे किंवा मागसभागात टाकणे कसे गैरसोयीचे आहे याचाच जास्त विचार नोकरशाह,राजकारणी करतात . आणि मागास भाग मागासच राहतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात होतात पण त्यांचा अभ्यास करणाऱ्या कमिशनर चे कार्यालय नोकरशहाच्या बायको मुलांच्या सोयी साठी पुण्यात उघडले जाते. हा उंटावरून शेळ्या हाकण्याचा उद्योग आम्ही का सहन करावयाचा ?
Saturday, April 3, 2010
मराठी ब्रॅन्ड'साठी नेमकं करायचं काय? संदीप देवकुळे यांच्या उपदेशाला उत्तर
मराठी ब्रॅन्ड'साठी नेमकं करायचं काय? पहिल्या संमेलनाचे संयोजक आणि स्वागताध्यक्ष संदीप देवकुळे यांच्या उपदेशाला उत्तर
उंटावरून शेळ्या हाकणे हा या परदेशी पळून गेलेल्या भारतीयांचा उद्योग आहे.आमच्या उणीवा दाखवत बसवून स्वत;च कोतूक करून घेणे हा यांचा स्वार्थ. .अमेरिकेत काय जळते हे आरोग्य विमा कायद्याच्या वेळी जगाला कळले आहे. याच मुळे अनेक परदेशी भारतात इलाज करण्या साठी येतात. मातृभूमीचा कळवला असेल तर आधी येथे या.नंतर उपदेश करा . रणांगण सोडून आम्ही तुमच्या सारखे पळून जाणारे नाही. ठीक आहे आम्ही प्रगत नाही. पर्यावरणाचा बोजवारा उडालाय. मुलभूत सुविधांची वानवा आहे. दूर्गम भागात अजूनही सुविधांची सावलीही पोहोचलेली नाही. शिक्षणात सातत्य नाही. शेतकऱ्यांसमोर प्रश्नांचं पीक आहे. धनवान आणि गरीबांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांमधलं अंतर वाढतंय. इत्यादी इत्यादी. पण आम्ही प्रगती आमच्या स्वबळावर करूत वेळ लागेल .केवळ संमेलने भरवून भाषा सुधारत नाही किंवा वास्तव बदलत नाही. त्या करता भाषेचे शब्द भांडार वाढवणे, मुलभूत पायाभूत सेवा निर्माण करणे हि कामे चालू आहेत.
Friday, April 2, 2010
Government of India finally passed the Right to Education Act
Government of India finally passed the Right to Education Act which ensures education to every Indian child!
Indian cartoonist Satish Acharya's world of Cartooning
Indian cartoonist Satish Acharya's world of Cartooning
Thursday, April 1, 2010
आजचा एक एप्रिल भारतीय सरकारने जनते करता अनेक नवीन क्रांतिकारक निर्णय घेतले
आजचा एक एप्रिल भारतीय सरकारने जनते करता अनेक नवीन क्रांतिकारक निर्णय घेतले गेले तर कांही निर्णयांची अंमलबजावणी सुरु झाली. नवीन निर्णय घेण्यास सरकारला तीनच मुहर्त सापडतात १५ auguest , २६ january या बरोबर ही नवीन वर्ष सुरु होण्याची तारीख.... आणि हो... गांधी,नेहरू घराण्याच्या जयंत्या त्यांच्या नावाने शासकीय योजना जाहीर करण्यास पक्षाचा फायदा करून घेण्यास आहेतच की. आजच्या महत्वाच्या घटना.
Subscribe to:
Posts (Atom)